मजेत जगावं कसं..!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2019 10:03 PM2019-10-19T22:03:27+5:302019-10-19T22:03:59+5:30

एकच गोष्ट अशी आहे जी, एकदा हातातून निसटली की ती कोणत्याही उपायानं पुन्हा मिळू शकत नाही.. ते म्हणजे आपलं " आयुष्य.. "

How to live in fun ..! | मजेत जगावं कसं..!

मजेत जगावं कसं..!

googlenewsNext

आपण संपलो की दुनिया आपल्यासाठी संपलेली असते. म्हणून जोवर आपले अस्तित्व आहे . तोवर आनंदी रहा व स्वत : वर प्रेम करा , जोवर आपण स्वत : वर प्रेम करू शकणार नाही तोपर्यंत इतरांविषयी आपल्या मनातील प्रेमाची स्पंदने उत्पन्नच होऊ शकणार नाही . " आडात नाही तर पोहऱ्यात येणार कुठून ? " आनंदी रहावयास शिकणे मग परिस्थिती कशी का असेना , ती एक साधनाच आहे . सर्व ऐश्वर्य पायाशी लोळत असताना दुःखी - कष्टी - उदास चेहरे असलेली जोडपी याउलट हातावरचे पोट असलेली सायकलवर डबलसीट जाणारी - हसतमुख जोडपी मी पाहिलेली आहे . देवाने आपल्याला जे काही दिले आहे ते आपल्याच कर्माचे फळ आहे . मग सुख असू द्या वा दुःख असू द्या . दोन्हीही ( अनित्य ) बदलणारे तर आहेत म्हणून दोन्ही परिस्थितीत मन संतुलित ठेवा व आनंदाने जगा . आतापर्यंत जे आयुष्य गेलं ते गेलं , या क्षणापासून दिलखुलास जगा . " झाड लावायची सर्वोत्तम वेळ याक्षणीच आहे " ही चिनी म्हण तुम्हाला माहीत असेलच . परवाच जाताना दुकानावर गांधी शेठ भेटले , आज सकाळी त्यांच्या निधनाची वार्ता ऐकली , हृदयविकाराने त्यांना देवाज्ञा झाली होती . मृत्यू कधी झडप टाकील माहित नाही . पुढचा प्रवास आपल्या हातात नाही माणसाचे सगळं आयुष्यच गुढ आहे . म्हणून भूतकाळ व भविष्यकाळ - सोडून वर्तमानात आनंदाने जगा , तुटलेले संबंध जोडण्यासाठी पुढे या . प्रेमाच्या माणसांसमोर आपल्या भावना व्यक्त करा . कुटुंबाबरोबर सहलीला जा . सुट्टी काढून कुटुंबाबरोबर गतकाळातील चांगल्या स्मृतींना उजाळा देऊन आपल्या लाडक्या लेकीला जवळ घ्या , आपल्या प्रिय पत्नीला पहिल्यांदा फिरायला घेऊन गेलात तेव्हा जसा तिचा हात आपल्या हातात घट्ट धरून वाऱ्याने उडणान्या तिच्या केसांचे , बटांचे कौतुकाने निरिक्षण करत होता , त्याची पुनरावृत्ती करा . सांगा तिला मनापासून , तुमचे तिच्यावर किती प्रेम आहे ते . आपल्या आई - वडिलांच्या जवळ बसून आपल्या हाताने त्यांना गोडबोड खाऊ घाला . आज मी जे काय आहे ते तुमच्या दोघांमुळेच असे कृतज्ञतेचे शब्द उच्चारत त्यांच्या चरणाला स्पर्श करा . आपल्या कृतज्ञतेने त्यांच्या डोळयातील आनंदाना वाट मोकळी करून या . आपली चित्रपट पाहण्याची , पुस्तके वाचण्याची , नाटक बघण्याची इच्छा मनसोक्त पूर्ण करून घ्या , कुटुंबाला डिजनी लँड मध्ये घेऊन जा , भरपूर नाचा , पोहण्याची मनसोक्त इच्छा पूर्ण करा , त्यांच्या आवडीचे पदार्थ त्यांना घेऊन द्या . मुलांबरोबर , नातवंडाबरोबर खेळा , बागडा , नातीगोती घट्ट करण्यासाठी पुढाकार घ्या . एखादया कलेसाठी वेड होऊन जा त्यातला आनंद उपभोगा , सर्वत्र प्रेमाचा अविष्कार करा . हजारो मैल विनासायास प्रवास करण्याची शक्ती फक्त प्रेमातच आहे , . रोज सकाळी उठल्यावर आरशासमोर थांबून आपल्या डोळ्यात डोळे घालून स्वतःला आय लव्ह यु असे दहावीस वेळा म्हणा .. जगात सगळ्यात महागडा बिछाना कुठला ? तर तो आजारपणाचा बिछाना होय . आपली गाडी चालवण्यासाठी चालक भाड्याने मिळतो , सेवेसाठी नोकर मिळतात , पण आपलं आजारपण सहन करण्यासाठी आपण इतर कोणालाही नेमु शकत नाही . प्रेम - निस्सीम प्रेम आजारपणाला आपल्यापासून दूर ठेवते , हरवलेल्या वस्तू सापडू शकतात , पण एकच गोष्ट अशी आहे की जी एकदा हातातून निसटली ती कोणत्याही उपायानं ती पुन्हा मिळू शकत नाही ते म्हणजे आपलं " आयुष्य " . कुटूंबावर , नातलगांवर , मित्रमैत्रिणीवर , शेजाऱ्यांवर मनसोक्त प्रेमाची उधळण करा . पहा मग समोरून तुम्हाला प्रेमाचीच झुळूक येईल , या प्रेममय वाऱ्याच्या झोतात जीवनरूपी हृदयात हिरवीगार बाग फुललेली तुम्हाला दिसेल . जीवन खूप सुंदर आहे . त्यावर खुप प्रेम करा व आनंदाने जगा..

Web Title: How to live in fun ..!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.