शहरं
Join us  
Trending Stories
1
Tejas Fighter Jet Crashed : भारताचे लढाऊ विमान तेजस कोसळले, दुबई एअर शो दरम्यान मोठी दुर्घटना; अपघात कॅमेऱ्यात कैद
2
'माझ्याकडून हे SIR चे काम होणार नाही...' गुजरातमध्ये बीएलओ शिक्षकाने आयुष्य संपविले, देशातील आठवा...
3
BSNL ने किंमत न वाढवताही प्लॅन्स केले महाग; 'या' लोकप्रिय रिचार्ज प्लॅन्सची व्हॅलिडिटी घटवली!
4
टाटा-बजाजसह 'हे' शेअर्स आपटले; फक्त एकाच क्षेत्रात वाढ, गुंतवणूकदारांचे ₹४.३० लाख कोटी पाण्यात!
5
बर्फ, दलदल, वाळवंट अन् पाणी..; कुठेही चालण्यास सक्षम, भारतीय सैन्याला मिळणार BvS10 सिंधू आर्मर्ड व्हेईकल
6
Malegaon Dongrale: चिमुकलीवर अत्याचार, लोकांच्या संतापाचा कडेलोट; थेट न्यायालयात शिरण्याचा प्रयत्न, पोलिसांचा लाठीचार्ज
7
"तेव्हा कुणी आलं नाही, आता स्टंटबाजी करायला आले, पण मी मारहाण...", भाजपच्या माजी नगरसेवकांने सांगितलं काय घडलं?
8
सावधान! क्रोम युजर्सना मोठा धोका, गुगलने जारी केली सिक्योरिटी वार्निंग, वेळीच व्हा अलर्ट
9
VIDEO: क्रिकेटच्या पिचवर पडली विकेट! पलाशनं कायम 'स्मृती'त राहिल असं केलं हटके प्रपोज
10
कर्नाटक सरकारमध्ये बदल होणार! डीके शिवकुमार यांच्या समर्थकांच्या हालचाली वाढल्या, काही आमदार दिल्लीत तळ ठोकून
11
उपमुख्यमंत्रिपदाची मागणी का केली नाही? चिराग म्हणाले- मी लालची नाही; मिळाले त्यात समाधानी
12
करिश्मा कपूरनं मुंबईतील १ फ्लॅट भाड्याने दिला; दर महिन्याला किती होणार कमाई? वाचा
13
'नवीन भाडे करार २०२५' : अ‍ॅडव्हान्स म्हणून घेता येईल फक्त २ महिन्यांचे भाडे; घरमालक वाढवू शकणार नाही मनमानी पद्धतीनं भाडं
14
लुटेरी दुल्हन! वय २४ वर्षे अन् केली १५ लग्न; ५२ लाखांचा गंडा, नवऱ्याला सोडून जाते पळून अन्...
15
अरे बापरे सेम टू सेम! हुबेहुब आलिया भटसारखी दिसते ही मराठी अभिनेत्री, फोटो पाहून चक्रावून जाल
16
३ वर्षांचे प्रेमसंबंध आणि लग्न करायला नकार! रागाच्या भरात प्रियकर झाला मारेकरी; दोन वेळा गोळ्या झाडल्या पण... 
17
दिल्ली स्फोट प्रकरणी मोठा खुलासा! 'घरघंटी'च्या मदतीने बनवले होते बॉम्ब; साहित्य जप्त केले
18
IND vs SA 2nd Test: 'आमचं ठरलंय!' गिलच्या जागी कोण? कॅप्टन पंतनं उत्तर दिलं, पण...
19
ट्रम्प ज्युनियर यांचा भारतात शाही मुक्काम! एका रात्रीच्या भाड्यात येईल SUV कार; ताजमहलचा दिसतो व्ह्यू
20
Gold Price Today: ₹३००० नं स्वस्त झालं सोनं, चांदी ₹८००० नं आपटली; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट रेट
Daily Top 2Weekly Top 5

‘जरा जपून’ ...जनी निंदय ते सर्व सोडूनी द्यावे।

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2018 16:04 IST

सुखवस्तू घरातील मेधा दिवसभर पती ऑफिसला गेले की, घरात वेळ जात नाही म्हणून नेटवर बसायची. सहजपणे चॅटींग करता करता एक तिच्यापेक्षा १५ वर्षांनी लहान असणारा मुलगा मेधाच्या प्रेमात पडला.

ठळक मुद्देभारत हा फेसबुकच्या वापरात दुसर्‍या क्रमांकावर किशोरवयीन मुलांची फेक प्रोफाईल्स् व पोर्नोग्राफीला बळी पडून असुरक्षिततेतून आत्महत्येपर्यंत वाटचाल

- डॉ .दत्ता कोहिनकर-प्रतिभा ही कॉन्व्हेंटमधून शिक्षण घेतलेली तरूणी. मित्रांना हस्तांदोलन करणे, सहलीला जाणे, मित्रांशी अरे-तुरे बोलणे यासारख्या मुक्त वातावरणात वाढलेली. तिने हाफ स्लिव्हचा टि-शर्ट घातलेला, स्वतःचा सुंदर हसरा फोटो फेसबुकवर लोड केला. त्याला आलेल्या कमेंटस् वाचून प्रतिभाच्या पतिराजांचा पारा खूपच वर चढला. तुफान भांडणे, आरोप-प्रत्यारोप, शिवीगाळ - परिणाम आज प्रतिभा माहेरी निघून आलेली आहे. ऐश्‍वर्यसंपन्न कुटूंबातील प्रत्येकाला बंगल्यात स्वतंत्र खोली-टुमदार बंगला टोपे साहेबांनी बांधला खरा परंतू, एकुलत्या एका मुलाला त्याच्या स्वतःच्या बेडरूममध्ये दिलेल्या इंटरनेट कनेक्शनच्या माध्यमातून तो काय पाहतोय याकडे आई-बाबांचे दुर्लक्ष. विशाल नेटवर अश्‍लिल साईटस् पाहता पाहता घरात पैशांची चोरी करत वाममार्गाला लागला व गुप्तरोगाची शिकार झाला. यातून खचलेल्या विशालला मानसोपचारतज्ञांची उपचारपध्दती चालू आहेत. मित्रांनो अशा अनेक घटना दैनंदिन जीवनात आपण ऐकत असतो. नैराश्येने पछाडलेली मेधा ध्यानवर्गासाठी आली होती. सुखवस्तू घरातील मेधा दिवसभर पती ऑफिसला गेले की, घरात वेळ जात नाही म्हणून नेटवर बसायची. सहजपणे चॅटींग करता करता एक तिच्यापेक्षा १५ वर्षांनी लहान असणारा मुलगा मेधाच्या प्रेमात पडला. टाईमपास म्हणून मेधाने त्याच्याशी गप्पा मारल्या खरा पण तो किशोरवयीन युवक एकतर्फी भावनेने तिच्यात फार गुंतला होता. शेवटी मेधाच्या घरात ही वार्ता कळाली. भांडणे, तू-तू, मैं-मैं, शिवीगाळ यातून मेधाच्या पतीने घटस्फोटाचा दावा देखील दाखल केला. मेधा आज नैराश्याने ग्रासली आहे. आत्महत्येचे विचार तिला सतावतात. मोबाईल, इंटरनेट या खर्‍या गरजेच्या व उपयुक्त अशा गोष्टी यामुळे ज्ञानवृध्दी, जवळीक, प्रसिध्दी, व्यवसायवृध्दी, वेळेची बचत, जलद संवाद, ओळखी यासारख्या अनेक गोष्टी साधल्यामुळे जीवन सुखी व समृध्द होते. पण या दुधारी तलवारीसारख्या आहेत. मनावर संयम ठेवून नैतिक मुल्यांची जोड देऊन यांचा योग्य वापर केला तर तुम्हाला खूप मदत मिळते पण जर मर्यादा न पाळता सीमारेषा ओलांडली तर मात्र आयुष्य कष्टमय व दुःखमय होण्याची दाट शक्यता असते. चौदा वर्षांच्या रमेशला मोबाईल गेमचे व्यसन लागले होते. वडीलांनी मोबाईल हिसकावून अभ्यास करावयास सांगितले तर रागाच्या भरात रमेशने आत्महत्या केली. पुण्यात नुकतीच घडलेल्या या घटनेवर खूप गंभीर विचारमंथनाची गरज आहे. बेंगलोर हे आय.टी. पार्क शहर बर्‍याचदा दोघेही संगणक अभियंता असल्यामुळे एकमेकांचे अकाऊंट हॅक करून पाहू शकतात. या शहरात मागील वर्षी इंटरनेट व मोबाईलच्या अती व असुरक्षीत वापरामुळे ४,१९२ घटस्फोटांचे दावे न्यायालयात दाखल झाले आहेत. केरळसारख्या सुशिक्षीत शहरात सायबर एक्स्पर्टस्च्या म्हणण्यानुसार २५ % घटस्फोटांचे दावे हे आय.टी. क्षेत्रातील तरूण-तरूणींचे आहेत. भारत हा फेसबुकच्या वापरात दुसर्‍या क्रमांकावर असून १२५ कोटी लोक याचा वापर करीत आहेत. किशोरवयीन मुले फेक प्रोफाईल्स् व पोर्नोग्राफीला बळी पडून असुरक्षिततेचे जीवन जगता जगता आत्महत्येपर्यंत वाटचाल करतात. याच्या अती वापरामुळे शारीरिक क्षमता बल कमी होते, डिप्रेशन, बोटांच्या संवेदना बोथट होणे, पाठदुखी, डोळे कोरडे होणे, मायग्रेन, टयुमर, निद्रानाश या सारख्या अनेक आजारांना तरूण पिढी बळी पडायला लागली आहे. प्रत्येक गोष्टीची चांगली व वाईट अशी बाजू असतेच. आज तरूण पिढीने नेटचा वापर हा चांगल्या गोष्टींसाठी करताना मनावर बंधने घालून वेळेचे भान ठेवावे. चॅटींग करताना सावधानता बाळगावी, पालकांनी आवश्यक त्या साईटस् ओपन ठेवून बाकी घातक अशा साईटस् ब्लॉक कराव्यात. मुले नेट वापरताना दुरून लक्ष ठेवावे. रोज सकाळी लवकर उठून व्यायाम करणे, फिरायला जाणे, ग्रंथपुस्तके वाचणे, ध्यान करणे, निसर्गात भटकणे, आहार-विहार यावर नियंत्रण ठेवणे, एकमेकांशी सुसंवाद साधणे, आवडता छंद जोपासणे, नैतिक मुल्यांची वृध्दी करणे व माणसातील माणूस जागवणे या गोष्टींची आज समाजाला गरज आहे. त्यामुळे जे-जे चांगले आहे त्याचा स्वीकार करा व जे-जे घातक आहे त्याचा त्याग करा. समर्थ रामदास स्वामी म्हणतात ना,‘‘जनी वंदय ते सर्व भावे करावे,जनी निंदय ते सर्व सोडूनी द्यावे ।’’(जे वंदनीय आहे त्याचा स्विकार करावा व जे निंदनीय आहे त्याचा त्याग करावा.)

टॅग्स :PuneपुणेAdhyatmikआध्यात्मिकMeditationसाधना