शहरं
Join us  
Trending Stories
1
मविआचे उमेदवार अजित पवारांच्या पाया पडले, दादा अवघडले; पंगतीला बोलणेही टाळले
2
९ चौकार, ३ षटकार! २२ वर्षीय जॅक फ्रेझर-मॅकगर्कची वेगवान फिफ्टी; बुमराहलाही धू धू धुतले 
3
"तू बारामतीचा उमेदवार बदल, मी प्रचार करतो"; अजितदादांनी सांगितला श्रीनिवास पवारांचा किस्सा
4
“श्रीकृष्णासारखा नेता आमचे सारथ्य करणार आहे”; शिंदे गटातील नेत्याची PM मोदींवर स्तुतिसुमने
5
बस झालं, हार्दिक पांड्याला पूर्वीसारखं महत्त्व देण्याची गरज नाही; इरफान पठाण संतप्त 
6
"बँक से..," Kotak Mahindra बँकेचे शेअर्स आपटल्यावर अशनीर ग्रोव्हरनं उडवली खिल्ली
7
'डिप्रेशनमध्ये मी तेव्हा आयुष्य संपवून टाकणार होतो'; जो बायडेन यांचा धक्कादायक खुलासा
8
Vastu Shastra: देवघराजवळ 'या' गोष्टी ठेवणे त्रासदायक ठरू शकते; वाचा वास्तू नियम!
9
मोदींवर टीका करणाऱ्या संजय राऊत यांना हसन मुश्रिफ यांचं प्रत्युत्तर, म्हणाले, मग शाहू महाराजांना...
10
Akshaya Tritiya 2024: यंदा अक्षय्य तृतीया कधी? साडेतीन मुहूर्तांमध्ये या तिथीला स्थान का? वाचा!
11
अरविंद केजरीवाल यांनी सर्वोच्च न्यायालयात सादर केले ५३ पानी उत्तर, EDच्या आरोपांचा घेतला समाचार
12
' माझी कामं स्वतःच्या प्रचार पुस्तिकेत छापली'; सुप्रिया सुळेंची नक्कल करत अजित पवारांची टीका
13
सिट्रॉएन, महिंद्रानंतर होंडाची बारी; अमेझला 2019 मध्ये 4 स्टार, 2024 मध्ये दोन स्टार
14
T20 WC 2024: हर्षा भोगलेंनी निवडला भारतीय संघ; KL राहुलला वगळलं, नव्या चेहऱ्यांना संधी
15
"शिवरायांच्या गादीविरोधात प्रचार करण्यासाठी मोदी कोल्हापुरात’’, संजय राऊत यांची बोचरी टीका 
16
रत्नागिरी: प्रचार ऐन रंगात आला, अन् ठाकरेंच्या जिल्हा प्रमुखाला तडीपारीची नोटीस
17
FD Vs NSC: नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट की ५ वर्षांची एफडी; ₹२ लाखांच्या गुंतवणूकीवर कुठे जास्त फायदा?
18
Vastu Shastra: पाण्याचा माठ, टाकी घराच्या 'या' दिशेला असेल तर; पाण्यासारखा वाया जाईल पैसा!
19
काँग्रेसचा प्रचार यापुढे करणार नाही, नसीम खान यांची घोषणा; मुंबईत काँग्रेसला आणखी एक धक्का!
20
'विशाल पाटलांबाबतची खेळी जयंत पाटलांकडून'; भाजपच्या माजी आमदाराचा खळबजनक दावा

समर्पित योगगुरु  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 09, 2019 3:30 PM

समाजात सगळीकडे ताणतणाव पसरलेला असल्यामुळे त्यावर मूलभूत स्वरूपाचं काम केलं, तर लोकांना त्याचा अधिक लाभ होईल, या विचाराने प्रेरित होऊन त्यांनी आपल्या भावी आयुष्याची दिशा ठरवली...

- पद्मविभूषण डॉ. के. एच. संचेती- डॉ. संप्रसाद विनोद यांच्यासारख्या महान व्यक्तीबद्दल लिहिण्याचा आलेला योग हा मला भाग्याचा क्षण वाटतो आहे. त्यांचे वडील महर्षी विनोद यांची अध्यात्मिक परंपरा आणि मोठा वारसा त्यांच्याकडे आला आहे. तो त्यांनी जपला आणि वृद्धिंगत केला आहे. बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयात १९६९ ते ७१ मध्ये ते माझे विद्यार्थी होते. माझा हा विद्यार्थी मला खूप वेगळा वाटायचा. त्यामुळे, त्याच्याकडे माझं लक्ष जायचं. ते खूप चिकित्सक होते.  सर्वांगीण विचार करून प्रत्येक गोष्टीच्या मुळाशी जाऊन अभ्यास करणं आणि आपली उन्नती साधण्याची प्रवृत्ती त्यांच्यात दिसायाची. एम.बी.बी.एस. झाल्यावर ते इतरांप्रमाणे एम.एस./एम.डी. करतील असे वाटले होते. पण, त्यांनी वेगळीच दिशा घेतली. ते योग आणि अध्यात्माकडे वळले. त्यातच स्वत:ला वाहून घेतलं.  समाजात सगळीकडे ताणतणाव पसरलेला असल्यामुळे त्यावर मूलभूत स्वरूपाचं काम केलं, तर लोकांना त्याचा अधिक लाभ होईल, या विचाराने प्रेरित होऊन त्यांनी आपल्या भावी आयुष्याची दिशा ठरवली. पत्नी डॉ. ऋजुता व योगसाधकांच्या सहकार्याने महर्षी विनोद रिसर्च फाउंडेशनची (एम.व्ही.आर.एफ.) स्थापना केली. योगविद्येचा सर्व स्तरातील आणि वर्गातील लोकांना कसा लाभ करून देता येईल यावर सखोल विचार केला. चिंतन केलं. आपली योगसाधनाही नियमित सुरू ठेवली. योगासनांमधे शरीर आणि मन जोडले जाते हा अनुभवसिद्ध विचार घेऊन अध्यात्मिक विकास आणि सामाजिक विकासकार्याची सुरुवात केली. स्वानंद सहजयोग साधना आणि शवासन-ध्यान याबद्दलचे त्यांचे संशोधन जगात मान्य झाले आहे. मला सांगायला विशेष आनंद वाटतो, की एके काळी जो माझा विद्यार्थी होता, त्याचाच आता मी विद्यार्थी  झालो आहे. मी त्यांना माझे गुरू मानतो.   गेल्या चार दशकांमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांनी लोकांना योगाच्या उपयुक्ततेची अतिशय प्रभावीपणे जाणीव करून दिली. तरुण वयात अमेरिकेत कायमचे वास्तव्य करण्याचा परवाना (ग्रीन कार्ड) मिळालेला असूनही आपल्या देशवासीयांसाठी ते भारतात परत आले आणि शांती मंदिर या त्यांच्या वास्तूमधून योगविषयक ज्ञानदानाचे पवित्र कार्य सुरू केले. हे सर्व करत असताना त्यांनी आपलं साधेपण हरवलं नाही. गावोगावी आणि विदेशी जाऊन, भाषणे देऊन, कार्यशाळा घेऊन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये सहभागी होऊन समाजप्रबोधन केलं. आजही करीत आहेत. त्यांचं हे काम असंच चालू राहो आणि त्याची व्याप्ती उत्तरोत्तर वाढत जावो, अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. त्यांना वाढदिवसानिमित्त माझ्या खूपखूप शुभेच्छा!! (लेखक ज्येष्ठ अस्थिरोगतज्ज्ञ आहेत.)

टॅग्स :PuneपुणेMeditationसाधनाAdhyatmikआध्यात्मिकYogaयोग