Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग मंगळवार, 5 मार्च 2019

By ऑनलाइन लोकमत | Published: March 5, 2019 08:38 AM2019-03-05T08:38:36+5:302019-03-05T10:08:16+5:30

आज जन्मलेली मुलं... कोणती असेल रास?, कसा होईल प्रवास?

todays born baby horoscope rashi bhavishya todays panchang special days marathi 5 march 2019 | Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग मंगळवार, 5 मार्च 2019

Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग मंगळवार, 5 मार्च 2019

googlenewsNext

कुंभ राशीत जन्मलेल्या आजच्या मुलांना गुरु-शनिचे सहकार्य मिळणार असल्याने चंद्र-हर्षल शुभयोगातून मुलं शिक्षणात आणि व्यवहारात चमकत राहतील. काही मुलं प्रतिष्ठेच्या आकर्षक उंचीवर पोहोचू शकतील.

कुंभ राशी ग, स आद्याक्षर 

(अरविंद पंचाक्षरी यांच्याकडून)

आजचं पंचांग

मंगळवार, दि. 5 मार्च 2019

-  भारतीय सौर 14 फाल्गुन 1940
- मिती माघ वद्य चतुर्दशी, 19 क. 07 मि.

- धनिष्ठा नक्षत्र 15 क. 17 मि., कुंभ चंद्र  
- सूर्योदय 06 क. 56 मि., सूर्यास्त 06 क. 44 मि.

दिनविशेष

1910 - अर्थशास्त्रविषयक नियतकालिकांचे संपादक श्रीपाद वामन काळे यांचा जन्म.

1913 - किराणा घराणाच्या शास्त्रीय गायिका गंगूबाई हनगल यांचा जन्म.

1914 - नाटककार, समीक्षक, तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक शांताराम अनंत देसाई यांचे इंदूर येथे निधन.

1931 - सविनय कायदेभंग चळवळीनंतर गांधी आणि आयर्विन यांच्यात करार. 

1968 - भाषातज्ज्ञ, संशोधक, लेखक नारायण गोविंद ऊर्फ नानासाहेब चाफेकर यांचे निधन. 

1974 - दूरदर्शन अभिनेता हितेन तेजवानी याचा जन्म.

1985 - मराठी तत्त्वज्ञान महाकोशाचे संपादक देवीदास दत्तात्रेय वाडेकर यांचे निधन.

1995 - अभिनेता जलाल आगा यांचे निधन.

1997 - ज्ञानेश्वरांच्या प्रतिमेचे टपाल तिकीट प्रकाशित.

 

Web Title: todays born baby horoscope rashi bhavishya todays panchang special days marathi 5 march 2019

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.