शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

मित्रांनो.... सकारात्मक विचार हे जीवन जगण्याचे सूत्र...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2020 18:08 IST

" कोण म्हणतं जीवनात प्रत्येकवेळी काटेरी डंखच आहेत अरे डोळे उघडून बघा.. प्रत्येकाला उडण्यासाठी फुलपाखरासारखे पंख आहेत .

मनासारखा नवरा नाही मिळाला . करायचा म्हणून संसार करते . जगण्यात काही मजाच नाही सर , खूप नैराश्य येते , रोजचीच भांडणं , हेवे - दावे - तूतू मैं - मै जीवन नकोसे वाटतंय , झोप येत नाही , जेवण जात नाही असं उदास व रडक्या आवाजात रडगाणं गाणाऱ्या महिलेला पाहून वाटलं . या स्त्रीला कसा का होईना - नवरा बरोबर तरी आहे , ज्यांच्या आयुष्यात पतीच नाही त्या बाईने काय करायचे ? त्याचवेळी एक गाणं आठवलं . " चाँद मिलता नहीं - सबको संसार मे । है दिया ही बहोत रोशनी के लिए ।  " खरोखरच मित्रांनो आपलं संपूर्ण आयुष्य हे आपण कसा विचार करतो यावर अवलंबून आहे . मनात दररोज ( २४ तासांत ) ६० हजार विचार येतात . यातील ६० % ते ७० % विचार हे नकारात्मक असतात . दर १५ ते २० सेकंदाला नवीन विचार येतो हे चक्र अव्याहतपणे चालू असतं . ज्यावेळेस आपण नकारात्मक विचार करतो त्यावेळेस विश्वात जेवढे नकारात्मक तरंग आहेत त्याच्याशी आपण जोडले जाऊन . नकारात्मक विचारांची गर्दी आपल्या भोवती जमते त्यामुळे उदास वाटायला लागतं यातून त्या व्यक्तीची  नैराश्याकडे वाटचाल सुरू होते . रेडिओ किंवा वाहिन्या ज्या बॅडवर आपण लावतो तेच प्रक्षेपण लगेच चालू होते . म्हणून नकारात्मक विचारांना - सकारात्मक करणे गरजेचे असते .सकारात्मक विचार आपली शक्ती , आत्मविश्वास , मनोबल वाढवतात , नकारात्मक विचारांना - सकारात्मक करणे म्हणजे मनाचेच - मनाशी युध्द करणे होय . यालाच तुकाराम महाराज म्हणतात . " रात्रदिनं आम्हां युदधाचा प्रसंग " ! थॉमस अल्वा एडिसनने ९९९ प्रयोग केले - हजाराव्या प्रयोगाच्या वेळेला विजेचा दिवा लागला , थॉमसला ज्यावेळेस पाकारांनी मुलाखतीत विचारलं , - थॉमस ९९९ प्रयोग फसले याबाबत तुला काय वाटले ? थॉमस म्हणाला - ९९९ प्रयोग फसले असे म्हणू नका . ९९९ वेळा मी हे सिध्द केलं , या मार्गाने विजेचा दिवा लागू शकत नाही . हा माझा सकारात्मक दृष्टीकोन .  दृष्टीटेबलावर एक ग्लास पाण्याने अर्धा भरला आहे . जर असा विचार केला की , अर्धा भरला आहे त्यामुळे मन समाधानी होतं . पण तो अर्धा रिकामा आहे म्हटलं की , नैराश्य , व्याकुळता , हताशपण येतं , सकारात्मक दृष्टीकोन मनाला प्रसन्न करून - अतिरिक्त ऊर्जा प्रदान करतो त्यामुळे कर्माला गती प्राप्त होते आणि आत्मविश्वास वाढतो . नकारात्मक विचार मनाला व शरीराला दुर्बल करतो . परिणामी कमांची गती मंदावते - चुका होतात - हानी होते व यातूनच औदासिन्य येते.माजी राष्ट्रपती अब्दुल कलामांना नौदलात भरती होता न आल्यामुळे पुढे ते शास्त्रज्ञ व देशाचे राष्ट्रपती झाले . आकाशवाणीवर आवाजाच्या खरखरपणामुळे नाकारल्या गेलेल्या अभिनेते अमिताभ बच्चनने त्याच आवाजाच्या जोरावर चित्रपटसृष्टीला हलवून सोडले . काही वेळा अपयश हे महान यशाचे पण सूचक असते . म्हणून सकारात्मक विचार करा व आनंदी रहा . " कोण म्हणतं जीवनात प्रत्येक वेळी काटेरी डंखच आहेत अरे डोळे उघडून बघा - प्रत्येकाला उडण्यासाठी - फुलपाखरासारखे पंख आहेत . "मित्रांनो सकारात्मक विचार हे जीवन जगण्याचे सूत्र आहे .

टॅग्स :PuneपुणेAdhyatmikआध्यात्मिकrelationshipरिलेशनशिपMeditationसाधना