शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
2
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
3
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
4
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
5
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
6
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
7
९ महिने तपास रखडवला, मुलीचा सांगाडाच हाती; २८ पोलीस निलंबित
8
अवैध प्रवासी वाहतूक बेतली जिवावर, ११ जणांचा मृत्यू, कल्याण-मुरबाड महामार्गावर नेमका कसा घडला अपघात?
9
मतदारसंघ पुनर्रचना अत्यंत धोकादायक अन् संविधानावर हल्ला, सोनिया गांधींची टीका
10
नाकाबंदी : इराणची आर्थिक कोंडी करणारी व्यूहरचना
11
अमेरिकेकडून होर्मुझची नाकाबंदी सुरू; समुद्रात गस्त वाढवली, युद्ध भडकणार
12
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
13
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
14
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
16
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
17
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
18
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
19
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
20
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

विकारावर मात करून आत्मज्ञानातूनच लाभेल शांती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2019 16:59 IST

आत्मज्ञानानेच परम शांतीपर्यंत पोहोचता येते..!

- ह.भ.प. भरतबुवा रामदासी (बीड)

आजच्या युगात आपण क्रांतीची भाषा सतत बोलत असतो पण शांतीतून देखील क्रांती निर्माण होते. संतांनी शांतीतून क्रांती केली. खलाची दुष्ट प्रवृत्ती बदलण्यासाठी कुठल्याही संतांनी हातात शस्त्र घेतले नाही. शांती याच जीवन मूल्याचा विचार त्यांनी आचारसिद्ध केला. आज सुधारलेल्या जगात बिघडलेला माणूस बघतांना या दैवी संपत्तीचा गुण आचरणात आणण्याची नितांत गरज आहे. आपल्याला सुख हवे ना..? तर मग चित्ताची शांती ढळता कामा नये. कारण अशांतस्य कुत: सुखम्.!अशांत माणसाला सुख लाभत नाही. आपल्या मनांत काम, क्रोध, मोह, मद, मत्सर, अहंकार, हिंसा, भीती इ. विकार निर्माण झाले की माणूस अशांत होतो. या सर्व विकारांचा त्याग करता आला की शांती आपोआप प्राप्त होते.  त्यागात् शांती निरंतरम.! भोगात मिळणारा आनंद क्षणिक असतो. त्यागातून मिळणारा आनंद शाश्वत असतो म्हणून संयमाने आणि विवेकाने आपल्या मनाला हळूहळू शांतीच्या मार्गावर आणता येते. संत विनोबा भावे म्हणाले -राग द्वेष परी जाता आली हातात इंद्रियेस्वामित्वे विषयी वर्ते त्यास लाभे प्रसन्नताप्रसन्नतेने बुद्धीची स्थिरता शीघ्र होतसेचित्ताची शांती ढळू न देता परमेश्वर चरणी अखंड प्रेम ठेवल्याने हे विकार बाधत नाहीत. नसत्या विकारांच्या आहारी गेल्यावर जीवाची केवढी दुर्दशा होते याचे वर्णन माऊली करतात - तरी हे कामु क्रोधु पाहीजया कृपेची साठवण नाही हे कृतांताच्या ठायीमानिजे ती साध्वी शांती नागविलीमग माया मांगिन श्रृंगारली,तिये करवी विटाळविली साधु वृंदेइही संतोष वन खांडीलेधैर्य दुर्ग पाडिलेआनंद रोप सांडिले उघडोनियामनुष्याच्या ठिकाणी असणाऱ्या दैवी संपत्तीवरच त्याची उंची ठरत असते. आपण समाजात कसे वागतो त्यावरच समाजात आपले स्थान ठरत असते. म्हणून जीवनात शांती तत्वांचा अंगिकार करावा. तथागत गौतम बुद्धांनी आयुष्यभर शांतीचा संदेश दिला. अशी शांती येण्याकरता आत्मज्ञान प्राप्त करावे लागेल. गीता माऊली म्हणते -ज्ञानं लब्ध्वा परां शांती..!आत्मज्ञानानेच परम शांतीपर्यंत पोहोचता येते..!(लेखक राष्ट्रीय कीर्तनकार आहेत, त्यांचा संपर्क क्रमांक 9421344960 )

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिकspiritualअध्यात्मिक