Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग, शुक्रवार 1 फेब्रुवारी 2019
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2019 09:33 IST2019-02-01T09:19:49+5:302019-02-01T09:33:28+5:30
वृश्चिक राशीत जन्मलेली आजची मुलं निर्धार आणि कल्पकता यांच्या सहकार्याने आगेकूच सुरू ठेवतील.

Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग, शुक्रवार 1 फेब्रुवारी 2019
वृश्चिक राशीत जन्मलेली आजची मुलं निर्धार आणि कल्पकता यांच्या सहकार्याने आगेकूच सुरू ठेवतील. शिक्षणातील प्रगती विशेष राहील. व्यवहारात अधिकार ते उद्योग असा प्रवास करता येऊ शकेल.
जन्माक्षर - वृश्चिक राशी न, य आद्याक्षर
(अरविंद पंचाक्षरी यांच्याकडून)
आजचं पंचांग
शुक्रवार, 1 फेब्रुवारी 2019
भारतीय सौर 12 माघ 1940
मिती पौष वद्य द्वादशी 19 क. 00 मि.
मूळ नक्षत्र 21 क. 07 मि. धनु चंद्र
सुर्योदय 07 क. 14 मि., सूर्यास्त 06 क.30 मि.
दिनविशेष
1884 - ऑक्सफर्ड डिक्शनरीची पहिली आवृत्ती प्रसिद्ध झाली.
1894 - संस्कृत कोशकार सिद्धेश्वरशास्त्री चित्राव यांचा जन्म.
1907 - मुमुक्षु साप्ताहिक स्वरुपात संत वाड्मयाचे उपासक ल. रा. पांगारकर यांनी सुरू केले.
1927 - प्रा. डॉ. म.द. हातकणंगलेकर यांचा जन्म.
1929 - ज्योतिर्भास्कर जयंत साळगावकर यांचा जन्म.
1944 - सुप्रसिद्ध पत्रकार अरुण टिकेकर यांचा जन्म.
1957 - चित्रपट अभिनेता जॅकी श्रॉफ याचा जन्म.
1971 - क्रिकेटपटू अजय जडेजा याचा जन्म.
1995 - नाचककार मो. ग. रांगणेकर यांचे निधन.