वास्तू टिप्स भाग 4
By Admin | Updated: August 10, 2016 12:19 IST2016-08-02T14:56:26+5:302016-08-10T12:19:10+5:30
मुलांची शैक्षणिक प्रगती चांगली होण्यासाठी त्यांना पूर्वेला डोके आणि पश्चिमेला पाय करून झोपवावे .

वास्तू टिप्स भाग 4
>- मकरंद सरदेशमुख
- मुलांची शैक्षणिक प्रगती चांगली होण्यासाठी त्यांना पूर्वेला डोके आणि पश्चिमेला पाय करून झोपवावे .
- मुलांच्या उत्तम शैक्षणिक प्रगतीसाठी पूर्वेला तोंड करून अभ्यासाला बसवावे .
- लहान मुलांना घराच्या नैऋत्य दिशे मध्ये झोपू नये त्यामुळे त्यांची शैक्षणिक प्रगतीत अडथळे येऊ शकतात .
- घरामध्ये पैसा, संपत्ती, ऐश्वर्य टिकवून राहण्यासाठी घराच्या नैऋत्य दिशेमध्ये तिजोरी किंवा पैशाचे कपाट ठेवावे .
- घरामध्ये शैक्षणिक आर्थिक प्रगती व्हावी यासाठी भडक रंगाचे कपडे वापरणे टाळावे .
- ईशान्य दिशेला वास्तुदोष असेल तर मुलांच्या शिक्षणावर आणि आरोग्यावर खूप वाईट परिणाम होतात .
- नवीन घर बांधताना किंवा विकत घेताना घराचा आकार आयताकृती किंवा चौकोनी असावा.
- मुलांच्या उत्तम शैक्षणिक प्रगतीसाठी सरस्वतीचे प्रज्ञावर्धन स्तोत्र आणि गणपती अथर्वशीर्ष मुलांनी रोज म्हणावे .
- उत्तम वैवाहिक आयुष्यासाठी नवरा- बायकोंनी दोन जोडलेल्या बेड वर झोपू नये .
- नवीन घर घेताना पहिल्या व शेवटच्या मजल्यावरचे घर विकत घेणे टाळावे.
(लेखकांनी वास्तुशास्त्रामध्ये डॉक्टरेट केलं असून ते पुण्यात असतात. गेली आठ वर्षे ते वास्तुविषयक सल्ला देण्याचे काम करत आहेत.www.vastutathastu.com)