Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग गुरुवार, 14 मार्च 2019
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2019 09:01 IST2019-03-14T08:45:53+5:302019-03-14T09:01:46+5:30
आज जन्मलेली मुलं... कोणती असेल रास?, कसा होईल प्रवास?

Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग गुरुवार, 14 मार्च 2019
16 क. 58 मि. पर्यंत वृषभ राशीत जन्मलेली मुलं असतील. त्यानंतर मिथुन राशीत राहतील. आधुनिकता आणि कल्पकता अशी प्रक्रिया त्यांचे कार्यवर्तुळात राहते. त्यातू परिचितांचा परिवार मोठा होतो.
वृषभ राशी - ब, व, ऊ
मिथुन राशी - क, छ, घ आद्याक्षर.
(अरविंद पंचाक्षरी यांच्याकडून)
आजचं पंचांग
गुरुवार, दि. 14 मार्च 2019
- भारतीय सौर 23 फाल्गुन 1940
- मिती फाल्गुन शुद्ध अष्टमी 27 क. 22 मि.
- मृग नक्षत्र 28 क. 42 मि., वृषभ चंद्र 16 क. 58 मि.
- सूर्योदय 06 क. 49 मि., सूर्यास्त 06 क. 47 मि.
- दुर्गाष्टमी
दिनविशेष
1883 - साम्यवादी विश्वक्रांतीचे पुरस्कर्ते कार्ल मार्क्स यांचे निधन.
1931 - आलमआरा पहिला भरातीय बोलपट चित्रपटगृहात सादर.
1931 - ख्यातनाम अभिनेते प्रभाकर पणशीकर यांचा जन्म.
1965 - अभिनेता आमीर खान याचा जन्म.
1973 - निर्माता दिग्दर्शक रोहित शेट्टी यांचा जन्म.
1998 - अभिनेते, दिग्दर्शक, 1970 नंतरच्या कालखंडातील यशस्वी निर्माते दादा कोंडके यांचे निधन.
2003 - गझलसम्राट सुरेश भट यांचे निधन.
2010 - ज्ञानपीठप्राप्त कवी विंदा करंदीकर यांचे निधन.