शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदानाच्या टक्केवारीत अचानक ११ दिवसांनी वाढ कशी?; संजय राऊतांनी व्यक्त केली शंका
2
नरेंद्र मोदींनी 'हा' जावईशोध कुठून लावला?; शरद पवारांचा पंतप्रधानांना टोला
3
"मी भाग्यवान..."; निवडणूक प्रचारासाठी बहिणींकडून गहू, पैसे मिळाल्यावर शिवराज सिंह चौहान भावूक
4
‘मोदी, भाजपा २७२ किंवा ३०० पार का म्हणत नाही? ४०० पार म्हणजे…’ संभाजीराजेंनी सांगितला संभाव्य धोका
5
Godrej Inside Story : कुलूप आणि चावीनं सुरुवात, मग इंग्रजांसाठी बनवली तिजोरी; गोदरेजचा यशाच्या शिखरापर्यंतचा रंजक प्रवास
6
अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस 
7
हिट अँड रन: सुरेश रैनावर दु:खाचा डोंगर, कारने स्कूटीला धडक दिल्याने अपघात, मामेभावाचा मृत्यू   
8
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL मध्ये तेजी, Kotal Bank घसरला
9
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
10
"...तर स्टील व्यवसायाच्या विक्रीचा विचार करू," भारतात २० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार Vedanta Group
11
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
12
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
13
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
14
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
15
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
16
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
17
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
18
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
19
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
20
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका

भय हेच संकट

By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2019 4:46 AM

देव आणि अध्यात्म यामधलं नातं मोठं गहन आहे. ज्याला देव मानसशास्त्राच्या उंचीवरून कळला त्यांच्याचसाठी तो गहन आहे.

- विजयराज बोधनकरदेव आणि अध्यात्म यामधलं नातं मोठं गहन आहे. ज्याला देव मानसशास्त्राच्या उंचीवरून कळला त्यांच्याचसाठी तो गहन आहे. अन्यथा तो चिंतेचा विषय आहे. ‘कारे भुललाशी वरलीया रंगा’ ही म्हण देव-धर्मासाठीसुद्धा लागू पडते. कारण ज्या मानसशास्त्राच्या आधाराने देव या संकल्पनेची रचना केली गेली ती संकल्पनाच लुप्त होत जाऊन त्या जागी कर्मकांड आले. नाशिक किंवा ओंकारेश्वर किंवा इतर धार्मिक ठिकाणी नदीच्या काठावर जी धार्मिक कर्मकांडे चाललेली असतात त्यामागे श्रद्धेपेक्षा एक पारंपरिक भय जास्त लपलेले दिसते. ही काही आताचीच परंपरा नसून हजारो वर्षांपासून या प्रथा चालूच राहिल्या आणि आजही सुरूच आहेत. साधारण बाराव्या शतकातल्या प्रथा जरी बघितल्या तरी आपल्या लक्षात येईल की यातली आजही कुठली कर्मकांडे सुरू आहेत. यज्ञयाग, होमहवन, प्राणिबळी, सतीप्रथा, व्रतवैकल्ये, नवस, उपासतापास, उद्यापने, जपतप, अन्नसत्रे, तीर्थयात्रा, मावंदे, प्रायश्चित्त विधी, अशा विविध प्रथा होत्या. या सर्व फलप्राप्तीसाठी केल्या जात होत्या. त्यातल्या आजही अनेक प्रथा या विज्ञानयुगात सुरूच आहेत. इष्टकामनापूर्तीसाठी मोठ्या श्रद्धेने जरी या प्रथा निर्माण झाल्या होत्या तरी यामागे भयतत्त्व लपले गेले होते. या सर्व प्रथा परंपरांना चोख उत्तर मिळतं ते पातंजल योगशास्त्रात. मनाचे शेकडो विकार मानवस्वभावाच्या विकृत वागणुकीतून जन्माला आलेले असतात. मानवी मन हे जितकं हळवं, नाजूक तितकंच पशुवत हिंस्र आहे. मानव जातीनेच मानवाचं कल्याणही केलं आहे आणि मानवाचा विध्वंसही त्यानेच घडवून आणला आहे. परंतु काही अनिष्ट घडलं तरी ते ईश्वराच्या कोपाने घडलं आणि चांगलं घडलं तरी ईश्वराच्या कृपाप्रसादे घडलं असा मोठा भास निर्माण करण्यात बराच मोठा काळ यशस्वी होत आल्यामुळे त्याची पाळेमुळे खोलवर रूजून, समाजाला या परंपरांनी सतत भयापोटी कार्यरत ठेवल्याचं अनेकदा लक्षात येत राहतं. चमत्कार आणि साक्षात्कार यावर पुराणांची हजारो पाने खर्ची पडतात. साधाभोळा समाज या पुराणकथांच्या पूर्णपणे स्वाधीन होत राहिल्यामुळे भयाच्या स्वामित्वाचे हक्क आजही समाज राखून आहे. परंतु आजची नवी पिढी मात्र विज्ञानाच्या निकषावरून याकडे पाहू लागल्यामुळे हळूहळू का होईना भयमुक्त होत चाललेली आहे. माणसाच्या बेशुद्ध अवस्थेतल्या जगण्यावागण्यामुळेच संकटे निर्माण होत राहतात. भोळ्या भाबड्या परिवाराच्या अवतीभवती अनेक संकटे दबा धरून बसलेली असतात. परंतु बुद्धिमान, जागृत, शक्तिमान परिवाराच्या अवतीभवती मात्र एक विश्वासू शक्तीची आभा, वलय तयार झाल्यामुळे संकटे तिकडे फिरकण्याची शक्यता कमीच असते. धन आणि बुद्धी जिथे वास्तव्याला नसते तिथे अडचणींचा डोंगर प्रत्येकाच्या डोक्यावर जाऊन बसलेला असतो आणि त्यातून मार्ग काढण्यासाठी भयग्रस्त समाजाला धार्मिक कर्मकांडाशिवाय दुसरा पर्यायच राहत नाही. त्यासाठी भयमुक्त होत गेल्यानेच या काल्पनिक कर्मकांडातून सुटका होऊ शकते. म्हणून भयाबद्दल द्वैत-अद्वैत यामागची विचारधारा समाजाने अभ्यासणे गरजेचे आहे आणि किमान सुखी होण्यासाठी संतांचे श्लोक, अभंग, फुले अक्षता न वाहता अभ्यासून मनाला, बुद्धीला सामर्थ्यवान बनविणे आजची गरज आहे. अन्यथा आपलेच भय आपल्याला संपविण्यास कारणीभूत ठरू शकेल.