Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग शनिवार, 5 ऑक्टोबर 2019
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2019 10:01 IST2019-10-05T10:00:54+5:302019-10-05T10:01:45+5:30
आज जन्मलेली मुलं... कोणती असेल रास?, कसा होईल प्रवास?

Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग शनिवार, 5 ऑक्टोबर 2019
धनु राशीत जन्मलेली आजची मुले चंद्र-हर्षल नवपंचम योगातून मिळत राहणाऱ्या संधीतून सफलता मिळवीत राहतील. प्रयत्न आणि कार्यमार्ग यांचा समन्वय मात्र ठेवावा. कारण चंद्र-शनि युती आहे.
धनु राशी भ, ध अद्याक्षर
- अरविंद पंचाक्षरी
आजचे पंचांग
शनिवार, 5 ऑक्टोबर 2019
भारतीय सौर, 13 आश्विन 1941
मिती आश्विन शुद्ध सप्तमी 09 क. 51 मि.
मूळ नक्षत्र 13 क. 18 मि. धनू चंद्र
सूर्योदय 06 क. 31 मि., सूर्यास्त 06 क. 23 मि.
महालक्ष्मी पूजन
दिनविशेष
1922 - लेखक, संपादक यदुनाथ थत्ते यांचा जन्म.
1932 - भारतीय क्रिकेटपटू माधव आपटे यांचा जन्म.
1964 - भारतीय क्रिकेटपटू सरबिंदू मुखर्जी यांचा जन्म
1975 - टायटॅनिक या प्रसिद्ध चित्रपटातील भूमिकेमुळे प्रसिद्ध झालेली ब्रिटिश अभिनेत्री केट विन्स्लेट हिचा जन्म.
1980 - सर्वोच्च न्यायालयात पहिल्या महिला न्यायाधीश मीरासाहेब फातिमा बिबी यांची नियुक्ती.
1992 - भारतीय राजनैतिक मुत्सद्दी परशुराम भवानराव पंत यांचे निधन.