Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग, मंगळवार 22 जानेवारी 2019
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2019 10:46 IST2019-01-22T10:27:52+5:302019-01-22T10:46:08+5:30
सिंह राशीची मुलं जन्माला येतील. शुक्र-गुरू युतीचे शुभ परिणाम मुलांना आशीर्वाद ठरतील. शिक्षण, व्यवहार या व्यतिरिक्त कला, साहित्य यांची आवड राहील.

Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग, मंगळवार 22 जानेवारी 2019
23 क. 32 मि. पर्यंत कर्क राशीत जन्मलेली मुलं असतील. त्यानंतर सिंह राशीची मुलं जन्माला येतील. शुक्र-गुरू युतीचे शुभ परिणाम मुलांना आशीर्वाद ठरतील. शिक्षण, व्यवहार या व्यतिरिक्त कला, साहित्य यांची आवड राहील.
जन्मनाव - कर्क राशी ड, ह व सिंह राशी म, ट आद्याक्षर
(अरविंद पंचाक्षरी यांच्याकडून)
आजचं पंचांग
मंगळवार, 22 जानेवारी 2019
भारतीय सौर 02 माघ 1940
मिती पौष वद्य द्वितीया 27 क. 26 मि.
आश्लेषा नक्षत्र 23 क. 32. मि, कर्क चंद्र 23 क. 32 मि.
सूर्योदय 07 क.16 मि., सूर्यास्त 06 क. 25 मि.
दिनविशेष
1899 - हिंदुस्थानी संगीततज्ज्ञ दिलीपकुमार रॉय यांचा जन्म.
1901 - भारतीय मानवशास्त्रज्ञ निर्मलकुमार बोस यांचा जन्म.
1911 - मराठी लेखक अनिरुद्ध घनश्याम रेळे यांचा जन्म.
1922 - मुत्सद्दी व शांततेच्या नोबेलचा मानकरी बायर फिद्रिक यांचे निधन.
1922 - मराठी लेखिका शांता बुद्धिसागर यांचा जन्म.
1934 - हिंदी चित्रपट निर्माते, दिग्दर्शक विजय आनंद यांचा जन्म.
1972 - राजनीतिज्ञ आणि शिक्षणतज्ज्ञ स्वामी रामानंद तीर्थ यांचे निधन.