शहरं
Join us  
Trending Stories
1
"धरणासंदर्भात केलेल्या 'त्या' वाक्यामुळं माझं वाटोळं झालं"! अजित दादांनी 'तो' किस्सा जसाच्या तसा सांगितला
2
आता लोकसभा निवडणुकीत 'लव्ह जिहाद'ची एन्ट्री? काँग्रेस नगरसेवकाच्या मुलीच्या हत्येवरून PM मोदी बरसले
3
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
4
IPL 2024 CSK vs SRH : मराठमोळा तुषार लै 'हुश्शार'! CSK चा मोठा विजय; SRH चा दारूण पराभव
5
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
6
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
7
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
8
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
9
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
10
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
11
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
12
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
13
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
14
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
15
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
16
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
17
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
18
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
19
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
20
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"

आनंद तरंग: अपूर्णत्वाची भावना

By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2019 3:56 AM

कुठेतरी तुम्हाला तुम्ही अपूर्ण आहात असे वाटते आहे. माझ्या मते ही खूप चांगली गोष्ट आहे. जेव्हा अपूर्णत्वाची भावना तीव्र होईल केवळ तेव्हाच तुमच्या आयुष्यात काहीतरी भव्य घडावे याची ओढ तुम्हाला लागेल

सद्गुरू जग्गी वासुदेव तुम्ही आत्ता, या क्षणी जे काही जाणता, जर त्याच्या पलीकडचं काही जाणून घ्यायचं असेल तर हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे की सध्या तुम्ही जे आहात, ते पुरेसे नाहीये ते जाणण्यासाठी. जोपर्यंत अपूर्णत्वाची भावना प्रखर होत नाही, तोपर्यंत तुम्ही कोणत्याही मोठ्या गोष्टीचा शोध घेणार नाही; आणि तुमच्या त्या शोधात तेवढी तीव्रताही असणार नाही. आजकाल खूप लोक असे शिकवितात, स्वत:ला सांगा की मी खूप छान आहे, श्रेष्ठ आहे. तुमच्या मुलांना सांगा तू छान आहेस, माझं तुझ्यावर प्रेम आहे. कसलीही काळजी करू नका, सर्व ठीक आहे. असा विचार केल्यावर तुम्हाला असे वाटते की तुम्ही या जगाचे राजे आहात. हा केवळ मूर्खपणा आहे. हे म्हणजे तुमच्या मर्यादांना गौरवण्यासारखं आहे. सर्वप्रथम तुम्ही श्रेष्ठ आहात, हे तुम्हाला कुणी दुसऱ्याने किंवा तुम्ही स्वत:लासुद्धा तसे सांगण्याची गरजच काय? याचे कारण; कुठेतरी तुम्हाला तुम्ही अपूर्ण आहात असे वाटते आहे. माझ्या मते ही खूप चांगली गोष्ट आहे. जेव्हा अपूर्णत्वाची भावना तीव्र होईल केवळ तेव्हाच तुमच्या आयुष्यात काहीतरी भव्य घडावे याची ओढ तुम्हाला लागेल. तुम्ही तुमचे अपूर्णत्व जर कोणत्या मुलाम्याखाली झाकले तर तुमच्यात कशाचीच ओढ निर्माण होणार नाही. सर्व काही सुरळीत चाललेले आहे असे तुम्ही स्वत:ला समजावत राहाल. याचा अर्थ असा नाही की सद्य:स्थितीतील जीवनाचा आनंद आपण उपभोगत नाही; पण हे परिपूर्णही नाही. आणि याची जाणीव झाल्यावरच तुम्हाला अधिक ओढ लागेल. बºयाच लोकांसाठी चहा, पोहे आयुष्यात सर्वोच्च संतुष्टी देणारी बाब आहे. तर केवळ जेव्हा तुम्हाला असं वाटतं की आयुष्यात फक्त खाणं, पिणं, झोपणं हे पुरेसं नाही, यांसारख्या अनेक लहानसहान गोष्टी पुरेशा नाहीत; तेव्हाच तुम्हाला काहीतरी अधिक जाणून घेण्याची इच्छा होते; आणि केवळ तेव्हाच तुम्हाला जीवनाचे वेगळे पैलू जाणून घेण्याची तीव्र ओढ लागते.

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक