- सदगुरू जग्गी वासुदेवएखादी गोष्ट स्वीकारणे आणि काही नवीन निर्माण करण्यापेक्षा टीका करणे आणि नाकारणे नेहेमीच अधिक हुशारीचे भासण्याचा कल निर्माण झालेला आहे. विरोधक नेहेमीच अधिक हुशार वाटतात; कारण ते केवळ टीकाच करतात, ते इतर काहीही करीत नसतात. काहीतरी निर्माण करणाऱ्या व्यक्ती बुद्धिमान भासत नाहीत; कारण जेव्हा तुम्ही काही निर्माण करीत असता, तेव्हा तुम्ही अनेक चुका करीत असता. काही गोष्टी बरोबर होतात, काही चुकीच्या होतात. लोकांनी टीका केली तर काही हरकत नाही, पण काही व्यक्ती निर्लज्जपणे प्रत्येक गोष्टीवर टीका करीत राहतात. कोणतीही गोष्ट नष्ट करणे हे काहीतरी निर्माण करण्यापेक्षा नेहेमीच अधिक शक्तिशाली वाटते.जर मी तुमची देखभाल करून तुम्हाला वाढवले तर त्यात नाट्यमय असे काही नाही. पण मी जर १० जणांसमोर तुम्हाला खाली लोळवले तर ते नक्कीच नाट्यमय दिसेल. म्हणून चित्रपटांत एखाद्याला लोळवणे हे नेहेमीच नाट्यमय करून दाखविले जाते. कोणालातरी खाली लोळविल्याशिवाय चित्रपट बनूच शकत नाही. कारण तसे करणे परिणामकारक असते. टीका करण्याबद्दलसुद्धा असेच आहे. टीका करणे म्हणजे एखाद्या व्यक्तीला किंवा एखाद्या गोष्टीला खाली लोळविण्यासारखेच आहे. सकारात्मक दृष्टिकोनापेक्षा एखाद्याने घेतलेला नकारात्मक दृष्टिकोनच अधिक हुशारीचा भासतो. त्यामागे काहीतरी कारणमीमांसा असते, पण ते एक अपरिपक्व कारण असते.जेव्हा तुमची कारणमीमांसा अपरिपक्व असते, तेव्हा तुम्ही प्रत्येक गोष्ट नाकारू शकता. जेव्हा तुमची कारणमीमांसा परिपक्व होते, तेव्हा तुम्ही प्रत्येक गोष्टीचा स्वीकार करायला शिकता. कारण तुम्हाला जीवनाची प्रक्रिया समजते. तुम्ही केवळ तार्किकदृष्ट्या विचार करीत नाही, तर अस्तित्वाच्या विवेकाच्या आधाराने विचार करता. तुमच्यामध्ये केवळ तार्किक जाणच नव्हे, तर जीवनाचीही अधिक जाण आलेली असते.
लोक टीका का करतात?
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2019 04:53 IST