Why did Harshal do such a thing | हर्षलने असे कृत्य का केले?

हर्षलने असे कृत्य का केले?

- डॉ .दत्ता कोहिनकर

एकतर्फी प्रेमातून हर्षलने आपल्याच वर्गातील मुलीवर ब्लेडने वार करून स्वतालाही इजा करून घेतली होती . सुधारगृहातील हर्षलची केस स्टडी केली असता, आई - बाबा उच्चशिक्षित, उच्चस्पद नोकरी करणारे, त्यामुळे हर्षल पाळणाघरात वाढला . आईबाबांचं प्रेम सोडून सर्व गोष्टी त्याला मिळाल्या होत्या. तो प्रेमाचा, स्पर्शाचा भुकेला होता. अमेरिकेत ५ कृत्रिक रोबोटिक माकडांच्या आया ( हुबेहूब माकडीणी ) बनवल्या. नुकतीच जन्मलेली लहान माकडांची पिल्ले त्यांच्याकडे सोडली. बटन व सेन्सरच्या माध्यमातून पाचही माकडीणीकडून त्यांना दुध पाजणे , जवळ घेणे , त्यांच्याशी खेळणे , त्यांना झोपवणे या प्रकारची कार्य ५ वर्षे त्यांच्याकडून करून घेतली. 

५ वर्षानंतर सर्व माकडे तब्येतीने वाढली होती पण नॉर्मल नव्हती व हिंस्र झाली होती.  याच्या मुळाशी गेले असता, आईचे वात्सल्य, नैसर्गिक प्रेम, स्पर्श त्यांना मिळाला नव्हता . मित्रांनो घराघरात आईवडलांची भांडणे, मुलांना प्रेम, सहवास न मिळणे या कारणांमुळे व पाहिजे त्या गोष्टी चटकन उपलब्ध झाल्यामुळे रागीट पिढी तयार होत आहे . प्रेमाची भुकेली ही मुले , त्यांना ते नाही मिळालं की ओरबडून मिळवण्याचा प्रयत्न करतात, त्यातून असे हल्ले होऊन मुले वाममार्गाला जात आहेत . हर्षलला आईबाबांनी सगळ पुरवलं होतं. 

श्रीमंत पालक हर्षलने मोबाईल, लॅपटॉप, गाडी, पाहिजे तेवढी कॅश, थोडक्यात हर्षलची भौतिक जगातील सगळ्या मागण्या पूर्ण करत होते. त्यामुळे हवंय ते मिळत व मिळवण्यासाठी वाटेल ते करायच हा हर्षलचा स्वभाव झाला होता .पण वेळ, स्पर्श, प्रेम त्याला पालक देऊ शकले नव्हते. म्हणून प्रेमाचा व स्पर्शाचा तो भुकेला होता . ज्याक्षणी त्या मुलीन ते नाकारलं त्याक्षणी हर्षलचा स्वतःवरचा ताबा गेला व त्याने ओरबाडून ते मिळवण्यासाठी प्रयत्न केला व त्या मुलीवर वार केले. म्हणून लहानपणापासून मुलामुलीना वेळ द्या, प्रेम द्या, मिठी द्या, त्यांचे कौतुक करा, आपलेणाची भावना निर्माण करा व आपल्या आचरणातून चांगले संस्कार द्या, नाहीतर घराघरात असे विक्षिप्त हर्षल तयार होतील. कोणाच्याही मुलामुलींवर ही वेळ येऊ नये यासाठी हा लेखनप्रपंच . जी लोक माझा हा लेख वाचत असतील त्यांनी या क्षणी आपली मुले जवळ असतील तर त्यांना प्रेमाने जवळ घेऊन त्यांचे कौतुक करा व एक जादू कि झप्पी द्या . दूर असतील तर त्यांना एक फोन करून आपले प्रेम व्यक्त करा.

मुलांचे वय किती आहे यावर जाऊ नका. मनाला वय नसते. ते प्रेमाचे भुकेले असते. मानसशास्त्रानुसार, ज्या मुलांना लहानपणापासून प्रेम , आदर , स्पर्श , कौतुक , प्रेमाची उबदार मिठी पालकांनी दिलेली असते ती मुले भावानिक परिपक्व होतात . त्यांचा भावनिक कोष मजबूत होतो . कितीही बिकट परिस्थिती आली तरी ही मुले त्यातून वाट काढतात . कधीही आत्महत्या करत नाही . म्हणून इंटेलिजन्स कोषापेक्षा भावनिक कोष हा महत्त्वाचा असतो. त्यासाठी पालकांनी पुढाकार घ्यायला हवा. नाहीतर घराघरात असे हर्षल तयार होतील .

Web Title: Why did Harshal do such a thing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.