शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
2
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
3
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
4
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
5
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
6
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
7
९ महिने तपास रखडवला, मुलीचा सांगाडाच हाती; २८ पोलीस निलंबित
8
अवैध प्रवासी वाहतूक बेतली जिवावर, ११ जणांचा मृत्यू, कल्याण-मुरबाड महामार्गावर नेमका कसा घडला अपघात?
9
मतदारसंघ पुनर्रचना अत्यंत धोकादायक अन् संविधानावर हल्ला, सोनिया गांधींची टीका
10
नाकाबंदी : इराणची आर्थिक कोंडी करणारी व्यूहरचना
11
अमेरिकेकडून होर्मुझची नाकाबंदी सुरू; समुद्रात गस्त वाढवली, युद्ध भडकणार
12
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
13
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
14
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
16
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
17
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
18
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
19
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
20
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

आई-वडील हेच पहिले गुरू!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2019 18:06 IST

आई-वडिलांनी मुलाला शिक्षा केली तरीही मुलांनी त्याच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे.

अनेक जन्मीच्या पुण्याचे फलस्वरूप म्हणजे मनुष्य जन्म. मनुष्य जन्म मिळाल्यानंतर सुद्धा अनेक प्रकारे सुयोग्य पद्धतीने जीवन व्यतीत केल्यानंतरच मुक्ती मिळते. मनुष्य जन्म सत्कारणी लावला असता अनंत यमयातनांतून मुक्ती मिळते. मनुष्य स्वभाव विविधरंगी, आणि बहुढंगी असतो. प्रत्येकाची आवड, निवड, आचार, विचार, स्वभाव, बुद्धी आणि शारीरिक क्षमता वेगळी असते आणि त्यानुसारच जो तो आपले जीवन व्यतीत करतो. पण जेव्हा मनुष्य आपल्या कुवतीनुसार योग्य त्या पद्धतीने आयुष्य जगतो तेव्हा त्यांस सदगती प्राप्तं होते.  प्रत्येक मुलाने आई-वडिलांचे कृतज्ञ असले पाहिजे. आपण कोणत्याही सामान्य व्यक्तीपुढे विनम्र झाले पाहिजे. आपण इतरांशी मानसन्मानानेच वागले पाहिजे. प्रत्येक आई-वडिलांनी अनेक कष्ट सोसलेले असतात व त्याग केलेला असतो. जरी शिक्षकांनी अथवा आई-वडिलांनी मुलाला शिक्षा केली तरीही मुलांनी त्याच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे. ते आपल्यावर का रागावले, याचे मुलांनी चिंतन केले पाहिजे. ‘निश्चितच आपली काही चूक असली पाहिजे’, असा सूज्ञ विचार त्याने केला पाहिजे. कारण रागावण्यामुळे आई-वडील किंवा शिक्षक यांचा वैयक्तीक काहीच फायदा होत नाही. आपल्या मुलाने सुधारावे, त्याची वागणूक आदर्श व्हावी व लोकांनी त्याला चांगले म्हणावे या गोष्टींच्या ध्यासापोटी हा राग व रागवणे असते. तिºहाईताच्या मुलांना आई-वडील रागावत नाहीत. आपल्या मुलाच्या प्रेमापोटी हा राग असतो व यामुळे मुलांनी याबद्दल मनात राग न धरता आई-वडील व शिक्षक यांचे आभारच मानले पाहिजेत. या जगात फुकट अशी कोणतीच गोष्ट मिळत नाही. आपले आई-वडील आपल्याला खाऊ, खेळणी अन्न, वस्त्र इत्यादी सर्व गोष्टी मायेने पुरवतात. त्याच्या बदल्यात मुले त्यांना काय देतात ? ते पैसे तर देऊ शकत नाहीत. निदान मुलांनी आई-वडिलांना आदर तरी द्यावा. घरातील वडील मंडळींच्या दररोज पाया पडून त्यांचे आशीर्वाद घ्यावेत. एखाद्याने आपल्याला काही दिले, तर आपण त्यांचे आभार मानतो. आदरपूर्वक आभार मानण्याची अथवा कृतज्ञता व्यक्त करण्याची पारंपरिक भारतीय पद्धती म्हणजे वाकून नमस्कार करणे होय. काही मुलांना आपल्या आई-वडिलांच्या पाया पडायची लाज वाटते. आपली आई आपले मल-मूत्र साफ करणे, कपडे धुणे, आपल्याला आवडणारे जेवण करणे, जेवू घालणे यासाठी दिवसातून कितीतरी वेळा आपल्यासाठी खाली वाकते. मुलाच्या चुकीमुळे काही वेळा आई-वडिलांना शरमेने मान खाली घालावी लागते. या सर्व गोष्टींची परतफेड करता येणे शक्यच नाही. मग निदान आई-वडिलांना खाली वाकून नमस्कार करण्यात मुलांना मुळीच लाज वाटू नये.

- मीना चंदनदहीगाव, ता. तेल्हारा.

टॅग्स :spiritualअध्यात्मिकAdhyatmikआध्यात्मिक