Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग - गुरुवार, 26 डिसेंबर 2019
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2019 08:50 IST2019-12-26T08:49:38+5:302019-12-26T08:50:24+5:30
आज जन्मलेली मुलं... कोणती असेल रास?

Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग - गुरुवार, 26 डिसेंबर 2019
आजचे पंचाग
गुरुवार, दि. 26 डिसेंबर 2019
भारतीय सौर 05 पौष 1941
मिती मार्गशीष वद्य अमावस्या 10 क. 43 मि.
मूळ नक्षत्र 16 क. 50 मि., धनु चंद्र
सूर्योदय 07 क. 10 मि., सूर्यास्त 06 क. 06 मि.
कंकणाकृती चंद्रगहण
आज जन्मलेली मुलं
धनु राशीत जन्मलेली आजची मुले चंद्र -गुरु युतीमुळे भाग्यवान ठरतील. त्यातील प्रतिसाद मातापित्यांना आनंद देतील. शिक्षणात प्रगती होईल. प्राप्ती प्रबल होत राहील. धर्मकार्यातून समाधान मिळवतील. यात्रा संभवतात. धनु राशी भ, ध अद्याक्षर.
- अरविंद पंचाक्षरी
दिनविशेष
1914- कुष्ठरोग्यांच्या कल्याणासाठी आयुष्य वाहून घेणारे थोर समाजसेवक देवीदास मुरलीधर तथा बाबा आमटे यांचा जन्म.
1917- मराठी व हिंदी भाषांतून लेखन करणारे प्रभाकार माचवे यांचा जन्म.
1935- मॅगसेसे पारितोषिक विजेत्या डॉ. मेबल अरोळे यांचा जन्म.
1938- अभिनेत्री लालन सारंग यांचा जन्म.
1989- प्रसिद्ध व्यंगचित्रकार के. शंकर पिल्ले यांचे निधन.
1999- माजी राष्ट्रपती शंकर दयाळ शर्मा यांचे निधन.
2006- अभिनेते केशवचंद्र मोरेश्वर ऊर्फ दाजी भाटवडेकर यांचे निधन.