Today's Panchang & Importance of the Day : आजचे मराठी पंचांग - शनिवार, 21 मार्च 2020
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2020 07:42 IST2020-03-21T07:42:33+5:302020-03-21T07:42:48+5:30
आज जन्मलेली मुलं... कोणती असेल रास?, कसा होईल प्रवास?

Today's Panchang & Importance of the Day : आजचे मराठी पंचांग - शनिवार, 21 मार्च 2020
आज जन्मलेली मुलं - कुंभ राशीत जन्मलेली आजची मुले विचारांनी वेगवान असतील. शिक्षणात संस्कार पुढे नेतील, काही विभागात स्वतःचा प्रभाव निर्माण करू शकतील. चंद्र-हर्षल शुभयोग संधी निर्माण करून देणार योग आहे. त्याचा कल्पकतेने उपयोग करावा. कुंभ राशी ग, स अद्याक्षर.
(अरविंद पंचाक्षरी यांच्याकडून)
आजचे पंचांग
शनिवार दि. 21 मार्च 2020
भारतीय सौर 1 फाल्गुन 1942
मिती फाल्गुन वद्य द्वादशी 07 क. 26 मि.
धनिष्ठा नक्षत्र 19 क. 40 मि., कुंभ चंद्र
सूर्योदय 06 क. 47 मि., सूर्यास्त 06 क. 49 मि.
शनिप्रदोष
आजचे दिनविशेष
जागतिक वनदिन
1847 - लेखक बाळाजी प्रभाकर मोडक यांचा जन्म.
1887 - मानवतावादाचे थोर विचारवंत मानवेंद्रनाथ रॉय यांचा जन्म.
1916- भारतरत्न शहनाईवादक उस्ताद बिस्मिल्ला खाँ यांचा जन्म.
1973 - अभिनेते शंकर घाणेकर यांचे निधन
1978- हिंदी चित्रपट अभिनेत्री राणी मुखर्जी हिचा जन्म
1998 - मराठवाड्यातील ज्येष्ठ गायक, संगीत प्रसारक पं. गोविंदराव त्र्यंबकराव जळगावकर यांचे निधन.
2010 - विनोदी लेखक लक्ष्मण तथा बाळ गाडगीळ यांचे निधन