शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

चांगला माणूस घडविणारा पवित्र रमजान महिना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2019 14:28 IST

रमजान ईद विशेष

ठळक मुद्देखरं म्हणजे माणसाला चांगला माणूस म्हणून घडविणारा महिना म्हणजे रमजान प्रत्येकाने प्रत्येकाशी प्रेम आणि मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित करावेत, गरिबांना मदत करावी, याचं शिक्षण आणि प्रेरणाच रमजानच्या माध्यमातून मिळते.कुणी कधीही कुणाशी वाईट बोलू नये, अगदी हिंसात्मक विचारही मनात आणू नयेत आणि कुणाची चहाडी करू नये, हे इस्लामचे मूलभूत शिक्षणही हा महिना देतो

खरं म्हणजे माणसाला चांगला माणूस म्हणून घडविणारा महिना म्हणजे रमजान. रमजान हा प्रशिक्षणाचा महिना आहे. प्रत्येकाने प्रत्येकाशी प्रेम आणि मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित करावेत, गरिबांना मदत करावी, याचं शिक्षण आणि प्रेरणाच रमजानच्या माध्यमातून मिळते. रमजान महिना आपणाला अहिंसा हे मूल्य अंगी बाणवण्याचीही प्रेरणा देतो. कुणी कधीही कुणाशी वाईट बोलू नये, अगदी हिंसात्मक विचारही मनात आणू नयेत आणि कुणाची चहाडी करू नये, हे इस्लामचे मूलभूत शिक्षणही हा महिना देतो.

प्रेषित मोहम्मद पैगंबरांनी सांगितले आहे की, ‘‘जो तुझ्यावर अन्याय करेल, त्याला माफ कर. जो तुझ्याशी असलेले नाते तोडेल, त्याच्याशी तू नाते जोड, जो तुला वंचित ठेवेल, त्याला तू भरभरून दे’’ पैगंबरांची ही शिकवण अतिशय महत्त्वाची आणि प्रेरणादायी आहे. अगदी शेजाºयाशीही कसे वागावे, याबद्दलही मार्गदर्शन केलेले आहे. ज्याची श्रद्धा दृढ आहे तो नेहमीच शेजाºयाबरोबर चांगले वागतो, असे स्पष्ट करण्यात आले आहे. जो  स्वत:साठी एखादी गोष्ट पसंद करतो, तीच गोष्ट तो इतरांसाठीही पसंद करतो. म्हणजेच इस्लाममध्ये माणसांमधील भेदभावाला स्थान नाही.

प्रेषितांनी मानवाला देशाबद्दलचे कर्तव्यही सांगितले आहे. त्यांनी सांगितले होते की, माणूस ज्या भूमीत राहतो त्या भूमीशी त्याने प्रामाणिक असले पाहिजे. त्यामुळे प्रत्येक मुसलमान स्वत:च्या देशासाठी आपले प्राण, धनदौलतीची आहुती देण्यासाठी सदैव तत्पर असतो; पण काही समाजकंटक मात्र आपल्या स्वार्थासाठी समाजात गैरसमज पसरविण्याचे काम करीत आहेत. यामुळे देशाच्या एकता आणि अखंडतेवर याचा विपरीत परिणाम होत आहे. देशाला जर प्रगतिपथावर न्यायचे असेल तर एकमेकांशी विश्वास, बंधुभाव, प्रेम आणि मैत्रभावाने मिळून मिसळून राहिले पाहिजे. या देशाची गंगा - यमुना संस्कृत सदैव जिवंत ठेवली पाहिजे. ही आपल्या देशाची खरी मूलभूतता आहे.

इस्लाममध्ये जी प्रार्थना केली जातो तिचे धार्मिक आणि सामाजिक असे दोन स्वरूप आहेत. हीच या धर्माची विशेषता आहे. रोजा, जकात आणि दानधर्म करणे हे सारे धार्मिक आणि पुण्याचे आहे. यामुळेच सामाजिक जागरुकता निर्माण होते. रोजामध्ये माणूस खाणे - पिणे, स्त्रीसंबंध याबद्दल संयम बाळगला जातो. वस्तुत: हा संयम म्हणजे रोजा आहे. याशिवाय रोजेदारावर अनेक बंधने घालण्यात आली आहेत. प्रेषित पैगंबरांनी सांगितले आहे की, ‘‘तुम्ही चुकीचे काम कधीच करू नका, खोटे बोलू नका, चहाडी करू नका. हे नियम तुमच्यासाठी नित्याचेच आहेत; पण जर रोजेदार असाल तर यासंदर्भात अधिक काळजी घेणे गरजेचे आहे.’’ पैंगबर म्हणतात, तुम्ही कुणाशीही भांडण करायचं नाही, इतके की, कुणी तुमच्याशी भांडायला आलं तरी त्याला सांगायचं की, मला भांडण करायचं नाही, कारण मी रोजेदार आहे. (बुखारी/ मुस्लीम).

रमजान महिना आपणाला अहिंसेची प्रेरणा देतोच. शिवाय गोरगरीब, गरजवंतांना आर्थिक मदत करण्याचाही आदेश करतो. आपल्याकडे काम करणाºया नोकरावरही रमजानच्या महिन्यात कामाचा बोजा टाकू नका, हा संदेशही देण्यात आला आहे. या महिन्यात दानधर्माला अतिशय महत्त्व आहे. स्वत: पैगंबर नेहमीच गरिबांवर खूप खर्च करीत; पण रमजानच्या पवित्र महिन्यात ते गरिबांसाठी अधिक खर्च करायचे. प्रेषितांचे अनुयायी सांगत की, एखादा मेघ ज्याप्रमाणे ओसाड जमिनीवर पावसाची बरसात करतो, अगदी त्याप्रमाणे प्रेषित मोहम्मद गरिबांवर मदतीचा वर्षाव करत असतो... रमजानच्या पवित्र महिन्याचे हे असे महत्त्व आहे.- शहर काझी मुफ्ती सय्यद अमजद अली काझी

टॅग्स :SolapurसोलापूरRamzan Eidरमजान ईदAdhyatmikआध्यात्मिक