Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग - सोमवार, 6 जानेवारी 2020
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2020 10:15 IST2020-01-06T10:14:18+5:302020-01-06T10:15:01+5:30
आज जन्मलेली मुलं... कोणती असेल रास?, कसा होईल प्रवास?

Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग - सोमवार, 6 जानेवारी 2020
20 क. 36 मि. पर्यंत मेष राशीत जन्मलेली आजची मुलं असतील. त्यानंतर वृषभ राशीत मुलांचा प्रवेश होईल. प्रयत्न आणि आधुनिक विचारप्रवाह यामधून मुले कार्यप्रांतात यश संपादन करतील. संयमाने त्यात मोठी सफलता मिळविता येईल. संपर्क संबंध विशेष राहतील.
मेष राशी अ, ल, ई
वृषभ राशी ब, व, ऊ अद्याक्षर.
- अरविंद पंचाक्षरी
आजचे पंचांग
सोमवार, 6 जानेवारी 2020
भारतीय सौर 16 पौष 1941
मिती पौष शुद्ध एकादशी 28 क. 03 मि.
भरणी नक्षत्र, 14 क. 15 मि., मेष चंद्र 20 क. 36 मि.
सूर्योदय 07 क. 14 मि., सूर्यास्त 06 क. 14 मि.
पुत्रदा एकादशी
दिनविशेष
1745 - बलूनच्या साहाय्याने आकाशात जाण्याचे प्रयोग करणाऱ्या जाक्कस एलियन माँटगोल्फिएर यांचा जन्म.
1812 - दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांचा पोंभुर्ले सिंधुदुर्ग येथे जन्म.
1868 - संतकवी गणेश सहस्त्रबुद्धे ऊर्फ दासगणू महाराज यांचा जन्म.
1885 - आधुनिक हिंदी साहित्याचे जनक भारतेंदू हरिश्चंद्र यांचे निधन.
1924 - स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांची जन्मठेपेतून सुटका.
1928 - नाटककार विजय तेंडुलकर यांचा जन्म.