शहरं
Join us  
Trending Stories
1
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
2
मर्सिडीज-हुरुनचा अहवाल आला! भारतात करोडपतींच्या संख्येत ९० टक्क्यांनी वाढ..., महाराष्ट्र टॉपर, प्रचंडच...
3
मारुती अल्टोपेक्षा ही कार स्वस्त झाली; जीएसटीने कमालच केली, मारुतीचे जगच इकडचे तिकडे केले...
4
'हैदराबाद गॅझेटिअरच्या नावाखाली सरकारने फसवणूक केली'; मराठा गोलमेज परिषदेत आरोप
5
अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे विमान न्यू यॉर्कमध्ये अपघातातून थोडक्यात बचावले...
6
तज्ज्ञांचा इशारा...! ‘या’ बँकेचा स्टॉक 17 रुपयांपर्यंत कोसळणार, गुंतवणूकदारांचे टेन्शन वाढले; SBI सह अनेक दिग्गजांनी शेअर विकले
7
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
8
मतचोरीचा राहुल गांधींचा आरोप, एकनाथ शिंदेंचे खुले आव्हान; म्हणाले, “ठोस पुरावे द्या अन्...”
9
शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर काढा ! सातबारा कोरा करण्यासाठी कर्जमुक्ती करा
10
Nanded: शांतता बैठकीतच मराठा-ओबीसी वादाला हिंसक वळण, रिसनगावात ४ जखमी
11
हैदराबाद गॅझेटवर हायकोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्यांना सुनावले, आता मराठा आरक्षणाचे काय?
12
डोनाल्ड ट्रम्प यांची माघार! लवकरच भारतावरील शुल्क हटवणार; कुणी केला दावा? पाहा...
13
“GST सुधारणा हा राहुल गांधींच्या दूरदृष्टीचा विजय, २२ तारखेला राज्यभर पेढे वाटणार”: काँग्रेस
14
Sairat: 'सैराट' सिनेमात रिंकू राजगुरुच्या आईवडिलांचीही दिसलेली झलक, कोणता आहे तो सीन?
15
यंदाच्या गणेशोत्सवात तब्बल ६ लाख कोकणवासीयांचा STने सुखरुप प्रवास; २३ कोटींचे उत्पन्न
16
'खोटारडं' पाकिस्तान पुन्हा उघडं पडलं... मॅच रेफरीच्या केबिनमध्ये काय घडलं? सत्य समोर आलं...
17
Kangana Ranaut : "माझ्याच हॉटेलचा काल ५० रुपयांचा धंदा", पूरग्रस्तांसमोर कंगना राणौतने मांडली स्वत:चाची व्यथा
18
अभिमानास्पद! वडील हवाई दलात अधिकारी, लेक झाली लेफ्टनंट; इंजिनिअरिंगनंतर देशसेवेचं स्वप्न
19
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
20
Video: उंटाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू

नमाज अन् अजान...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2020 15:28 IST

इस्लाममध्ये ईश्वरनिष्ठा आणि इमानला मूलतत्त्वांमध्ये केंद्रस्थानी मानण्यात आले आहे.

इस्लाममध्ये ईश्वरनिष्ठा आणि इमानला मूलतत्त्वांमध्ये केंद्रस्थानी मानण्यात आले आहे.  दिवसातून पाचवेळा नमाज पठण करणे इमानचे प्रतीक समजले जाते. या नमाजची सुरुवात कधी झाली याचा मोठा इतिहास आहे. विस्तारभयास्तव तो इतिहास इथे मांडणे शक्य नाही.

इस्लाम धर्मात वेगवेगळ्या पद्धतीच्या उपासना सांगितलेल्या आहेत. त्यापैकी नमाज ही एक उपासना आहे. ज्याचा इबादत या प्रार्थनाश्रेणीत समावेश होतो. ‘नमाज’ म्हणून ज्या प्रार्थनाविधीचा उल्लेख केला जातो, त्याला अरबी भाषेत ‘सलात’ अशी संज्ञा आहे. कुराणात ‘सलात’ शब्द अनेकदा आलेला आहे. खाली वाकणे, भूमीवर डोके टेकवून प्रणाम करणे आणि कुरआनच्या ऋचांचे पठण करणे ही नमाजची तीन प्रमुख अंगे होत. प्रत्येक मुस्लीम व्यक्तीने यथासमय नमाज पढलीच पाहिजे. नमाज प्रत्येक मुस्लीम व्यक्तीस अनिवार्य आहे. दैनंदिन नमाजप्रमाणेच आपत्कालीन, साप्ताहिक व नैमित्तिक नमाजही सांगितलेली आहे. 

मात्र नमाजसाठी दिल्या जाणाºया अजानचे महत्त्व आणि त्याचे स्वरुप याविषयी आपण चर्चा करुयात. प्रेषितांनी इस्लाम आणि प्रेषितत्वाची घोषणा केल्यानंतर काही विश्वासू आणि प्रेषितांवर प्रेम करणाºया त्यांच्या सहकाºयांनी इस्लामचा स्वीकार केला. प्रेषितत्वाची घोषणा झाल्यानंतर मक्केत मुस्लिमांचा प्रचंड छळ करण्यात आला. त्यानंतर प्रेषितांनी मक्का येथून प्रचंड हालअपेष्टा सहन करत मदिनेकडे स्थलांतर केले. मदिना येथे गेल्यानंतर प्रेषितांना आणि मुस्लिमांना पूर्ण धार्मिक स्वातंत्र्य मिळाले. तेव्हा मशिदची उभारणी करण्यात आली. आणि पाचवेळच्या नमाजसाठी मशिदीचा वापर करण्याचे निश्चित करण्यात आले. त्यानंतर लोकांना नमाजसाठी कसे बोलवायचे यावर बराच ऊहापोह करण्यात आला. तेव्हा चर्चेअंती अजान देण्याचा निर्णय घेण्यात आला. हबशी गुलाम राहिलेल्या हजरत बिलाल यांना प्रेषितांनी अजान देण्यास सांगितले. त्या अजानचे शब्द आणि त्याचा अर्थ असा होता.

अल्लाहु अकबर, अल्लाहु अकबर (अल्लाह महानतम आहे.) अश्हदु अल्ला इलहा इलल्लाह (मी ग्वाही देतो की, अल्लाह एक आहे.)अश्हदु अन्ना मुहम्मद अर रसुलुल्लाह (मी साक्ष देतो , की मुहम्मद (स.) हे अल्लाहचे प्रेषित आहेत. )हय्य अलसल्लाह, हय्या अलसल्लाह (नमाजकडे या)हय्य अलल्फलाह , हय्या अल्लफलाह (समृद्धी व सफलतेकडे या)अल्लाहु अकबर, अल्लाहु अकबर, ला इलाह इलल्लाह (अल्लाह महानतम आहे. अल्लाह महानतम आहे. अल्लाहखेरीज कोणीही र्ईश्वर नाही.) सकाळी पठण केल्या जाणाºया पहिल्या नमाजसाठी दिल्या जाणाºया अजानमध्ये ‘अस्सलातु खैरउम मिन नौम’ (निद्रेपेक्षा नमाज उत्तम आहे.) हे शब्द सम्मिलीत केले जातात. 

प्रेषित मोहम्मद (स.) हे मक्कावासीयांच्या छळाला कंटाळून मदिना शहरात आले. त्यानंतर काही दिवसातच तिथे इस्लाम धर्माच्या इतिहासातील पहिली मसजिद बांधली. ती मसजिद बांधल्यानंतर प्रेषितांनी हजरत बिलाल यांना अजान देण्यास सांगितले. ही अजान इस्लामच्या इतिहासातील पहिली अजान मानली जाते. हजरत बिलाल हे निग्रो गुलाम होते. प्रेषितांच्या सहकाºयांनी बिलाल यांच्या मालकाला त्यांचे मूल्य देऊन स्वातंत्र्य प्रदान केले होते. इस्लामी समतेचा विचार मांडताना अनेक अभ्यासक  या घटनेचा उल्लेख करतात. वर्णव्यवस्थेत गुरफटलेल्या अरबी समाज जीवनात ही एक प्रकारची क्रांती होती. प्रेषितांनी केलेल्या या वर्णभेदविरोधी क्रांतीमुळेच आज अरबस्तानात समता प्रस्थापित होऊ शकली, हे वास्तव आहे. -आसिफ इक्बाल

टॅग्स :SolapurसोलापूरAdhyatmikआध्यात्मिकRamzanरमजान