शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीर: हवाई दलाच्या वाहनांवर दहशतवाद्यांचा गोळीबार; लष्कराचे काही जवान जखमी
2
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
3
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
4
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
5
पैशांची कमतरता, पक्षही देईना, निवडणूक लढू शकणार नाही; काँग्रेसच्या महिला उमेदवारानं परत केलं तिकीट
6
नितीन पाटलांना जूनमध्ये खासदार केलं नाही तर पवारांची औलाद सांगणार नाही; अजित पवारांची घोषणा
7
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
8
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
9
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
10
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

आनंद हा उत्स्फूर्त, स्वयंस्फूर्त; जीवनाशी अगतिक तडजोड नको!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2019 8:11 PM

आनंद हा उत्स्फूर्त, स्वयंस्फूर्त असतो. तो मिळवण्यासाठी जीवनाशी अगतिक तडजोड करायची गरज नसते

- रमेश सप्रेप्रसूनच्या हिंदी नि उर्दू साहित्याच्या अभ्यासावर त्याची मैत्रीण माला खूप फिदा झाली होती. या भाषांतील कादंब-या, नाटकं एवढंच नव्हे चित्रपट यावर प्रसून बोलू लागला की माला स्तब्ध होऊन तासन्तास ऐकत राहायची. तिला स्थलकालाचं भानत राहत नसे. त्यांची ही मैत्री सर्वाना नुसती माहीत होती एवढंच नाही तर त्यांना प्रसून-माला एक दुजे के लिए म्हणजेच मेड फॉर ईच अदर असेच वाटत. नाही तरी प्रसून या शब्दाचा अर्थ ‘फूल’. या फुलांची बनलेली माला ही प्रसूनला समर्पित असणं यात काही नवल नव्हतं. कारण प्रसूनशिवाय माला असूच शकत नव्हती. आपण म्हणतो ना एका घराचं गाव बनत नाही. एका विद्यार्थ्याचा वर्ग बनत नाही, एका खेळाडूचा संघ बनत नाही तशी एका फुलाची माळ बनू शकत नाही. अनेक पुष्पांची माला किंवा अनेक फुलांचा हार बनतो हे खरं. पण अनेक प्रसून ही काय कल्पना आहे? असा प्रश्न मालाला सर्वजण अनेकदा विचारत. कारण तिच्या जीवनात एकच प्रसून होता नि ती त्याच्याशी एकनिष्ठ होती. या प्रश्नाचं मालाचं उत्तर विचारात टाकणारं होतं. ‘व्यक्ती तितक्या प्रकृती’ हे अनेक व्यक्ती नि त्यांचे निरनिराळे स्वभाव यांच्या संदर्भात ठीक आहे; पण अखंड निरामय आनंदात असलेली माला याचा वेगळाच अर्थ सांगायची. तिच्या निखळ आनंदाचं तेच रहस्य होतं. एकच व्यक्ती अनेक प्रकारे, विविध शैलीत, अनेकानेक कृतीत व्यक्त होत असते. ही खरी त्या व्यक्तीची अभिव्यक्ती असते. प्रत्येकाच्या स्वभावाला अनेक कंगोरे, अनेक पैलू असतात. त्याच्या अंगात अनेक कला-कौशल्य असतात. एवढंच नव्हे तर एकाच कलेचे किंवा कौशल्याचे त्या व्यक्तीला अनेक मंत्र नि तंत्रही अवगत असतात. हाच खरा अर्थ आहे ‘व्यक्ती तितक्या प्रकृती’ या वचनाचा, असा मालाचा ठाम ठाम विश्वास होता नि प्रसून त्या विश्वासावर खरा उतरत होता. उदाहरणच पाहू ना? मालानं एका गीतातील ओळीचा अर्थ प्रसूनला विचारला. ‘है ये ऐसा सफर। थक गये चारागर। कोई समझा नही। कोई जाना नही यावर प्रसूनचं भाष्य मंत्रमुग्ध करणारं होतं. तो म्हणाला-‘चारागर’ म्हणजे प्रवासी, वाटसरू. आपण सारे एका अशा जीवन पथावरून चाललो आहोत की या वाटेवर अंतिम मंजिल (मुक्काम) आहे की नाही, का आयुष्यभर चालतच राहायचं? आपली वाट, आपली दिशा योग्य आहे ना? कोणी वाट दाखवणारा वाटाडय़ा मिळवणं आवश्यक आहे का? की जीवनभर अशीच वणवण, अशीच भरकटणारी भटकंती चालू ठेवायची? या प्रश्नांची उत्तरं कुणालाच माहीत नसतात. अगदी लौकिकदृष्टय़ा ज्ञानी, अनुभव असलेल्या व्यक्तीला सुद्धा! पण स्वत: मात्र एकूणच मानवी जीवनाचं चिंतन करत, स्वत:च्या जीवनाचा, ध्येयाचा, आकांक्षेचा विचार करून जीवन प्रवास चालू ठेवला तर थकान (थकलेपण) जरी आली तर जगण्याचं प्रयोजन (उद्देश) सापडतं नि अशा व्यक्तीची जीवनाची वाटचाल म्हणजेच आनंदायन असतं. प्रत्येक माणसाला आनंद मिळत असतो. त्या गीतातील ओळीचा अर्थ सांगताना प्रसून इतका तल्लीन झाला होता की त्याचा दाटलेला कंठ नि गालावरून ओथंबणारे अश्रू त्याच्या लक्षातच आले नाहीत. पण मालाला मात्र त्याच्या त्या अवस्थेचं आश्चर्य वाटलं. कारण आजपर्यंत सतत प्रसन्न असलेला टवटवीत प्रसून आज असा कोमेजून, भिजून का गेला होता? शेवटी न राहवून तिनं स्वत:ची शपथ घालून प्रसूनला विचारलंच. त्यानं नाईलाजानं सांगितलं, ‘‘या ओळीत मला माझ्या जीवनातील सध्याच्या अवस्थेचा अनभव आला नि मी थोडा भावनावश झालो. असू दे.’’‘अशी कोणती अवस्था आहे तुझ्या जीवनात जी मलाही माहीत नाही?’ मालाच्या या प्रश्नाला चिंतेची, आत्मियतेची झालर होती. थांबत थांबत पण धीरगंभीरपणे प्रसून म्हणाला, ‘‘मला कॅन्सर झालाय. रक्ताचा नि आता तो अंतिम अवस्थेत आहे. प्रश्न अवघ्या काही महिन्यांचाच आहे.’’‘पण यावर काही तरी उपाय असेलच ना? तो करून बघायला काय हरकत आहे? अरे, तुझ्या कविता, तू काढलेली चित्रं, तू कोरलेली शिल्पं, तू अप्रतिम चाली लावलेली विविध भावरस निर्माण करणारी गीतं या सा-याचं प्रदर्शन विक्री केली तर मिळणा-या पैशात तुझ्यावर आवश्यक ते सारे उपाय करता येतील? ‘यामुळे काय होईल?’ या प्रसूनच्या प्रश्नावर मालाचं सरळ स्पष्ट उतर होतं’ ‘तू आणखी काही वर्षं जगू शकशील. अनेक कलाकृती निर्माण करशील.’ एक दीर्घ सुस्कारा टाकत प्रसून म्हणाला ही कशी गोष्ट झाली? दिव्याची वात मागे सारून उरलेल्या तेलात अधिक काळ ज्योत पेटत राहावी; पण अशी मंद, निस्तेज ज्योत तेवण्यापेक्षा ती नेहमीसारखा ढळढळीत, तेजस्वी प्रकाश देत असतानाच शांत होणं चांगलं नाही का?’ या प्रश्नावर निरुत्तर झालेल्या मालेला आनंदाचं, एक रहस्य मात्र उमगलं होतं. आनंद हा उत्स्फूर्त, स्वयंस्फूर्त असतो. तो मिळवण्यासाठी जीवनाशी अगतिक तडजोड करायची गरज नसते. किती खरंय हे!

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक