शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
2
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षीक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
3
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
4
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
5
"मी झोपलेले, तो माझ्या खोलीत आला"; अब्रू वाचवण्यासाठी अभिनेत्रीचं धक्कादायक कृत्य
6
Amit Shah Helicopter: अमित शाहांच्या हेलिकॉप्टरमध्ये उतरत असतानाच तांत्रिक बिघाड, प्रचारसभा रद्द 
7
पार्शियन आखातात अडकलं जग, दक्षिण सुदानमध्ये भारतीयांची जबरदस्त कामगिरी: UN ने केले कौतुक
8
"मी जे सांगेन, तेच इस्रायल करेल", डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा, इराण युद्धाबद्दल आता काय बोलले?
9
इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची प्रक्रिया कधी सुरू होईल? ITR-1 फॉर्ममध्ये मोठा बदल? तुमच्यासाठी कोणता?
10
IPL 2026: आयपीएलमध्ये रिंकू सिंहनं इतिहास घडवला, आंद्रे रसेलसह स्टार क्रिकेटपटूंना टाकलं मागं! 
11
अन्नामलाईंना उमेदवारी नाकारली, तामिळनाडूत भाजपाचा धक्कादायक निर्णय, कारण काय? 
12
कमाल! नणंद-भावजयीने फडकवला यशाचा झेंडा; एक DSP तर दुसरी टॅक्स ऑफिसर, रचला इतिहास
13
मुंबईची 'तुंबई' होऊ नये म्हणून ६० दिवसांत काढायचाय ९ लाख मेट्रिक टन गाळ, कंत्राटदारांच्या आडमुठेपणामुळे 'उशीर'
14
Raghav Chadha: राघव चड्ढा की परिणीती चोप्रा; दोघांपैकी कोण आहे सर्वाधिक श्रीमंत; किती आहे नेटवर्थ?
15
लग्नानंतर पती-पत्नीने केली कमाल! मेहनतीनं अभ्यास करून एकाचवेळी दोघेही बनले सरकारी अधिकारी
16
Travel : 'भारताचं स्कॉटलँड' पाहिलंय का? उन्हाळ्याच्या सुट्टीत मनाली-शिमला सोडा, 'या' नंदनवनाला नक्की भेट द्या!
17
१ एप्रिलपासून खिसा रिकामा होणार की भरणार? 'या' १० मोठ्या बदलांचा तुमच्या बजेटवर होणार थेट परिणाम
18
इराणचा अमेरिकन टेकन कंपनी 'Oracle' वर हल्ला; Google, Meta सह 'या' कंपन्यांना दिला इशारा...
19
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
20
सीमा हैदरच्या मुलाचं झालं बारसं; असं नाव ठेवलं की पाकिस्तानला मिरची लागेल!
Daily Top 2Weekly Top 5

अकर्माचा आनंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2020 04:05 IST

न हि ज्ञानेन सदृशं पवित्रमिह विद्यते। तत्स्वयं योगसंसिद्ध: कालेनात्मनि विन्दति।।

- वामन देशपांडेशुद्ध ज्ञानाची प्राप्ती होण्यासाठी साधकापाशी अतूट श्रद्धा हवी की या मायेने ओथंबलेल्या मर्त्य भ्रममूलक दृश्य विश्वात परमेश्वरी तत्त्व फक्त सत्य आहे. हे सत्य एकदा का जाणिवेच्या पातळीवर आतल्या अंतकरणात स्थिर झाले की खऱ्या अर्थाने आपल्या मोक्षप्राप्तीच्या साधनेला सुरूवात होते. भगवंत अर्जुनाला सांगतात,न हि ज्ञानेन सदृशं पवित्रमिह विद्यते।तत्स्वयं योगसंसिद्ध: कालेनात्मनि विन्दति।।पार्था, या मानवी विश्वात, ज्ञानप्राप्ती व्हावी म्हणून अथक साधना करून फक्त परमेश्वरी अस्तित्व सत्यच आहे, याचे ज्ञान प्रथम करून घ्यावे, तरच करीत असलेली साधना फलद्रुप होते. म्हणून या मानवी विश्वात शुद्ध ज्ञानासारखे अतिशय पवित्र दुसरे काहीही नाही, हे तू प्रथम जाणून घे. जे योगसिद्ध आहेत, ते निष्काम कर्मयोगी सिद्ध पुरूष या शुद्ध ज्ञानाची प्राप्ती करून घेतात. पार्था, मानवी जीवनालाच ज्ञानाची प्राप्ती करून घेता येते. हे ज्ञानप्राप्तीचे सामर्थ्य इतर कुठल्याही योनीत नाही. परमेश्वरी अस्तित्वाची जाणीव फक्त माणसापाशीच आहे. म्हणून माणसाने इतर भोगयोनींप्रमाणे आपला मानवी जन्म भोगात रत होण्यात खर्च न करता, देहबुद्धी जागृत न करता, आत्मसाक्षीने जगण्याचा प्रयत्न करावा. निष्काम वृत्तीने आपले विहीत कर्म प्राणपणाने पूर्ण करीत, परमेश्वर प्राप्तीसाठी दृढ चित्ताने उपासना करावी. ज्ञानाइतके पवित्र या विश्वात प्राप्त करण्यासारखे दुसरे काहीही नाही हे सत्य प्रतिपादित करताना भगवंतांनी एक अत्यंत महत्त्वाचा तत्त्वविचार अधोरेखित केला. ज्ञानप्राप्तीसाठी कोणा श्रेष्ठ तत्त्वज्ञानी पुरूषोत्तमाच्या ज्ञानसहवासात राहण्याची आवश्यकता नाही. कारण हे भगवंतांना अभिप्रेत असलेले ज्ञान, निष्काम कर्मयोगाद्वारे प्राप्त करून घेणे, कुणाही साधक भक्ताला सहज शक्य आहे. मी पण एकदा का गळून पडले की, करीत असलेल्या कर्माचे कर्तेपण संपुष्टात येते. आपण कर्म करीत नसून भगवंतच आपल्याला प्रेरणा देऊन हे कर्म आपल्याकडून करवून घेत आहे हा सद्भाव शुद्धाचरणी अंतकरणात सतत स्फुरण पावत राहिला की मर्त्य मानवी जीवनातील कर्तेपण आणि फलाशा अक्षरश: भस्मिभूत होऊन जाते.

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक