शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

नाते अर्धांगिनीचे; त्याग आणि समर्पणाचे..

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2019 21:48 IST

ती घराची शोभा असते तिचा आदर करा..

एक रामलाल नावाचा घरगडी होता. तो आपल्या बायकोला खूप घाबरत असे. दिसायला हट्टा कट्टा होता पण तरी देखील बायकोला घाबरत असे. एक दिवस मालकाने त्याला विचारले रामलाल, तू बायकोला एवढा का घाबरतोस.? त्यावर त्याने उत्तर दिले, साहेब मी घाबरत नाही तर तिची कदर करतो, तिचा सन्मान करतो. त्याचे हे बोलणे ऐकून मालक हसून म्हणाले, तिच्यामध्ये असे काय आहे, ना ती सुंदर आहे, ना ती सुशिक्षित आहे.रामलाल म्हणाला, काही फरक पडत नाही..साहेब ती कशी आहे, पण मला सगळ्यात प्रेमाचे नाते तिचेच वाटते. त्याचे बोलणे ऐकून मालक म्हणाला. बायकोचा बैल आहेस, तिच्या पदराला बांधून घेतले आहे. स्वत:ला आणि इतर सगळ्या नात्यांची किंमत नाही तुला.......

रामलालने सगळे शांतपणे ऐकून घेतले आणि उत्तर दिले. साहेब आई-वडील नातेवाईक नसतात, ते देव असतात. त्याच्यासोबत नाते नसते निभवायचे, त्यांची पूजा करायची असते. भाऊ-बहिणी सोबत नाते हे जन्मजात असते. मैत्रीचे नाते हे स्वार्थाचे.. आपलेच नाते पहा फक्त पैसे आणि गरजेचे आहे, पण पत्नी कोणतेही नाते नसताना देखील कायमची आपली होऊन जाते. आपले सगळे नाते सोडून ती आपल्यासोबत येते आणि आपले सगळे सुखदुख एकत्र जगते आणि शेवटच्या श्वासापर्यत सोबत करते. एका नोकराचे आपल्या पत्नी बद्दल काय विचार आहेत हे मालक ऐकत होते. तो पुढे म्हणाला साहेब, पत्नी म्हणजे केवळ एक नाते नाही तर अनेक नात्यांचा भांडार आहे. जेव्हा ती आपली सेवा करते, आपल्यावर प्रेम करते तेव्हा ती एका आई प्रमाणे करते. जेव्हा ती जीवनातील उतार चढावा बद्दल सूचित करते आणि मी आपली सगळी कमाई तिच्या हातात देतो कारण मला माहित आहे कि, ती आपल्या घराचे हित साधेल तेव्हा ती एका पित्या सारखी असते. तो पुढे म्हणाला, जेव्हा ती आपली काळजी घेते आपले लाड करते, आपल्या चुकांवर रागावते आपल्यासाठी खरेदी करते तेव्हा ती आपल्या बहिणी प्रमाणे होते. जेव्हा ती आपल्याकडे नवनवीन फरमाइश करते, नखरे करते, रुसते, हट्ट करते तेव्हा ती मुली सारखी होते. जेव्हा ती आपल्या सोबत सल्लामसलत करते, कुटुंब चालवण्यासाठी सल्ले देते, भांडण करते तेव्हा एका मित्रा सारखी होते. जेव्हा घरातील सगळे देणेघेणे, खरेदी, घर चालवण्याची जिम्मेदारी उचलते तेव्हा ती एक मालकीण होते. तो पुढे म्हणाला आणि जेव्हा ती सगळ्या जगाला विसरून एवढेच नाही आपल्या मुलांना देखील सोडून आपल्या मिठीत येते तेव्हा ती प्रेमिका, अर्धांगिनी, आपला प्राण आणि आत्मा होते. जी आपले सर्वस्व आपल्या स्वाधीन करते. मी तिचा सन्मान करतो तर हे काही चूक करतो का साहेब? मालक सगळे बोलणे ऐकत होता. हे सगळे ऐकून तो स्तब्ध झाला. एका निरक्षर आणि गरिबीमध्ये जीवन जगणाऱ्या व्यक्तीकडून आज जीवनाचा नवीन विचार मिळाला होता. मित्रांनो, नवरा बायकोचे नाते हे खुप महत्वाचे असते .ते मनापासून जपा . दोघांनीही एकमेकांचा आदर करा . व आनंदी रहा .पत्नी ही आपल्या घरासाठी पूर्णत: झोकून देते . त्याग व समर्पण हे निसर्गत: तिच्या स्वभावात असते. ती घराची शोभा असते तिचा आदर करा . 

टॅग्स :PuneपुणेAdhyatmikआध्यात्मिकrelationshipरिलेशनशिपmarriageलग्न