शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत उत्तर द्या, अन्यथा...; विजय वडेट्टीवार यांना न्यायालयाचा अवमान केल्याची नोटीस
2
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
3
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
4
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
5
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
6
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
7
४,४,४,४,४,४,६,४,६,६! जॅक फ्रेझर मॅकगर्कची वादळी फिफ्टी; आर अश्विनने RR मिळवून दिली पहिली विकेट 
8
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!
9
रिषभची विकेट घेऊन युझवेंद्र चहलने इतिहास घडवला; IPL अन् ट्वेंटी-२०त पराक्रम करणारा पहिला भारतीय
10
EVM मशीनची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल 
11
'अडीच कोटीत EVM हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...
12
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : महाराष्ट्रात तिसऱ्या टप्प्यात ५४.०९ टक्के मतदान
13
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
14
पॅट कमिन्सने असं काय सांगितलं की हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव यांना बसला शॉक?
15
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
16
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
17
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
18
रवींद्र महाजनींच्या निधनानंतर आत्महत्या करायला गेला होता गश्मीर, म्हणाला -"मी टेरेसवर गेलो आणि..."
19
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
20
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात

संयमातून आनंदाचा अनुभव

By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2019 8:35 PM

आनंदाची निर्मिती करावयाची नसते. ती आपोआप होत असते. आणि आपण ती उत्स्फूर्तपणे अनुभवयाची असते. अनुभव हाच आनंदाचा गाभा असतो. प्राण असतो. 

- रमेश सप्रेगोष्ट तशी अनेकांना माहीत असलेली. गोष्ट कसली प्रसंगच आहे तो. श्याम आणि त्याचे आई वडील यांच्या मधला. श्याम म्हणजे आपले सानेगुरूजी, श्यामची आई म्हणजे संस्कारांची साक्षात् मूर्ती, संस्कारदेवता. ‘मातृदेवो भव’ म्हणताना मुख्य भाव हा संस्कारांचा म्हणजे हल्लीच्या भाषेत मूल्य शिक्षणाचा (व्हॅल्यू एज्युकेशनचा) असतो. काही संस्कार घडतात तर काही घडवले जातात. या प्रसंगात हे दोन्ही प्रकार दिसतात. श्यामच्या आईवडिलांनी त्याच्यावर घडवलेले संस्कार तर कुटुंबातील वातावरण, परस्परातील स्नेहबंध यातून घडलेले संस्कार. त्याचं असं झालं-श्याम हा आपल्या गुणांमुळे नि स्वभावामुळे सर्वाचा लाडका होता. त्याच्या आईचा तर तो जीव की प्राण होता. शाळेत असताना शिक्षणासाठी त्याला अनेक गावी जाऊन निरनिराळ्या शाळांतून शिक्षण घ्यावं लागलं. अशावेळी तो सुटीसाठी जेव्हा घरी येई तेव्हा सर्वाना अर्थातच खूप आनंद होई. आईला तर जास्तच. घरची गरीबी असल्यामुळे अनेक गोष्टी मनात असूनही करता येत नसत; पण असं असलं तरी प्रेम, सेवा, त्याग अशा संस्कारांची श्रीमंती त्यांच्या कुटुंबात होती. गरीबी म्हणजे दारिद्रय़ नव्हे. गरीबी ही आर्थिक परिस्थितीवर तर दारिद्रय़ हे मनाच्या वृत्तीवर अवलंबून असतं. गरीबी ही बऱ्याच वेळा शाप नसून वरदान ठरू शकते. श्यामला संस्कारांच्या दृष्टीनं संपन्न घरच्या या गरीबीनंच बनवलं असेल त्या परिस्थितीत मनाचं समाधान कसं टिकवायचं हे वडिलांकडून तर अखंड आनंदात कसं राहायचं हे आईकडून श्याम शिकला. एवढंच नव्हे तर वरवर दिसणाऱ्या या दु:खालाही आनंदाची झालर कशी लावायची याचंही शिक्षण मिळाल्यामुळे श्याम हा स्वत: संस्कारसंपन्न, सुसंस्कृत झाला असं नव्हे तर मराठी जाणणाऱ्या या मुलांच्या तसेच वडील मंडळींच्या मनावरही त्यानं संस्कारांचं सुरेख सिंचन केलं.श्यामची आई ही केवळ एक व्यक्ती नव्हती तर संस्कारांचा संतत अभिषेक करणारी शक्ती होती. अशातूनच आनंदाची अखंड अनुभूती घेता येते. एके दिवशी श्याम येणार म्हणून आईनं त्याला आवडणारी फणसाची भाजी करण्याचं ठरवलं. एरवी श्यामची आई सुगरण नि अन्नपूर्णा दोन्ही होती. ती म्हणायची, ‘भोपळीचा, भेंडीचा, शेवग्याचा कोणताही कोवळा पाला ही पालेभाजीच असते. तिखट, मिठ नि तेलाची फोडणी दिली तर सारं गोड लागतं.’ नुसती म्हणायचीच नाही तर तिच्या स्वयंपाकातून याचा अनुभव सर्वाना रोज येत असे. तो आनंदाचा अमृतानुभव असे.त्या दिवशी वडिलांनी पाटीलवाडीहून भाजीसाठी फणस आणला. तो जून असेल (म्हणजे कोवळा नसेल) तर ‘उकडगरेच करा’ असंही सांगितलं. आईनं भाजी करायला घेतली ती चिरून शिजवून पानात वाढेपर्यंत तिच्या डोळ्यातून आसवं ओघळत होती. हे सर्वाच्या लक्षात आलं. आधी चुलीचा धूर नि त्यात भावनांचा पूर मग काय विचारता? आईची भावविव्हळ अवस्था सर्वाच्या लक्षात आली. जेवायला सुरुवात केल्यावर पहिल्याच घासाला सगळ्यांच्या लक्षात आलं की भाजीत आई मीठ घालायला विसरल्यामुळे ती अळणी झाली आहे. नेहमीच्या स्वभावाप्रमाणे श्याम जोरात म्हणाला, ‘आई, पण तो पुढे काय म्हणणार इतक्यात वडिलांनी सर्वाना गप्प बसून मुकाटय़ानं भाजी खाण्यास सांगितली. स्वत:ही ‘काय फक्कड झालीय भाजी, एकदम राजमान्य, म्हणजे राजालाही आवडेल अशी!’ असं म्हणत ती अळणी भाजी मिटक्या मारीत खाल्ली. आईच्या लक्षात येऊन तिला वाईट वाटू नये म्हणून पानात वाढलेलं मीठही भाजीला लावलं नाही. मुलांनीही भाजी खाल्ली. शेवटी आई जेवायला बसली. पहिला घास खाताच तिच्या लक्षात आलं की भाजीत मीठ घालायचं राहून गेलं. तिनं हाक मारली. ‘श्याम’ तो आल्यावर आसूभिजल्या डोळ्यांनी त्याला म्हणाली, ‘अरेरे, अळणी भाजी तुम्ही सर्वानी खाल्लीत ना? तू तरी सांगायचंस श्याम’ यावर श्यामनं घडलेला सारा प्रसंग सांगितला.खरंच, श्याम म्हणतो त्याप्रमाणे आपल्या विसरभोळेपणामळे सर्वाना अळणी, बेचव भाजी खावी लागली म्हणून हळहळणारी माझी आई श्रेष्ठ की संयम पाळून सतत कामात असलेल्या आईला समजून घेऊन संयमानं वागून घरात समाधान राखणारे वडील श्रेष्ठ याचा निर्णय लागणं कठीण आहे. दोघांनीही आपापल्या वागण्यातून मोलाचे संस्कार घडवले होते. ते खरे सुसंस्कार होते. सर्वाना आनंद देणारे. सुसंस्कृत होण्यासाठी शिक्षण, आर्थिक सुबत्ता, सत्ता यापैकी काहीही फार महत्त्वाचं नसतं. महत्त्वाचं असतं ते वातावरण आणि सुसंस्कृत व्यक्तींचा सहवास. श्यामच्या भाग्यानं त्याला मिळाला. त्यातूनच पुढे साकारले साने गुरूजी. ते जसे सर्वाचे ‘गुरुजी’ होते तशीच सर्वाची आईही होते. गुरुमाउली होते.आनंदाची निर्मिती करावयाची नसते. ती आपोआप होत असते. आणि आपण ती उत्स्फूर्तपणे अनुभवयाची असते. अनुभव हाच आनंदाचा गाभा असतो. प्राण असतो. 

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक