शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक: राऊड घाटात एसटीचा भीषण अपघात; ६ प्रवाशांचा मृत्यू, टायर फुटून ट्रकला धडकली
2
प्रियांका गांधी लोकसभा निवडणूक लढवणार नाहीत, सूत्रांची माहिती 
3
इकडे आड, तिकडे विहीर! युद्ध रोखले तर नेतन्याहूंचे सरकार पडणार, नाही रोखले तर...
4
हाहाकार! जम्मू-काश्मीरमध्ये पावसाचा प्रकोप, पुंछमध्ये भूस्खलन; अनेक घरं कोसळली, शाळा बंद
5
 ‘अमित शाह माझं पार्थिव उचलण्यास आले, तर खूप बरं होईल…’ दिग्विजय सिंह यांचं विधान चर्चेत  
6
पतंजलीला मोठा झटका, दृष्टी आय ड्रॉपसह 14 प्रोडक्ट्सवर बंदी, जाणून घ्या कारण
7
शिंदेंच्या शिवसेनेचे तीन उमेदवार जाहीर होणार, रवींद्र वायकरांसह ही चार नावं चर्चेत
8
Kalpana Soren Net Worth : कल्पना सोरेन आहेत करोडपती; पतीपेक्षा चारपट जास्त संपत्ती, जाणून घ्या...
9
'पीके'मध्ये आमिर खाननं खरोखर दिले होते न्यूड सीन, अभिनेता म्हणाला - "जे गार्ड घातलं होतं ते पण..."
10
गोवंडीत महायुतीचे उमेदवार मिहिर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक; अज्ञातांवर गुन्हा
11
धक्कादायक! कोरोनावरील या लसीमुळे होऊ शकतात साईड इफेक्ट्स, कंपनीने स्वत:च दिली कबुली    
12
कार्यकर्तेच ठरविणार विजयाचा गुलाल...! शाहू छत्रपती आणि मंडलिक लढतीकडे महाराष्ट्राचे लक्ष
13
सेक्स स्कँडल : प्रज्वलची पक्षातून हकालपट्टी; माजी पंतप्रधान देवेगौडांचे कुटुंब आरोपांनी घेरले
14
भाजप व रा. स्व. संघाची संविधान बदलण्याची योजना : राहुल गांधी
15
तीन विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी घसरली, तरीही राज ठाकरे महायुतीला का हवे आहेत?
16
राहुल शेवाळे यांच्या स्थावर मालमत्तेत सात कोटींची वाढ; २०१९'ला स्थावर मालमत्ता नसल्याचे नमूद होते
17
अरविंद सावंत यांच्याकडे एकच कार; संपत्ती पाच वर्षांत दुप्पट
18
अनिल देसाई यांच्या मालमत्तेत पावणेतीन कोटींची वाढ; स्थावर मालमत्तेत वाढ नाही
19
कांद्याची फसवी फाेडणी; सरकारचे शेतमाल निर्यातीचे धाेरण नेहमीच ग्राहकहिताचे
20
१८% ‘कलंकित’; २९% कोट्यधीश; तिसऱ्या टप्प्यातील १,३५२ उमेदवारांकडे आहे ५.७७ कोटींची सरासरी संपत्ती

आनंद हे परमेश्वराचं दुसरे स्वरूप!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2019 2:47 PM

जो आनंद ज्याला त्याला प्रत्येकाला ‘स्वत:च’ घ्यायचा असतो. तो सगळीकडे सदैव उसळतो, ओसंडत असतो. 

- आनंदाचा डोह आपल्यापाशीच असतो. इतरांसाठी काही करण्यातून आनंदाचे क्षण जिवंत करता येतात. त्या आनंदाला सीमा नसते. तो वर्णनातीत असतो. आनंद हे परमेश्वराचं स्वरूप आहे. सतचितआनंद असं त्याचं वर्णन, म्हणजे अनुभव आहे. जो आनंद ज्याला त्याला प्रत्येकाला ‘स्वत:च’ घ्यायचा असतो. तो सगळीकडे सदैव उसळतो, ओसंडत असतो. ठायीच बैसोनि करा एकचित्ते आवडी भगवंत आळवावा ॥इकडे तिकडे भटकून समाधान, शांती कधीही लाभणार नाही. समर्थांचं मार्गदर्शन या दृष्टीनं मोलाचं आहे. ‘मनाचे श्लोक’मध्ये ते सांगतात-बहु हिंडता सौख्य होणार नाहीेशिणावे परी नातुडे हीत काही ॥अर्थातच : सदासर्वत्र भटकण्यानं, विविध तीर्थक्षेत्रांना भेटी, व्रतवैकल्याचे संकल्प केल्यानं कुणाचंही हित होणार नाही. शीण मात्र येईल, पैसा-शक्ती-वेळ खर्च झाल्यानं एकप्रकारची क्षीणता, अशक्तता मनाला येईल. असलं दुबळं मन काय कामाचं? आजकाल लोक चारोधाम-अष्टविनायक-बारा ज्योर्तिलिंग-नर्मदा परिक्रमा अशा अनेक यात्रा करतात. खरं तर ती तीर्थयात्रा कमी नि पर्यटन (भ्रमण) अधिक असा प्रकार असतो. अशा यात्रींना अनुभवही तसाच येतो.गंगेच्या पाण्यात डुबकी मारून तिला आपला एखादा विकार, वाईट सवय अर्पण करून स्वत: सुधारणं हा खरा उद्देश असतो. पण यासाठी शुद्ध मन, पवित्र भाव नि तीव्र इच्छाशक्ती हवी. त्यापेक्षा अंतरंगीची उपासना केली तर अंतयार्मीचा आनंदरूप परमेश्वर आतच भेटतो नि अपार आनंद आपल्या जीवनात-वर्तनात व्यक्त होऊ लागतो.

पशुपक्षी वनस्पती यांना या आनंदाची जाणीव नसते. परिचय नसतो. पण मानवाच्या बाबतीत आनंद मिळवणं, आनंदात राहणं, आनंदी असणं आणि जगणं हा त्याचा जन्मसिद्ध अधिकार आहे. यासाठी बाहेरचे प्रयत्न नकोत. आतूनच सागराच्या लाटांसारखा सर्वकाळ हेलावणारा आनंद ज्यानं त्यानं आतच उपभोगायचा असतो. अनुभवायचा असतो. आनंद प्रत्येकाच्या अंतरंगात असतो! जसा, सुखी माणसाचा सदरा बाजारात विकत नाही मिळत. तो तर प्रत्येकाकडेच असतो, पण तो शोधावा लागतो. तसेच आनंदाचे आहे.  आनंद निर्माण करता येतो, पण तो निर्माण करणं म्हणजे उत्पादन नव्हे, ती वस्तू नाही. ती अमूर्त कल्पना आहे. ती जाणवते, अनुभवता येते, ती प्रकट होते, डोळ्यांतून उमटते, आणि चेहºयावर हसू फुलवते.  ‘स्वत:साठी जगलास तर मेलास. इतरांसाठी मेलास तर जगलास.’ अर्थातच,  आपल्या स्वत:पलीकडेही एक जग असतं. तेच आपलं विश्व असतं. समाजात, आनंदाला पारखे झालेले अनेक दु:खी जीव भोवताली असतात. त्यांच्या जगण्याची स्वप्नं तुटलेली असतात. कधी समाजाकडून ती अव्हेरली जातात. पानगळीसारखा एकेक अवयव झडल्याचं दु:ख काहींच्या वाट्याला येतं. आज माणसं अधिकाधिक आत्मकेंद्रित बनत चालली आहेत. इतरांसाठी जगण्यातला आनंद त्यांना अनुभवता येत नाही. मात्र, प्राथनेसाठी जोडणाºया दोन हातांपेक्षा मदतीसाठी पुढे केलेल्या एका हाताने इतरांना मदत केली जाऊ शकते. इतरांच्या मदतीतून स्वत:च्या अंतरंगात आनंदाचा डोह निर्माण केल्या जाऊ शकतो. 

- शून्यानंद संस्कारभारती

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिकspiritualअध्यात्मिक