शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
4
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
5
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
6
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
7
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
8
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
9
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
10
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
11
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
12
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
13
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
14
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
15
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
16
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

तत्वाचरण शिकविणारे भगवान महावीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2019 10:37 IST

चोविसावे तीर्थंकर म्हणून इ. स. पूर्व ५९९ मध्ये कुडलपूर येथे राणी त्रिशलादेवी व राजा सिद्धार्थ यांच्यापोटी वर्धमान भगवान महावीर यांचा जन्म झाला.

चोविसावे तीर्थंकर म्हणून इ. स. पूर्व ५९९ मध्ये कुडलपूर येथे राणी त्रिशलादेवी व राजा सिद्धार्थ यांच्यापोटी वर्धमान भगवान महावीर यांचा जन्म झाला. जन्मनाव वर्धमान ठेवण्यात आले असले तरी त्यांना महावीर, वीर, अतिवीर, सन्मती ही नावे त्यांनी बालपणी केलेल्या अतिविशेष कार्यामुळे देण्यात आली.

महावीर जन्माने राजपुत्र असले तरी त्यांनी आपल्या आयुष्यात कधी राज्यकारभार केला नाही. कारण जन्मापासूनच त्यांची मानसिकता वैराग्य भावनेची होती. त्यामुळे वयाच्या तिसाव्या वर्षी त्यांच्यातील वैराग्य भावनेने संसार भावनेवर मात केली. स्वयंप्रेरणेने सर्वस्वाचा त्याग करीत त्यांनी मुनीदीक्षा धारण केली व आपल्या अंगीकृती व आपल्या अहिंसा, सत्य, अचौर्य, ब्रह्मचर्य व अपरिग्रह या पाच महाव्रतांना धारण करून त्याचे काटेकोर पालन करण्यास सुरुवात केली.

भगवान महावीरांच्या ‘अहिंसा परमो धर्म:। धर्मस्य मूलं दया।’ जगा व जगू द्या आणि ‘परस्परोपग्रहो जीवानाम्’ या दोन संदेशाचा जनमानसावर इतका सखोल परिणाम झाला की, त्यामुळे समाज अहिंसक बनून स्त्री-पुरुष असमानता व पशुपक्ष्यांना यज्ञयागात बळी देण्याची प्रथा एकदम थांबली. मनुष्य हा जन्माने नव्हे तर कर्माने महान बनतो, या महावीर प्रणीत तत्त्वाने जनमानसातील वर्णवादास व उच्च-नीचतेच्या भावनेस तिलांजली मिळाली.

भगवान महावीरांनी सांगितलेल्या तत्त्वांचा राष्टÑपिता महात्मा गांधी यांच्यावर विशेष प्रभाव होता हे त्यांनी अंगीकारलेले अहिंसेचे धोरण, त्यांनी केलेले सत्याचे प्रयोग तसेच त्यांनी अपरिग्रही व अनेकांतवादी दृष्टी यावरून स्पष्ट दिसून येते.

वयाच्या बाहत्तराव्या वर्षी त्यांनी ज्ञानावरण, दर्शनावरण, वेदनीय, मोहनीय, आयू, नाम, गोत्र व अंतराय या आठही कर्माचा क्षय केला व इसवी सन पूर्व ५२७ कार्तिक कृष्ण अमावस्या या शुभदिनी बिहार राज्यातील ‘पावापुरी’ या तीर्थस्थानी मोक्षाची प्राप्ती केली. भगवान महावीरांना मोक्षप्राप्ती झाल्याने त्या दिवशी असंख्य दिवे लावून व गुढ्या, तोरणे उभारून लोकांनी दिवाळी साजरी केली. तीच दिवाळी आपण आजही त्याच पद्धतीने साजरी करून भगवान महावीरांचे व त्यांनी सांगितलेल्या तत्त्वांचे स्मरण व चिंतन करून त्यानुसार आचरण करण्याचा आपण प्रयत्न करतो.

जैन धर्मास अतिप्राचीनतेचे ऐश्वर्य लाभलेले आहे. त्यांनी क्रोध, मान, माया, लोभ अशा विकारांवर विजय प्राप्त केला आहे. इंद्रिये इच्छांना जिंकले आहे. ते ‘जिन’ असे मानले जाते. या जिनाचे अनुयायी  ते जैन धर्मात जिनेंद्रांना तीर्थंकर म्हणतात. वृषभदेव ते महावीर असे २४ तीर्थंकर आहेत.

जैन धर्मात सर्वतोपरी मनुष्याला महत्त्व आहे. तीर्थंकरांनी सर्व प्राणी-मात्रांच्या कल्याणाचा आदर्श जगापुढे उभा केला. धर्माच्या व तीर्थांच्या सहायाने या भवसागरातून तरून जाता येते, असा उपदेश तीर्थंकरांनी दिला. सर्व प्राणी-मात्रांमध्ये चैतन्यरूपी आत्मा आहे. त्या आत्म्यास जाणणे हाच जैन धर्माच्या तत्त्वचिंतनाचा केंद्रबिंदू आहे. जेव्हा यज्ञामध्ये बळी देण्याची प्रथा प्रचलित होती, सर्वत्र हिंसेचे प्रमाण वाढले होते, त्यावेळी आत्म्याच्या सन्मानासाठी भगवान महावीरांनी ‘जगा आणि जगू द्या’ असा संदेश दिला. अंधश्रद्धा, चमत्कार, नवस-सायासांना जैनधर्म पुष्टी देत नाही. ‘तूच माझ्या जीवनाचा शिल्पकार’ हाच मौलिक विचार जैनधर्माकडून आपल्याला मिळतो.

जैन समाजात परस्परांना ‘जय जिनेंद्र’ असे संबोधून परस्परांना जिनेंद्र आत्म्यास वंदन असे म्हणण्याची सुंदर प्रथा आहे, म्हणून जैन धर्म यशस्वी जीवन जगण्याची कला शिकवतो.- प्रदीपकुमार शिंगवी (लेखक हे उद्योग क्षेत्रात आहेत.)

टॅग्स :SolapurसोलापूरAdhyatmikआध्यात्मिकMahavir Jayanti 2018महावीर जयंती २०१८