Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग सोमवार, 18 फेब्रुवारी 2019
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2019 09:28 IST2019-02-18T09:05:30+5:302019-02-18T09:28:14+5:30
आज जन्मलेली मुलं... कोणती असेल रास?, कसा होईल प्रवास?

Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग सोमवार, 18 फेब्रुवारी 2019
कर्क राशीत जन्मलेल्या आजच्या मुलांना रवि-हर्षल शुभयोगाचे मिळणारे सहकार्य काही प्रांतात चमत्काराचे ठरू शकेल. शिक्षण ते व्यापार अशी वर्तुळं त्यात येतील. परदेशाशी संबंध येणे शक्य आहे.
कर्क राशी ड, ह आद्याक्षर.
(अरविंद पंचाक्षरी यांच्याकडून)
आजचं पंचांग
सोमवार, दि. 18 फेब्रुवारी 2019
- भारतीय सौर 29 माघ 1940
- मिती माघ शुद्ध चतुर्दशी, 25 क. 12 मि.
- पुष्य नक्षत्र 14 क. 02 मि., कर्क चंद्र
- सूर्योदय 07 क. 07 मि., सूर्यास्त 06 क. 39 मि.
दिनविशेष
1745 - विद्युत-घटाच्या साह्याने विजेचा प्रवाह निर्माण करणाऱ्या अलेस्सांड्रो व्होल्टा यांचा जन्म.
1823 - लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख यांचा जन्म.
1836 - विवेकानंदांचे गुरू रामकृष्ण परमहंस यांचा जन्म.
1911 - इतिहास कादंबरीकार कॅप्टन वासुदेव श्रीपाद बेलवलकर यांचा जन्म.
1936 - लेखक, संपादक व विचारवंत वसंत विष्णू पळशीकर यांचा जन्म.
1967 - अणुबॉम्बचे निर्माते रॉबर्ट ओपेन हैमर यांचे निधन.