Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग शुक्रवार, 22 फेब्रुवारी 2019
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2019 11:11 IST2019-02-22T11:09:48+5:302019-02-22T11:11:04+5:30
आज जन्मलेली मुलं... कोणती असेल रास?, कसा होईल प्रवास?

Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग शुक्रवार, 22 फेब्रुवारी 2019
कन्या राशीत जन्मलेल्या आजच्या मुलांचा प्रतिनिधी बुध आहे आणि यश संपादन करण्यास त्यांचा उपयोग होईल. अचूक निर्णय, वेगवान कृती ही त्याची केंद्र राहतील. शिक्षणात पदवी संपादन करू शकतील.
कन्या राशी प, ठ ण आद्याक्षर.
शुक्रवारी दिनांक 22 फेब्रुवारी 2019
- भारतीय सौर 03 फाल्गुन 1940
- मिती वाघ वद्य तृतीया 10 क. 50मि.
- हस्त नक्षत्र 24 क. 17 मि. कन्या चंद्र
- सूर्योदय 07 क. 04 मि., सूर्यास्त 06 क. 40 मि.
- संकष्टी चतुर्थी (चंद्रोदय 21 क. 36 मि.)
दिनविशेष
1854 - कावसची नानाभाई डावर यांनी बॉम्बे स्पिनिंग मिल्स नावाने मुंबईत पहिली कापड गिरणी सुरू केली.
1936 - सुलेखनकार, संकल्पनाकार, कवी र.कृ.जोशी यांचा जन्म.
1944 - महात्मा गांधी यांच्या पत्नी कस्तुरबा गांधी यांचे निधन.
1958 - स्वातंत्र्य संग्रामातील विद्वान, भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद यांचे निधन.
2000 - प्रसिद्ध साहित्यिक विनायक सदाशिव तथा वि.स. वाळिंबे यांचे निधन.
2009 - बहुरंगी मराठी लेखक, नाट्य अभिनेते डॉ. लक्ष्मण देशपांडे यांचे निधन.