Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग सोमवार, 22 जुलै 2019
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2019 09:03 IST2019-07-22T09:02:28+5:302019-07-22T09:03:11+5:30
आज जन्मलेली मुलं... कोणती असेल रास?, कसा होईल प्रवास?

Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग सोमवार, 22 जुलै 2019
मीन राशीत जन्मलेली मुले गुरू शनि यांच्या सहकार्यानं यश संपादन करीत राहतील. चंद्राचे रवि बुधाशी होणारे शुभयोग त्यात प्रबलता निर्माण करतील. व्यापारी वर्तुळाशी संबंध येतील. समाजात चमकता येईल. मीन राशी द, च अक्षर.
- अरविंद पंचाक्षरी
आजचे पंचांग
सोमवार, दि. 22 जुलै 2019
भारतीय सौर, 31 आषाढ 1941
मिती आषाढ वद्य पंचमी 14 क. 4 मि.
पूर्वा भाद्रपदा नक्षत्र 10 क. 24 मि. मीन चंद्र
सूर्योदय 06 क. 13 मि., सूर्यास्त 07 क. 17 मि.
दिनविशेष
1900- भारताचा नॉर्मन प्रिचर्ड या खेळाडूने ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये पॅरिस येथे 200 मीटरचे रजतपदक मिळविले.
1908- लोकमान्य टिळक यांना काळ्या पाण्याची शिक्षा
1923- प्रसिद्ध पार्श्वगायक मुकेश यांचा जन्म
1930- ख्यातनाम गणितज्ज्ञ डॉ. श्रीराम शंकर अभ्यंकर यांचा जन्म
1947- भारतीय संविधान समितीने तिरंगा हा राष्ट्रध्वज म्हणून संमत केला
1970- महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा जन्म
1984- कवी व कथाकार ग. ल. ठोकळ यांचे निधन