शहरं
Join us  
Trending Stories
1
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
2
IND vs ENG 5th Test Day 2, Stumps : दिवसभरात १५ विकेट्स! यशस्वी खेळीसह टीम इंडियाला दिलासा
3
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
4
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
5
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
6
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
7
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
8
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
9
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
10
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
11
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
12
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
13
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
14
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
15
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
16
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
17
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
18
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
19
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
20
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर

पालकांनो सावधान,मुलांना कुठले शिक्षण देताय ? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2020 13:26 IST

दुसर्‍याविषयी आदर -सेवाभाव - मैत्री निर्माण करून माणसाने - माणसाशी - माणसाप्रमाणे वागण्याच्या शिक्षणाची आजच्या पिढीला गरज आहे.

- डॉ. दत्ता कोहिनकर कुटुंबातील आई-वडलांनी उपाशी राहून आपल्या दोन मुलांना उच्च शिक्षण दिले. मुलही अभ्यासात हुशार, दोघांनी शिक्षण घेऊन अमेरिकेत उच्च पदावर नोकरी मिळवली. अमेरिकेत आपले मजबूत बस्तान बसवले. दोघांनीही अमेरिकन मुलीशी लग्न करून तेथेच संसार थाटला, आता त्यांचे भारतात येणं दुर्मिळ झालं. अशातच आई गेल्याची वार्ता दोघांनाही पोहचली. धाकटा मुलगा उशिरा, सर्व सोपस्कार झाल्यावर गावी पोहचला. दोन दिवस थांबून त्याने वडिलांच्या हातावर एक लाख रूपये ठेवले व त्यानंतर म्हणाला बाबा मी निघतोय, आज रात्रीची फ्लाईट आहे.दुःखी कष्टी बाबा न राहवून बोलले, अरे तू आलास पण तुझा दादा ? त्यावेळेस तो मुलगा म्हणाला, त्याचं काय आहे बाबा, मी दादाला फोन केला होता, मात्र वर्कलोड जास्त असल्याने त्याला येणे शक्य नव्हते.तोच म्हणाला, यावेळी तू जा,-बाबांच्या वेळी मी जाईन. बाबा आतल्या आत उन्मळून पडले. डोळयांतून अश्रुच्या धारा वाहू लागल्या. उच्चशिक्षण मी दोनही मुलांना देऊ शकलो पण कर्तव्य व माणुसकीचे अर्थात नैतिक मूल्यांचे शिक्षण मी त्यांना देऊ शकलो नाही या विचारांनी त्यांचे अंतःकरण उद्विग्न झाले. पूर्वी लोक कमी शिकलेली होती. वाडयात एका घरात एखादी व्यक्ती मयत झाली, तर सगळया वाडयात सुतक असायचे. कोणीही आपल्या घरात रेडिओ देखील लावत नसत. ज्या घरात मयत झाली त्या घरातील लोकांना , शेजारी-पाजारी, न्याहारी, भोजन आणून खावयास लावत व मयताच्या सगळया विधीमध्ये वाडयातील लोकांचा सहभाग असे. वाडा हेच एक कुटूंब असतं. आज लोक खूपच शिकतात. पण खालच्या मजल्यावर मयत झाली असेल तर चौथ्या मजल्यावर दार बंद करून श्रीखंड - पुरीचे जेवण चाललेले असते. दुःख सावरायला येणार कोण ? दरवाज्यावर मोठमोठया पदव्या असतात पण दरवाजे आतूनच बंद असतात. बिल्डींगमधील लोकांची नावे पण बर्‍याच जणांना माहीत नसतात, असे शिक्षण काय कामाचे ? आज मुलांना चारित्र्य घडवणारे व मानसिक बल वाढवून, बुद्धी विशाल करणारे, नैतिक मूल्य जोपासणारे शिक्षण देणे गरजेचे आहे. ज्यामुळे करूणा - मैत्री - मुदीता - उपेक्षा - निःस्वार्थ वृत्ती उदयास येते ,असे शिक्षण आज लुप्त झाले आहे. माणसाच्या मनात दुसर्‍याविषयी आदर -सेवाभाव - मैत्री निर्माण करून माणसाने - माणसाशी - माणसाप्रमाणे वागण्याच्या शिक्षणाची आजच्या पिढीला गरज आहे. कृतज्ञता जागवणारे शिक्षण आज दिले गेले पाहिजे. एक तारखेला पगार घेणे व आयुष्यभर दाराला आतुन कडी लावून घेणे, रस्त्यावर कोणी चक्कर येऊन पडला तरी मला काय घेणे आहे,  या विचारसरणीचे उच्चाटन करणारे शिक्षण आजच्या शाळेत शिकवायला हवे. कर्मवीर भाऊराव  पाटील मुलांना झोपडी बांधायला शिकवत, स्वयंपाक करायला, शब्दकोश पाहायला शिकवत, रविंद्रनाथ टागोर विदयार्थ्यांना नम्रपणे सर्व प्रकारची कामे करायला शिकवत. इंदिरा गांधीना टागोरांच्या संस्थेत पाठवताना नेहरूंनी टागोरांना कळवले होते, ह्यह्यतिला हाताने काम करू दया, डोळयाने जग पाहू दया मनाने विचार करू दया. माझी मुलगी म्हणून कुठल्याही प्रकारची सवलत तिला देऊ नका.ह्णह्ण अब्राहम लिंकनने मुलाच्या मुख्याध्यापकाला लिहिलेल्या पत्रात उल्लेख केला होता, माझ्या मुलाला जगात कसं जगायचं व विषम परिस्थितीत कस वागायचं हे शिकवा असा आग्रह केला होता. आज जास्त शिकलेली लोक भौतिक जगात अन्यायाविरूध्द दंड थोपटण्यास पुढे येत नाहीत. परमपुज्य डॉ .बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते, ह्यह्यशिक्षण हे वाघिणीचे दुध आहे  - ते जो पिईन तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही.ह्णह्ण म्हणून निस्वार्थता, सेवाभाव, चारित्र्य, नैतिकता, संघभावना, देशप्रेम, शुध्दता,कर्तव्यभावना, करूणा, मैत्री, कृतज्ञता यांचे संमिश्र शिक्षण ही आजच्या काळाची गरज आहे. त्यासाठी चित्त शुध्द करा. ह्यमऊ मेणाहूनी आम्ही विष्णूदास। कठीण वज्रास भेदू ऐसे॥ह्णह्ण असे स्वाभिमानपूर्वक सांगणारे तुकाराम महाराज देखील आवाहन करतात, ह्यह्य   सकळांच्या पाया माझे दंडवत । आपले चित्त शुध्द करा’’ .या चित्तशुध्दीच्या शिक्षणाची आज नितांत गरज आहे

टॅग्स :PuneपुणेAdhyatmikआध्यात्मिकEducationशिक्षण