शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदीजी घाबरलात का? तुम्हाला कसं माहिती अदानी-अंबानी टेम्पोतून पैसे देतात? राहुल गांधींची टीका
2
वादावर पडदा? सॅम पित्रोदांनी दिला IOC अध्यक्षपदाचा राजीनामा, पक्षानेही तात्काळ स्वीकारला
3
"विचित्र बडबड करणं सॅम पित्रोदांचा स्वभाव, त्यांनी भारताचा अपमान केलाय"; रामदास आठवलेंची शाब्दिक चपराक
4
CM केजरीवालांना तुरुंगात ऑफिस सुरू करण्यासाठी याचिका; कोर्टाने ठोठावला 1 लाखाचा दंड
5
"कुमारस्वामी हे ब्लॅकमेलिंगचे बादशहा अन् रेवन्ना कहाणीचे दिग्दर्शक-निर्माते", डीके शिवकुमार यांचा आरोप
6
"ते स्वतःच माणसासारखे कमी अन् पक्ष्यासारखे जास्त दिसतात..."; सॅम पित्रोदांच्या वक्तव्यावर कंगना भडकली 
7
पवार कुटुंबीयांनी पुन्हा एकदा एकत्र यावं, अशी माझी इच्छा - छगन भुजबळ
8
अरविंद केजरीवाल यांना जामीन मिळणार की नाही? सर्वोच्च न्यायालय शुक्रवारी देणार निकाल 
9
"...तर राम मंदिराला 'बाबरी' नावाचं कुलूप लावलं जाईल", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल
10
"यातून गांधी परिवाराची मानसिकता..."; स्मृती इराणी यांनी सॅम पित्रोदांच्या वादग्रस्त विधानाचा घेतला समाचार
11
भारताचा नवा विक्रम; परदेशात राहणाऱ्या भारतीयांनी वर्षभरात मायदेशी पाठवले 111 अब्ज डॉलर्स
12
चीनचं टेन्शन वाढणार! ज्या बाजारावर होता दबदबा, आता त्यावर भारत राज्य करणार
13
“उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात मुंबईतील मराठी माणूस निर्वासित झाला”; देवेंद्र फडणवीसांची टीका
14
Amit Shah : "...तर तुरुंगातही जाल"; अमित शाह यांचं अखिलेश यादव आणि राहुल गांधींवर टीकास्त्र
15
६०० पैकी ५७२ गुण मिळाले! पण टॉपर न आल्याने १६ वर्षीय तरूणीचं टोकाच पाऊल
16
SRH vs LSG सामना पावसामुळे रद्द झाला तर काय होईल? मुंबई इंडियन्सला म्हणावं लागतंय, जारे जारे पावसा... 
17
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला महाराष्ट्रात खातेही उघडता येणार नाही- शरद पवार गटाचा खोचक टोला
18
PM मोदींचे मुस्लिम समाजाला पहिल्यांदाच थेट आवाहन अन् खास मंत्र्याने घेतली भेट; चर्चेला उधाण...
19
“सत्तेत आल्यावर अयोध्येतील राम मंदिराचे शं‍कराचार्यांच्या हातून शुद्धीकरण करु”: नाना पटोले
20
इस्रायलने कुणालाही न जुमानता राफा शहरावर हल्ला केला, अमेरिकेने बरोबर इंगा दाखवला, दिला मोठा दणका

सुखी होणे सोपे दु:खी होणे कठीण - भाग 7

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2017 12:27 PM

शास्त्रज्ञांची दुर्बिण जसजशी मोठी मोठी होत आहे तसतसे त्यांना हे विश्व किती अफाट व अचाट आहे त्याची जाणिव होते आहे.अनंत कोटी ब्रम्हांडात जिथे आपल्या पृथ्वीला स्थान नाही तिथे आपल्या मुंबईला काय स्थान असणार?

- सदगुरू श्री वामनराव पैअचूक मार्गदर्शन मिळण्यासाठी भाग्य लागतेशास्त्रज्ञांची दुर्बिण जसजशी मोठी मोठी होत आहे तसतसे त्यांना हे विश्व किती अफाट व अचाट आहे त्याची जाणिव होते आहे. अनंत कोटी ब्रम्हांडात जिथे आपल्या पृथ्वीला स्थान नाही तिथे आपल्या मुंबईला काय स्थान असणार? त्या मुंबईत रहाणा-या माणसाला काय स्थान असणार? व त्याने केलेल्या कुठल्यातरी नवसाची देवाला काय किंमत असणार? लोक उपवास करतात तेव्हा आम्ही त्यांना सांगतो अरे उपवास कशाला करता? तर ते म्हणतात, “उपवास केला नाहीतर देवाचा कोप होईल” अरे देवाला काय पडले आहे तू उपवास कर नाहीतर चार वेळा जेव.नाहीतर निर्जळी उपवास करतात.लोकांचा एक समज झालेला आहे की आपण उपवास केला नाहीतर देवाचा कोप होईळ, देवाचा रोष होईल आणि हे वारंवार बजावून सांगणारे लोक देखील समजामध्ये आहेत.बुवाबाबा, काही महाराज, देवऋषी हे या लोकांना या गोष्टी बजावून सांगतात.त्यामुळे लोक आज या भितीने ग्रस्त झालेले आहेत.आज लोकांसमोर इतक्या समस्या आहेत, इतके प्रश्न आहेत, इतकी संकटे आहेत की त्यातून बाहेर कसे पडायचे हे लोकांना समजत नाही व त्यांना अचूक मार्गादर्शन कुणीच करत नाही.आग लागलेली आहे रामेश्वरी व बंब चाललेले आहेत सोमेश्वरी असा प्रकार आज होतो आहे.रोग झालेला आहे रेडयाला व इंजेक्शन देतात पखालीला असे केले तर रेडा कसा बरा होणार? दु:ख माणसाच्या वाटयाला का येते याचा जर आपण विचार केला तर माणसावर जे संस्कार झालेले आहेत त्या संस्कारांचा पगडा इतका माणसाच्या मनावर घट्ट झाला आहे की तो  त्यामुळे भितीग्रस्त झालेला आहे.त्यात परिस्थिती देखील फार भयानक आहे.परिस्थिती भयानक होण्याची कारणे देखील मी सांगितली.याचे पहिले कारण म्हणजे लोकसंख्येमध्ये वाढ, दुसरे कारण भ्रष्टाचार, तिसरे कारण रोगराई, चौथे कारण दारिद्रय व या सर्वातून बाहेर पडण्यासाठी अचूक मार्गदर्शन करणारे लोक आज दुर्मिळ झालेले आहेत.खरंतर अचूक मार्गदर्शन मिळण्यासाठी भाग्य लागते.अरे बाबा, तुझ्या दु:खाला कारण तूच आहेस  अन्य कुणीही नाही.तुझ्या सुखाला कारण तूच आहेस अन्य कुणी नाही. हे तू लक्षांत घेशील, तू परिक्षण करशील, निरीक्षण करशील, विश्लेषण करशील| तर तुला माझ्यात काय दोष आहेत, ही परिस्थिती माझ्यावर का आली, कशामुळे माझ्या जीवनांत प्राब्लेम्स निर्माण होतात हे तुझ्या लक्षात येईल.“पहावे आपणासी आपण” हा परमार्थातला विषय मी आता सांगत नाही कारण तो फार गहन आहे.साध्या जीवनात देखील माणसे आपल्यात काय देाष आहेत,आपल्यात गुण काय आहेत याचा विचार करीत नाहीत.माणसे इतरांचा विचार करतात,इतरांचे गुण काय, दोष काय याचे चांगले विश्लेषण करतील पण आपल्या गुणदोषांकडे कधी पहातच नाहीत. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात “कासयासी वानू आणिकांचे दोष मज उणे काय कमी असे”|