Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग, बुधवार 30 जानेवारी 2019
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2019 10:22 IST2019-01-30T10:09:16+5:302019-01-30T10:22:43+5:30
वृश्चिक राशीत जन्मलेली आजची मुलं निर्धार आणि कल्पकता यांच्या सहकार्याने आगेकूच सुरू ठेवतील. शिक्षणातील प्रगती विशेष राहील.

Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग, बुधवार 30 जानेवारी 2019
वृश्चिक राशीत जन्मलेली आजची मुलं निर्धार आणि कल्पकता यांच्या सहकार्याने आगेकूच सुरू ठेवतील. शिक्षणातील प्रगती विशेष राहील. व्यवहारात अधिकार ते उद्योग असा प्रवास करता येऊ शकेल.
जन्माक्षर - वृश्चिक राशी न, य अद्याक्षर.
(अरविंद पंचाक्षरी यांच्याकडून)
आजचं पंचांग
बुधवार 30 जानेवारी 2019
भारतीय सौर 10 माघ 1940
मिती पौष वद्य दशमी 15 क. 34 मि.
अनुराधा नक्षत्र 16 क. 40 मि., वृश्चिक चंद्र
सुर्योदय 07 क. 15 मि., सूर्यास्त 06 क.29 मि.
दिनविशेष
हुतात्मा दिन, कुष्ठरोग निवारण दिन
1929 - अभिनेते रमेश देव यांचा जन्म.
1948 - महात्मा गांधींची हत्या.
1948 - लेखिका, कादंबरीकार काशीबाई गोविंदराव कानिटकर यांचे निधन.
1949 - नाटककार सतीश आळेकर यांचा जन्म.
1996 - हार्मोनियम व ऑर्गनवादक गोविंदराव पटवर्धन यांचे निधन.
2000 - मानववंशशास्त्रज्ञ आचार्य जनार्दन हरी चिंचाळकर यांचे निधन.
2002 - डॉ. शरदकुमार दीक्षित यांना 'एनआरआय ऑफ द इयर 2001' पुरस्कार जाहीर.