शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
2
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
3
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
4
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
5
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
6
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
7
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
8
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
9
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
10
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
11
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
12
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
13
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
14
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
15
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
16
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
17
सिक्स बॉल चॅलेंज! नेटमध्ये धोनीने मारले गगनचुंबी षटकार, व्हिडीओ व्हायरल
18
अभिनेत्री लग्नानंतर ६ वर्षांनी होणार आई, व्हिडिओ शेअर करत दिली गुडन्यूज; पतीही आहे अभिनेता
19
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
20
राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

आयुष्यात शाश्वत सापडत नाही, तोवर जीवन आनंदी नव्हे

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2019 05:41 IST

तुम्ही स्वत:ला जे काही समजता त्यापेक्षा जरा जास्त विलक्षण अशा कशाचा तरी जर तुम्हाला स्पर्श झाला असेल, तर कृपया तुमच्या जीवनाचा काही भाग त्या दिशेने समर्पित करा.

- सद्गुरू जग्गी वासुदेवतुम्ही स्वत:ला जे काही समजता त्यापेक्षा जरा जास्त विलक्षण अशा कशाचा तरी जर तुम्हाला स्पर्श झाला असेल, तर कृपया तुमच्या जीवनाचा काही भाग त्या दिशेने समर्पित करा. आयुष्यात प्रत्येक गोष्टीसाठी तुम्ही गुंतवणूक केलेली आहे. तुमच्या उदरनिर्वाहासाठी, तुमच्या सुख-सुविधांसाठी, तुमच्या भावनांप्रति. तर मग हे अगदी महत्त्वाचे आहे की तुमचे जीवन, तुमची ऊर्जा आणि तुमचा वेळ तुमच्या सीमित मर्यादांपलीकडे जाण्याच्या दिशेने गुंतवला पाहिजे. जेंव्हा मी ‘‘तुम्ही कोण आहात’’ असे विचारतो तेव्हा तुम्ही जर प्रामाणिकपणे आपल्या आत डोकावून पाहिलेत, तर सध्या तुम्ही म्हणजे केवळ एक मन आहात - मतांचा ढिगारा ङ्क्त आणि एक शरीर. कितीतरी लोकांची मते, अभिप्राय साठवले गेले आहेत तुमच्या मनात तुमचं शिक्षण, तुमचा समाज, तुमचा धर्म, तुमची संस्कृती.. मतांचे हे मोठे ढीग आणि सोबत हे शरीर. यावाचून आणखी काहीही नाही. आणि या दोन्ही गोष्टी तुमच्याकडे बाहेरून आल्या आहेत. या गोष्टी म्हणजे ‘‘मी’’ असं म्हणण्यासारखं त्यात काहीही नाही. जोपर्यंत तुमच्या आत, शाश्वत, असं काही जोपर्यंत तुम्हाला सापडत नाही, तोवर तुम्ही हे जीवन आनंदी, समाधानी आणि परिपूर्णतेने जगू शकणार नाही. बाहेरून मिळवलेलं कधीही तुमच्याकडून हिरावून घेतलं जाऊ शकतं, म्हणून नेहमी तुम्ही ती गोष्ट तुमच्याकडून हिरावून घेतली जाण्याच्या भीतीत जगत राहणार. तुम्ही कदाचित असा विचार कराल, ‘‘नाही, हा सर्व मूर्खपणा आहे. मी यशस्वी आहे, मी मजेत आहे.’’ आपण यशस्वी आणि मजेत आहात ही उत्तम गोष्ट आहे, पण अशा सुख-सुविधांवर विश्वास ठेवू नका, कारण या प्रकारच्या खुशी आणि स्वास्थ्याची उद्या सकाळी उलथापालथ होऊ शकते.

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक