Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग बुधवार, 26 जून 2019
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2019 08:02 IST2019-06-26T08:01:39+5:302019-06-26T08:02:11+5:30
आज जन्मलेली मुलं... कोणती असेल रास?, कसा होईल प्रवास?

Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग बुधवार, 26 जून 2019
आज जन्मलेली मुलं-
मीन राशीत जन्मलेल्या आजच्या मुलांना चंद्र-गुरु नवपंचम योग आणि चंद्र-शुक्र शुभयोगाचे मिळणारे सहकार्य अप्रतिम असा कार्यप्रवास सुरू ठेवण्यास उपयुक्त ठरेल. बौद्धिक क्षेत्रात प्रगती होईल. कला, साहित्याशी संपर्क येतील. मीन राशी द, च.
आजचे पंचांग
बुधवार, दि. 26 जून 2019
भारतीय सौर, 5 आषाढ 1941
मिती ज्येष्ठ वद्य नवमी अहोरात्र
उत्तरा भाद्रपदा नक्षत्र 5 क. 37 मि. मीन चंद्र
सूर्योदय 06 क. 5 मि., सूर्यास्त 07 क. 18 मि.
दिनविशेष-
ड्रग निषेध दिन
1838- आद्य बंगाली कादंबरीकार बंकीमचंद्र चॅटर्जी यांचा जन्म
1874- राजर्षी शाहू यांचा जन्म
1888- विख्यात संगीतनाट्य गायक आणि नट नारायण श्रीपाद राजहंस तथा बालगंधर्व यांचा जन्म
1892- अमेरिकन कादंबरीकार पर्ल बक हिचा जन्म
1968- बालगंधर्व यांच्या स्मरणार्थ पुणे महापालिकेने उभारलेल्या बालगंधर्व रंगमंदिराचे उद्घाटन
1975- सुरक्षिततेसाठी राष्ट्रपती फक्रुद्दिन अली अहमद यांनी आणीबाणी घोषित केली.
1980- पत्रकार गोविंद मोरेश्वर तथा आप्पा पेंडसे यांचे निधन