शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
2
मित्रपक्षांमुळे भाजपला ‘४०० पार’ची चिंता; सर्वाधिक काळजी महाराष्ट्रात
3
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
4
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
5
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
6
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
7
निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल
8
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
9
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
10
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
11
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
12
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
13
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
14
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
15
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
16
मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू
17
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा
18
कुस्तीपटू बजरंग पुनियावर निलंबनाची कारवाई; ‘नाडा’ने अंधारात ठेवल्याचा कुस्ती महासंघाचा आरोप
19
तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत
20
विक्रमी धावसंख्येसह कोलकाता विजयी; नरेनचा निर्णायक अष्टपैलू खेळ; लखनौचा ९८ धावांनी उडवला धुव्वा 

जैसे ज्याचे कर्म तैसे फळ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2019 4:33 PM

कुठल्याही व्यक्तीला अथवा परिस्थितीला दोष न देता, आपल्याच पूर्वकमार्चे हे फळ आहे असे समजून, सदैव शांत व योगयुक्त स्थितीत रहायचे आहे. 

प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात सुख आणि दु:ख दोन्ही येत असतात. या जगात अशी कोणी व्यक्ती नाही जिला सुखाची इच्छा नाही वा सुखाची कामना नाही. प्रत्येकाला केवळ सुखच हवे असते. दु:ख कुणालाच नको असतं. परंतु या कलियुगात अनेक लोक असे आहेत जे नेहमी दु:खी, अशांत व परेशान असतात. ते नेहमी स्वत:च्या दु:खाचे कारण इतरांवर थोपवितात. जर अमुक एक व्यक्ती माज्या जीवनात आली नसती तर मी खूप सुखी राहिलो असतो. त्या व्यक्तीमुळेच माज्या जीवनात अशी विपरीत परिस्थिती आली. अशा अनेक विचारांमुळे ज्या व्यक्तीपासून त्याला दु:खाचा आभास होतो त्याच्याविषयी मनात सदैव द्वेष, घृणा, वैर-विरोधाची भावना बाळगतो. त्याचबरोबर अशा दु:खद परिस्थतींना विसरण्यासाठी मनुष्य दारु, विडी, सिगारेट, मादक पदार्थांचे सेवन यांच्या आहारी जाऊन, आपले जीवन आणखीनच नर्कमय बनवित असतो. केत्येकांना आपल्या जीवनातील हे दु:ख पर्वताएवढे वाटते. त्यातून मुक्त होण्यासाठी अनेकजण जीवघात सुद्धा करतात. अशी अनेक उदाहरणे आपण रोज वर्तमान पत्रातून वाचत असतो. कित्येक जण जेव्हा दु:ख सहन करू शकत नाहीत तेव्हा तर ईश्वरालाही दोष देतात. सरकारी यंत्रणेलासुद्धा दोष देतात. अशा नकारात्मक विचारांमुळे अथवा निराशेमुळे मनुष्य नैतिक मुल्य, सकारात्मक चिंतन, सत्यता, इमानदारी या सर्व गोष्टींपासून दूर जाऊ लागतो. परिणामत: दिन प्रतिदिन त्याच्या हातून अधिकच पापकर्म घडू लागते.एका अध्यात्मिक कार्यक्रमाचे प्रसंगी एक दारुड्या मला भेटण्यासाठी आला. त्याने मला विचारले की भाईसाहेब, मला दारु सोडायची आहे. त्यासाठी मी काय करू ? त्यावर मी विचारले की तू दारु का पितोस? तो म्हणाला मला एका व्यक्तीने धोका दिला. त्यामुळे मला रात्रभर झोप येत नव्हती. सारखा तोच विचार पुन्हा पुन्हा येत असे. कधी-कधी त्या माणसाचा खूप राग येऊ लागला हेता. माझी ही मन:स्थिती माझ्या मित्राला सांगितली तेव्हा त्याने मला दारु प्यायला सांगितले. तेव्हापासून मी दारु प्यायला सुरुवात केली. त्यावर मी त्याला  विचारले, मग आता का सोडतोस ? तेव्हा तो म्हणाला, 'भाईसाहेब, आता खूप त्रास होतो. माझी किडनीसुद्धा खराब होऊ लागली आहे. डॉक्टरांनी सुद्धा दारु सोडायला सांगितले आहे. पण माझ्याकडून मात्र सुटत नाही. आता मी काय करू?'त्यानंतर मी त्याला पुन्हा प्रश्न विचारला की जेव्हा तू दारु प्यायला सुरुवात केलीस तेव्हा तूला ती कशी वाटली? तेव्हा तो म्हणाला की मला खुपच कडवट लागली. त्यावर मी त्याला सांगितले की तूला जीवनात धोका देणारी गोष्टसुद्धा कडवट होती व दारुसुद्धा कडवट होती. मग जर तू धोका देणारी गोष्ट मनातल्या मनात पिऊन टाकली असती तर तला दारु पिण्याची गरजच वाटली नसती. परंतु वर्तमान समयी जीवनात येणाºया कडवट गोष्टींना पिण्याची अर्थात सहन करण्याची शक्ती मनुष्यात नाही. त्यामुळे आजचा मनुष्य जीवनात दु:खी व अशांत आहे. जर त्याच्या जीवनात ही शक्ती आली तर तो मानसिक, शारीरिक व सामाजिक दृष्ट्या सुखी होऊ शकेल. इतकेच नव्हे तर विपरीत परिस्थितीत सुद्धा, पापकमार्पासून दूर राहू शकेल. जसे चिखलामध्ये कमळ उमलते तसे कलियुगी पतित दुनियेत राहूनसुद्धा सुखी व संपन्न जीवन जगू शकेल. अशा प्रकारचे जीवन जगण्याची कला स्वयं परमपिता परमात्मा, ब्रह्माकुमारीज संस्थेद्वारे सर्वांना शिकवित आहेत. जर आपण सहज राजयोगाचा नियमित अभ्यास केला तर जीवनात येणाºया कोणत्याही विपरीत परिस्थितींना आपण सहज तोंड देऊ शकतो. राजयोगाद्वारे आपल्यात सहनशक्ती, सामावून घेण्याची शक्ती, सामना करण्याची शक्ती, निर्णय शक्ती या सर्व शक्ती येतात. त्यामुळे प्रत्येकाने राजयोगाचा अभ्यास अवश्य करावा. वास्तविक तसं पाहिलं तर आपल्या जीवनात घडणाºया ज्या काही सकारात्मक किंवा नकारात्मक घटना आहेत त्या आपल्याच पूर्व जन्मांच्या कर्माची फळे आहेत. जेव्हा आपण हे विसरून जातो तेव्हा आपण इतरांना त्यासाठी दोषी मानतो. टाळी कधी एका हाताने वाजत नसते. सध्या जर आपल्याला कोणी त्रास देत असेल तर असे समजायला हरकत नाही की आपण ही कोणत्या ना कोणत्या जन्मात त्या व्यक्तीला असा त्रास दिला होता. त्याचा तो हिशोब आता धेत आहे. सदैव लक्षात ठेवा की आपले जे नातेवाईक आहेत. शेजारी आहेत, मित्रमंडळी आहेत, आॅफीसमधील सहकर्मचारी आहेत. अलौकिक परिवार आहे. त्यातील कोणी आपल्याला देण्यासाठी आले आहे तर कोणी घेण्यासाठी आले आहेत. देणे किंवा घेणे हेच जीवन आहे. आपण जर एखाद्या बरोबर चांगला व्यवहार केला असेल तर तो देखील आपले चांगलेच करणार आणि वाईट व्यवहार केला असेल तर तो देखील वाईटच व्यवहार करणार. कर्माच्या ह्या गुह्य गतिला जो नीटपणे समजतो तोच सुखी होतो. याउलट जो कर्माच्या गुह्य गतिला विसरतो तो दु:खी होतो. तात्पर्य म्हणजे आपल्याच कर्माच्या पेरलेल्या बीजामुळे सुख वा दु:ख मिळत असते. सदैव लक्षात ठेवा आपल्या जीवनातील दु:खासाठी कोणी दुसरी व्यक्ती कारणीभूत नसून आपलीच चुकीची कर्मे आहेत. त्यामुळे या दुनियेत लोकांना किंवा विपरीत परीस्थितीला घाबरु नका परंतु जर काय घाबरायचेच असेल तर चुकीच्या कमार्चे बीज टाकण्यासाठी घाबरा. मनात जरी वाईट अथवा चुकीचा संकल्प आला तरी त्या चुकीच्या कमार्ला प्रत्यक्षात आणू नका. कारण जर का एकदा चुकीचे बीज पेरले गेले तर त्याचे फळ कधी ना कधी भोगावे लागणारच. संसार एक कर्मक्षेत्र आहे. काही लोकांना वाटते की येथे अन्याय होत आहे. परंतु लक्षात ठेवा या सृष्टीवर कोणतेही युग असो, येथे अन्याय कधीच होत नाही. काहीजण म्हणतात, हा मनुष्य इतका भ्रष्टाचारी आहे तरी सुद्धा किती संपत्तीवान, धनवान आहे.परमेश्वर अशा मनुष्यावर का मेहरबान आहे. दिवसेंदिवस त्याची प्रगतीच हात चालली आहे. वास्तविक हे त्याच्या मागील जन्मात केलेल्या श्रेष्ठ कर्मान फळ आहे. आज तो जे चुकीचे कार्य करीत आहे. त्याचेही फळ त्याला लवकरच मिळेल. म्हणूनच म्हटले जाते, ह्यभगवान के घर देर है, मगर अंधेर नहीं। एकदा का चुकीचे कर्म केले की त्यात परमेश्वरसुद्धा काही बदल करत नाही. परंतु काही कमार्ची फळे याच जन्मात मिळतात तर काही कर्माची फळं मिळण्यासाठी अनेक जन्म घ्यावे लागतात. जेव्हा आपण ह्या कर्माच्या गुह्यगतिला समजतो तेव्हा आपण सकारात्मक बनून, प्राप्त परिस्थितीवर सहज मात करू शकतो व आपली जीवनरुपी नौका सहज पार करू शकतो. कर्माच्या गुह्य गतिविषयीची एक सत्य घटना मी याठिकाणी नमूद करू इच्छितो. ती आपल्याला खूपच बोधप्रद वाटेल. काही वषार्पूर्वी मी दिल्ली पांडव भवनमध्ये ईश्वरीय सेवा करत होती. त्यावेळी दिवसा माझी सेवा किचनमध्ये आणि रात्रीच्या वेळी सेक्युरिटीची (पहाºयाची) सेवा होती. दिल्ली पांडव भवन हे रोहतक रोडवर असल्याने रात्रीच्या वेळी ट्रकची वाहतुक मोठ्या प्रमाणावर होत असे. पांडवभवनच्या समोर एक ट्रॅफिक पोलिसवाला ड्युटीसाठी रोज येत असे. मी त्या पोलिसवाल्याकडे अधून-मधून गेटवरुन बघत असे. तो ट्रकवाल्याला हात दाखवित असे.ट्रक ड्रायव्हर त्याला पैसे देत व पुढे निघून जात असत. काही दिवसांनी तो पोलिसवाला माज्याकडे पाणी पिण्यासाठी येऊ लागला. त्यामुळे माझी त्याच्याशी दोस्ती झाली. एक दिवस मी त्याला विचारले की तुम्ही ट्रकवाल्यांना थांबवून जे पैसे घेता, तो काय रोड टॅक्स असतो का? तुम्ही तो आॅफिसमध्ये जमा करता का? तेव्हा तो पोलिसवाला म्हणाला, 'तो काही तसा टॅक्स वगैरे नाही. परंतु ट्रकवाल्यांना वाटते की आपली गाडी शहरातून लवकर बाहेर पडावी म्हणून ते पैसे देऊन निघून जातात आणि जर कोणी पैसे दिले नाहीत तर मग त्याची गाडी बाजूला घेऊन आम्ही त्याची कागदपत्र तपासतो. त्यात काही ना काही त्रुटी असतेच. त्यामुळे त्याच्याकडून आणखी जास्ती पैसे मिळतात. हे पैसे आॅफिसमध्ये जमा करावे लागत नाहीत. त्यातील निम्मे पैसे साहेबाला द्यावे लागतात व बाकीचे पैसे आपले. त्यावर मी त्यांना म्हणालो, तुम्ही जर रक्षकच असे करत असाल तर बाकीचे काय करतील ? तेव्हा तो पोलिसवाला म्हणाला, सर्वच जण असे करतात म्हणून आम्हीसुद्धा करतो. पुढे मी विचारले, सर तुम्हाला पगार तर मिळत असेलच ना? तेव्हा तो म्हणाला की पगार तर मिळतोच पण भविष्याची तयारी करावी लागते. माझे स्वत:चे एक घर आहे, गाडी आहे, मुलगा इंजिनियरींग करतोय. त्याचाही होस्टेलचा मोठा खर्च होतो. बाकी घरच्यांच्या सर्व मागण्या पटविण्यासाठी पैसा हा जमा करावा लागतोच. नुसत्या पगारावर काय होतय? आम्ही ट्रॅफिकवाले तर दिवसभर पैशामाबतच खेळत असतो. आमच्यासाठी ता जण काय आताच स्वर्ग आहे. तुम्ही तर घरदार सोडून येथे सेवा करता. हे काय जीवन आहे? अशा प्रकारची चर्चा अधून-मधून होत असे. तरी मी त्याला मोठ्या युक्तीने ईश्वरीय ज्ञान सांगण्याचा प्रयत्न करीत असे. त्यावर त्याचे एकच म्हणणे असे की आमच्या पोलिस खात्याला या ज्ञानाची गरजच नाही. कारण आमच्या जीवनात काही दु:खच नाही. परंतु एक दिवस तो पुलिसवाला जेव्हा ड्युटीवर आला होता तेव्हा तो पांडव भवनमध्ये पाणी पिण्यासाठी आला. त्यावेळी त्याच्या चेहºयावर नैराश्याची छटा होती व काहीही बोलत नव्हता. तेव्हा मी त्याला विचारले. 'सर. आज काय घडलं? आपण एकदम गप्प-गप्प दिसतायं. त्यावेळी त्या पोलिसवाल्याने आपले मनोगत व्यक्त केले. आज दुपारी माज्या मुलाच्या कॉलेजमधून टेलिफोन आला होता की माझा मुलगा कॉलेजच्या होस्टेलमधून तीन दिवसापासून पळून गेला आहे. त्यानंतर मी त्याच्या मित्रांना फोन केला. तेव्हा मला समजले की तीन दिवसापूर्वी माझ्या मुलाने एक मुलीबरोबर प्रेमविवाह करून कुणाला न सांगता, होस्टेलमधून निघून गेला आहे. माझा हा एकुलता एक मुगा, त्याला मी अतिशय प्रेमाने वाढवलं. त्याच्या सर्व इच्छा पूर्ण केल्या. तयाला काही सुध्दा कमी पडू दिलं नाही. डोनेशन देऊन त्याला इंजिनिअयरींगला पाठवलं. परंतू, आज त्याच मुलाने मला खूप मोठा धोका दिला. त्याने प्रेमविवाह केला म्हणून मी नाराज नाही. परंतु, मी भविष्यासाठी जेवढा पैसा बँकेत जमा करून ठेवला होता. तो घेऊन तो पसार झाला. कारण एटीएम कार्ड त्याच्याकडेच होते. त्यावेळी मी फक्त त्यांना एवढंच सांगितले की सर, ते पैसे कमवले कसे होते? काही दिवस तो पोलिसवाला खूप दु:खद मन:स्थितीत राहीला. टेंशनमुळे दारू पिऊ लागला. परंतु त्याला आपल्या चुकीच्या कर्माचाही पश्चाताप झाला होता. त्यामुळे हळूहळू ज्ञान ऐकत नंतर तो राजयोगी बनला. त्याचा परिवारही ज्ञानात आला. आता तो ब्रम्हकुमारी विद्यालयाचा नियमित विद्यार्थी बनून, खºया स्वर्गात जाण्याचा पुरूषार्थ करीत आहे. ही तर केवळ या जन्मातील कर्माविषयीची सत्य घटना तुम्हाला सांगितली.  परंतु, आजवर आपण जन्मोजन्मी अभिमानवश कित्येकांना दु:ख दिले असेल, कळत नकळत कमी-अधिक प्रमाणात पापाचार, हिंसाचार, भ्रष्टाचार केला असेल, प्रकृतीचा दुरूपयोग केला असेल, ते सर्व आपल्याला इथेच (या अंतिम जन्मातच) चुक्त करायचे वा फेडायचे आहे. त्यामुळे कुठल्याही व्यक्तीला अथवा परिस्थितीला दोष न देता, आपल्याच पूर्वकमार्चे हे फळ आहे असे समजून, सदैव शांत व योगयुक्त स्थितीत रहायचे आहे. 

- ब्रम्हकुमारी शंकुतला दीदीब्रम्हकुमारी, रायगड कॉलनी, खामगाव.

टॅग्स :spiritualअध्यात्मिकAdhyatmikआध्यात्मिक