Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग सोमवार, 25 फेब्रुवारी 2019
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2019 08:41 IST2019-02-25T08:40:24+5:302019-02-25T08:41:28+5:30
आज जन्मलेली मुलं... कोणती असेल रास?, कसा होईल प्रवास?

Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग सोमवार, 25 फेब्रुवारी 2019
16 क. 2 मि. पर्यंत तुला राशीची मुलं असतील. पुढे वृश्चिक राशीत मुलांचा प्रवेश होईल. अभिनव कार्ययंत्रणा आणि प्रयत्नांतील जिद्द असे कार्यप्रवाह असतील. गुरूकृपेने त्यात आपणास यश मिळेल. पदवी ते प्राप्ती त्यामध्ये असतील.
तुला राशी न, त, वृश्चिक राशी न, य आद्याक्षर.
(अरविंद पंचाक्षरी यांच्याकडून)
आजचं पंचांग
सोमवार, दि. 25 फेब्रुवारी 2019
- भारतीय सौर 06 फाल्गुन 1940
- मिती माघ वद्य सप्तमी, 28 क. 47 मि.
- विशाखा नक्षत्र 22 क. 08 मि.
- तुला चंद्र 16 क. 02 मि.
- सूर्योदय 07 क. 02 मि., सूर्यास्त 06 क. 42 मि.
दिनविशेष
1840 - बालवाङ्मयाचे जनक विनायक कोंडदेव ओक यांचा जन्म.
1894 - भारतीय तत्त्वज्ञानी मेहेरबाबा यांचा जन्म.
1938 - अष्टपैलू क्रिकेटपटू फारुख इंजिनिअर यांचा जन्म.
1948 -अभिनेता डॅनी डेंग्जोप्पा यांचा जन्म.
1964 - अभिनेत्री शांता आपटे यांचे निधन.
1981 - हिंदी चित्रपट सृष्टीतील अभिनेता शाहिद कपूर यांचा जन्म.
2002 - अभिरुचीचे संपादक पुरुषोत्तम चित्रे यांचे निधन.