We will enjoy all the happiness all the time. Broken net fascination ..! | सर्व सुख आम्ही भोगूं सर्व काळ । तोडियेलें जाळ मोहपाश..!

सर्व सुख आम्ही भोगूं सर्व काळ । तोडियेलें जाळ मोहपाश..!

माणूस जसा जसा भौतिक सुखांच्या गर्तेत अडकत जातो तसे तसे त्याला अहंकार, स्वार्थ, क्रोध, मोह , माया, मत्सर यांची बाधा होते. तो मग आनंदाच्या एका एका क्षणाला परका होत दुःखाच्या खोल डोहात डुबत जातो. हे दुःखच मग मनुष्याच्या अपयशी, नैराश्यमय जीवनाचे कारण ठरते.. पण अध्यात्म, सत्संग ही दुःखावरची प्रभावी मात्रा तर आहेच शिवाय सुखाचा चिरंतन दरवळ भोवती पेरणारी अत्तरदाणी आहे. पण या सुखालाही एक दिशा ,विश्वास, आधार, प्रेरणा; अभ्यास, आणि आध्यात्मिक क्षेत्रातली उत्तुंग भरारी साधलेली एक 'गुरु' किल्ली हवी...नाहीतर मग माणूस सगळं काही असून देखील समुद्रात वादळात सापडलेल्या दिशाहीन जहाजासारखा भरकटत जातो.. पण ज्याला कुणाला सत्संग लाभला तो हळूहळू स्वतःला ओळखू लागतो...सत्संग मग त्याच्या मानवी जीवनाला भौतिक मोहमायेपासून परावृत्त करत राहतो....पण तो सत्संग लाभण्यासाठीच गुरुकृपेची भेट घडावी लागते..
त्याच गुरुतत्वाची ओळख करून देणारी असंख्य उदाहरणे आहेत..त्यापैकीच एक.. 
एकदा स्वामी विवेकानंद बोटीने प्रवास करत होते. तेव्हा त्यांना आवाज आला की खाली उतर. मग बोटीतून ते लगेच उतरले. पण त्यांना कळले नाही की त्यांच्या गुरूने त्यांना असा आवाज का दिला. थोड्या वेळाने वादळात ती बोट बुडाली व सर्वजण बुडून मेलेत हे ऐकून त्यांना फार वाईट वाटले व रागही आला. कारण ते रामकृष्ण परमहंसांचे शिष्य होते व त्यांनाच त्यांनी आवाज दिला. बाकी त्यांचे शिष्य नव्हते. म्हणून त्यांनी त्यांना आवाज दिला नाही. मग गुरू हे स्वार्थी आहेत असे त्यांना वाटले व त्यांनी गुरूंना याबाबतीत विचारले. 
गुरू म्हणाले, नरेद्र असं नाही; जे तू समजतोस. मी सर्वांना सारखाच आवाज दिला. पण तुझ्या आतील पावित्र्यामुळे तो आवाज फक्त तुला ऐकू आला; बाकीच्यांना नाही. तू आतून एकदम शुध्द आहेस कोणतेही विकार नाहीत म्हणून तुझे व माझे कनेक्शन जोडले आहे. त्यामुळे मी कायम तुझ्याबरोबरच असतो व तुला जे सावध करतो ते तुझ्यापर्यंत पोहचते व कठीण प्रसंगी तू मार्ग काढतो वास्तविक मीच त्या सूचना करत असतो.
म्हणून आपले मित्रमंडळी नातेवाईक प्रत्येकजण आपल्या बरोबर कायम असतीलच असे नाही. पण आत जो बसलेला आहे तो प्रत्येकात प्रत्येकाच्या एकदम जवळ आहे. त्याबाबतीत म्हणता येईल "जेथे जातो तेथे तू माझा सांगाती". पण आपले लक्ष बाहेर. आत आपण कधी डोकावतच नाही..

आपल्या डोक्यात नुसती नकारात्मकता, द्वेष, भरलेली आहे... सतत आपल्या मनातील संशयी वृत्ती आपल्याला अस्वस्थ करत असते.. भीतीने आपण आतून बाहेरून पूर्णतः पोखरलेलो आहोत..पण या सगळ्या कल्लोळात आपण स्वतःचे अतोनात नुकसान करून घेत आहोत.. आणि जगभर परमेश्वर शोधत फिरतो आहे..पण साधू संतांनी सांगितलेली त्या विधात्याची दर्शनाची साक्षात दृष्टांत मिळवण्याची पद्धत किती सहजपणे आपण विसरलोय नाही नाही त्याकडे जाणून बुजून दुर्लक्ष करत आहोत.. त्यामुळे आत जो बसला आहे त्याचे कनेक्शन तुटले आहे. म्हणून आपल्यापर्यंत त्याच्या सूचना पोहोचत नाहीत व आपल्याला दु:ख प्राप्त होते... .

Web Title: We will enjoy all the happiness all the time. Broken net fascination ..!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.