जिकडे पाहावे तिकडे.... तु दिसशी नयना!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2020 02:59 PM2020-02-18T14:59:34+5:302020-02-18T15:00:21+5:30

निवृत्तीनाथांपासून सर्व संतांनी विश्र्वात्मक देवाचा अनुभव वर्णिला आहे

Gajanan Maharaj : Everywhere we look, you appear to eyes | जिकडे पाहावे तिकडे.... तु दिसशी नयना!

जिकडे पाहावे तिकडे.... तु दिसशी नयना!

Next

संतानी देव  नुसता अनुभवला नाही तर सवार्भूती परमेश्वर असल्याचे त्यांना जाणवले. मह्णूनच संत ज्ञानेश्वरांनी जे  जे भेटे भूत । ते ते वाटे मी ऐसे ।। असा संदेश दिला आहे. प्रत्येक प्राणिमात्रामध्ये ईश्वरांचा अंश असल्याचे संत एकनाथांना  जाणवले. त्यांनी प्रत्येक जीवाला परमेश्वराचे एक स्वरुप मानले आहे.  जे जे  भेटे भूत । ते ते  मानिजे भगवंत स्वस्वरूपाला प्रत्येक जीवांमध्ये पाहण्याची विश्वात्मकदृष्टी संतांकडे होती. संतांनी स्वत: विश्र्वात्मक ईवराची अनुभूती घेऊन त्याप्रमाणे आपल्या आचरणामध्ये त्या तत्वांचे अनुकरण केले आहे. ज्ञानेश्वरीच्या अखेरचे पसायदान  हे विश्र्वात्मक देवापाशी मागीतलेले आहे.  निवृत्तीनाथांपासून सर्व संतांनी विश्र्वात्मक देवाचा अनुभव वर्णिला आहे. आकाश जसे सर्वत्र आहे. तसा ईश्वर हा विश्र्वात्मक असून सर्वांना विश्वात्मक एकतेचे दर्शन घडवितो. त्याच एकात्मभावाचे दर्शन  विदर्भ पंढरीनाथ शेगावीचे अवलीया संत गजानन महाराज त्यांच्या अवतार कायार्तून घडवितात. संत जगाला समजावे म्हणून पंतोजी सारखे पाटी हाती घेऊन शिकवितात असे संत तुकाराम आपल्याला सांगतात-
अर्भकाचे साटी ।  पंते हाती धरिली पाटी ।।
तैसे संत जगी । क्रिया करुनी दाविती अगी ।।
बाळकाचे चाली । माता जाणूनी पाऊल घाली ।।
तुका म्हणे नाव । जनासाठी ठाव ।।

    माघ वदय सप्तमीला देविदास पातुरकरांच्या वाड्यासमोर उष्ट्या पत्रावळी  वरील भातांची शिते उचलून खाणारी उवलिया मुर्ती म्हणजे दुसरे तिसरे कोणीही नसून ते म्हणजे आपली सर्वांची माऊली अवलीया मूर्ती सद्गुरू गजानन महाराज होय. त्यांच्या प्राकट्याचे निमित्त जरी पातुरकरांच्या घरची हा ऋतुशांती कार्यक्रम असला तरी लोककल्याणाचे  कार्य करण्यासाठीच त्यांचे अवतार कार्य असल्याचे  महाराजांच्या अवलीया लिलांवरून दिसून येते. मनुष्याने धमार्ने वागावे यासाठी ते संकेत देतात. पांडुरंगाचा अवतार असणारा हा अवलीया बापुना काळेंना साक्षात विठ्ठलाचे दर्शन घडवितो. दासगणू महाराजांनी त्यांचे वर्णन गजानन विजय ग्रंथातून केले आहे. 


गजानन जे स्वरूप काही । ते विठ्ठलावाचून वेगळे नाही।।


     संत गजाननांनी भाविकांना दिलेला संदेश हा सत्कर्म करण्याचा आहे. त्यांनी प्रत्येक भाविकाच्या मनामध्ये भक्तीची गंगा निर्माण केली आहे. संतांजवळ परमेश्वराचा पत्ता आहे. त्याना शरण गेल्यांनंतर ते परमेश्वराची भेट घडवून देतात. मग ते सदगुरू स्वरूपात भेटतात तर कधी गुरूमाऊली म्हणून ओळख पटवितात. ओळख तो आवाज.. ओळख ती खूण ङ्घ  मी येथेच आहे .. तुज्या आसपास ङ्घ.. जणूकाही हा संदेश देतात की मी गेलो ऐसे मानु नका । भक्तीत अंतर करू नका ।। हा त्यांचा संदेश भक्तांना त्यांनी देवून जगण्याची शक्ती प्रत्येक भक्तांच्या मनात निर्माण केली आहे. तोच विश्वास घेवून आज प्रत्येक भक्त शेगावी गजाननाच्या दर्शनासाठी येतात. संत  भक्तांच्या मनीचा हेतू ओळखतात. भक्तांचे मनोरथ पूर्ण करण्याचे सामर्थ्य त्यांच्याकडे असते. भक्तांना अलौकिक भक्तीची अनुभूती ते सतत देत असतात. सदगुरू गजानन  महाराज प्रत्येकाला जणू आपले मनातील ईश्वर वाटतात. संत जन्मोजन्मी भक्तीचे कार्य करीत आले आहेत. भक्तांचे भवदु:ख हरण्याचे सामर्थ्य त्यांच्याठायी असते.फक्त प्रत्येकाच्या भक्ती, विश्वास व श्रद्धा  यावर ते  अवलंबून आहे.  


मागा बहूता जन्मी । हेचि करित आलो आम्ही ।
भवतापश्रमी । दु:खे पीडिली निववू त्यां ।
गर्जू हरिचे पवाडे । मिळवू वैष्णव बागडे ।
पाझर रोकडे । काढू पाषाणामध्ये ।।


सदगुरूचे चिंतन केल्याने त्रिविध ताप हरण्याचे सामर्थ्य त्यामध्ये आहे. नाहीतर आज सर्वत्र स्वाथार्चे वातावरण आहे. लाडू पेढे खावयास लोक जमती विशेष । परी सहाय्य संकटास कोणीही करीना ।। तेव्हा सदगुरू गजाननच आपल्या मदतीला धावल्याचे अनेकांच्या अनुभवावरून आपल्यायाला जाणवते. आज गजानन महाराज संस्थान मध्ये कर्मयोगी शिवशंकरभाऊ पाटील यांच्या मार्गदर्शनामध्ये 42 सेवा प्रकल्पाद्वारे गजाननाची सेवाकरीत आहेत भक्त हाच माझा भगवंत असे त्यांचे ब्रीद आहे.


चिंतनाची जोडी । हाचि लाभ घडोघडी
तुम्ही वसोनी अंतरी । मज जागवा निधार्री

 

- प्रा. डॉ. हरिदास आखरे

Web Title: Gajanan Maharaj : Everywhere we look, you appear to eyes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.