शहरं
Join us  
Trending Stories
1
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
2
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
3
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
4
निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल
5
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
6
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
7
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
8
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
9
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
10
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
11
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
12
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
13
मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू
14
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा
15
कुस्तीपटू बजरंग पुनियावर निलंबनाची कारवाई; ‘नाडा’ने अंधारात ठेवल्याचा कुस्ती महासंघाचा आरोप
16
भारत पाकिस्तानविरुद्ध ६ ऑक्टोबरला भिडणार
17
तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत
18
विक्रमी धावसंख्येसह कोलकाता विजयी; नरेनचा निर्णायक अष्टपैलू खेळ; लखनौचा ९८ धावांनी उडवला धुव्वा 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

नान्द्यन्ते प्रविशति सूत्रधार:!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2017 3:22 AM

नाटकाला सूत्रधार असावा लागतो़ संस्कृत नाटकांमध्ये नांदी झाली की सूत्रधार प्रवेश करतो़ ‘नान्द्यन्ते प्रविशति सूत्रधार:! नाटकाची सगळी सूत्रे म्हणे या सूत्रधाराच्या हातात असतात.

- डॉ. गोविंद काळे

नाटकाला सूत्रधार असावा लागतो़ संस्कृत नाटकांमध्ये नांदी झाली की सूत्रधार प्रवेश करतो़ ‘नान्द्यन्ते प्रविशति सूत्रधार:! नाटकाची सगळी सूत्रे म्हणे या सूत्रधाराच्या हातात असतात़ सूत्रधार नाटकालाच असतो असे नाही तर विश्वाची सूत्रे धारण करणारा कोणी एक असतो़ आपल्या हातात काय असते? सूत्रधार नाचवील तसे आपण नाचायचे़ तो खेळवील तसे खेळायचे आणि तो ठेवील तसे राहायचे़ बाप रे बाप! असे जर आहे तर हे मी केले ही भाषा व्यर्थच म्हणावी लागेल़ आजची पिढी तर हीच गर्वाची भाषा बोलते. त्याला स्वाभिमान असेही म्हणतात़ ५० वर्षांपूर्वी ज्येष्ठ मंडळींची भाषा वेगळी होती़ ‘करता करविता तो - वरती बसलाय़’सत्ता या शब्दाने आताच्या घडीला माणसाच्या डोक्यात जी राख घातली आहे ती वेड लावणारीच आहे़ एकवेळ दारूची नशा परवडली, थोड्या वेळाने उतरते तरी़ सत्तेचे तसे नाही़ देवालयात हरिदासीबुवा सत्ता या विषयावरच बोलत होते़ ‘मयि सर्वमिदं प्रोक्तं सूत्रे मणिगता इव’ भगवद्गीतेच्या श्लोकावर बुवा भरभरून बोलले़ सर्वांना एका सूत्रात गोवणारा पुढ्यातच उभा होता़ सारे त्याचेच दर्शन घेत होते़ रंगलेले कीर्तन संपले़ एवढ्यात एक तरुण बुवांच्या चरणावर डोके ठेवता झाला़ ‘बेताल नाचवी सूत्रधार हा कोण. मातीतच अंती त्याचेही निर्वाण’ म्हणजे हा सूत्रधार पण एक दिवस मातीतच जाणार?’ कवितेचा अर्थ समजावून सांगा ना, बुवा! शांतपणे बुवा म्हणाले, हा आहे कवितेचा समारोप, मूळ कविता मोठी आहे़ कवितेचे नाव आहे़ ‘मातीची दर्पोक्ती’़ माती माणसाच्या रूपाला, कर्तृत्वाला, बुद्धीला, पराक्रमाला आव्हान आहे़ तुमचे सौंदर्य, बुद्धी पराक्रम मग ते सिकंदर, वाल्मिकी, मनु सारेच मातीला मिळाले़मातीचा थर मात्र उत्तरोत्तर वाढतो आहे़ मातीच्या बोलण्यात सुद्धा अहंकाराचा दर्प आहे़ त्या अहंकारापोटीच तर ती आव्हान देते आहे़ माणसाच्या कर्तृत्वाला मर्यादा आहेत़ तो तर अजन्मा आहे़ त्याला मर्यादा नाही़ तू महाविद्यालयात शिकणारा तरुण आहेस़ तुझ्या जीवनात दर्पोक्ती येणार नाही़ तुला अहंकाराचा वारा स्पर्श करू शकणार नाही एवढे पाहा़ सूत्रधाराची काळजी तुला नको़ तू केवळ दोन ओळी वाचून तर्क केलास़ कोणतीही गोष्ट मुळापासून अभ्यासावी म्हणजेच यथार्थ आकलन होते़