शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदीजी घाबरलात का? तुम्हाला कसं माहिती अदानी-अंबानी टेम्पोतून पैसे देतात? राहुल गांधींची टीका
2
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
3
वादावर पडदा? सॅम पित्रोदांनी दिला IOC अध्यक्षपदाचा राजीनामा, पक्षानेही तात्काळ स्वीकारला
4
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
5
"विचित्र बडबड करणं सॅम पित्रोदांचा स्वभाव, त्यांनी भारताचा अपमान केलाय"; रामदास आठवलेंची शाब्दिक चपराक
6
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज
7
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
8
CM केजरीवालांना तुरुंगात ऑफिस सुरू करण्यासाठी याचिका; कोर्टाने ठोठावला 1 लाखाचा दंड
9
"कुमारस्वामी हे ब्लॅकमेलिंगचे बादशहा अन् रेवन्ना कहाणीचे दिग्दर्शक-निर्माते", डीके शिवकुमार यांचा आरोप
10
"ते स्वतःच माणसासारखे कमी अन् पक्ष्यासारखे जास्त दिसतात..."; सॅम पित्रोदांच्या वक्तव्यावर कंगना भडकली 
11
पवार कुटुंबीयांनी पुन्हा एकदा एकत्र यावं, अशी माझी इच्छा - छगन भुजबळ
12
लखनौला बसले धक्के; भुवीच्या चेंडूवर नितीश रेड्डी, सनवीर सिंग यांनी अविश्वसनीय झेल टिपले 
13
"...तर राम मंदिराला 'बाबरी' नावाचं कुलूप लावलं जाईल", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल
14
"यातून गांधी परिवाराची मानसिकता..."; स्मृती इराणी यांनी सॅम पित्रोदांच्या वादग्रस्त विधानाचा घेतला समाचार
15
“उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात मुंबईतील मराठी माणूस निर्वासित झाला”; देवेंद्र फडणवीसांची टीका
16
Amit Shah : "...तर तुरुंगातही जाल"; अमित शाह यांचं अखिलेश यादव आणि राहुल गांधींवर टीकास्त्र
17
६०० पैकी ५७२ गुण मिळाले! पण टॉपर न आल्याने १६ वर्षीय तरूणीचं टोकाच पाऊल
18
SRH vs LSG सामना पावसामुळे रद्द झाला तर काय होईल? मुंबई इंडियन्सला म्हणावं लागतंय, जारे जारे पावसा... 
19
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला महाराष्ट्रात खातेही उघडता येणार नाही- शरद पवार गटाचा खोचक टोला
20
PM मोदींचे मुस्लिम समाजाला पहिल्यांदाच थेट आवाहन अन् खास मंत्र्याने घेतली भेट; चर्चेला उधाण...

गप्पांचा कट्टा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2019 4:55 PM

तो एक गप्पांचा कट्टा होता. गंमत म्हणजे नकळत त्याची वयोगटानुसार वाटणी झाली होती

- रमेश सप्रे

तो एक गप्पांचा कट्टा होता. गंमत म्हणजे नकळत त्याची वयोगटानुसार वाटणी झाली होती. म्हणजे कुणी केली नव्हती. आपसूकच झाली होती. म्हणजे सकाळी तो कट्टा असायचा फिरायला येणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांचा. नंतर त्याचा ताबा घ्यायची तरुण मंडळी. दुपारच्या वेळी तो कट्टा महिलांचा असे. उन्हं कलली की कलकल करणारी मुलं तिथं जमायची. दिवे लागली की तो कट्टा मित्र मैत्रिणींनी गजबजून जायचा. रात्रीची जेवणं झाली की काही जोडपी तिथं जमायची शिळोप्याच्या गप्पा मारायला. नंतर तो कट्टा झोपून जाई तो पहाटे उठे सेवानिवृत्त ज्येष्ठ मंडळींचे जीवनानुभव ऐकायला.

खरंच समवयस्क मंडळींचे गट (पिअर ग्रुप्स) हा हल्ली जीवनाचा अविभाज्य घटक बनलाय. विशेषत: शाळा-कॉलेजातल्या मुलांवर तर या एकाच वयोगटातील सदस्याचं प्रचंड दडपण किंवा नियंत्रण असतं. छोटी नितू तशी दुसरीतली; पण तिला वर्गातल्या जितू गितू सारखीच पाण्याची बाटली, टिफीन किंवा स्कूलबॅग हवी असते, तिचा हा हट्ट अर्थातच पालकांकडून पुरवला जातो.

पुढे महाविद्यालयात गेल्यावर वेड (नव्हे क्रेझ) असतं ब्रॅँडेड वस्तूंचं.. कपडे, बूट, इतर वस्तू नामवंत उत्पादकांनी बनवलेल्याच हव्या असतात सर्व टीनएजर्सना. युवकांना म्हणा हवं तर शिक्षणाची शाखा निवडताना विद्यालय किंवा महाविद्यालयाची निवड करताना स्वत:च्या विचारापेक्षा इतरांची म्हणजेच बहुसंख्य मंडळींची निवड हाच निकष बनतो. इतकंच काय पण भाषेचा ढंग, विशिष्ट शब्द, त्यांची बोलताना करायची फेक किंवा शैली सारं त्या कट्टय़ाच्या साक्षीनं घडायचं. अर्थात असे अनेक कट्टे गावोगावी ठिकठिकाणी असतात. आज कट्टा ही एक सामाजिक संस्था बनून राहिलीय. सध्याच्या धकाधकीच्या नि ताणतणावाच्या जीवनात तिची आवश्यकताही वाटू लागलीय. एक प्रकारची कट्टा संस्कृती आकाराला आलीय. घरात कोणी एकमेकाचं ऐकत नाही, सर्वाची तोंडं परस्परविरुद्ध दिशेला. संभाषण कमी पण शाब्दिक भांडणच अधिक अशी परिस्थिती कौटुंबिक संबंधाची बनलीय. मग मनात विचार, कल्पना, सूचना यांची गर्दी होऊन जो ताण जाणवू लागतो त्याचा निचरा अशा कट्टय़ावर होतो. तिथल्या गरमागरम चर्चा, शिरा ताणून केलेले वाद तसेच गुलाबी गुलगुले कुजबुज किंवा थंड रुसवे फुगवे हे सारे प्रेशर कुकरच्या शिट्टीसारखे असतात. आत साचलेली वाफ बाहेर टाकत असतानाच ही शिट्टी धोक्याची सूचना तसेच सुटकेची खूणही देऊन जाते. प्रत्येक वेळी सर्वाना थोडंतरी शांतनिवांत वाटतंच.

वृद्ध मंडळींचा ‘मंत्र श्रेष्ठ की यंत्र’ यासारखा आध्यात्मिक वाद असो किंवा प्रौढांचे राजकीय विषयांवरचे वादविवाद असोत, परिस्थिती ताणून फाटण्याऐवजी जोडून विणली जाते. युवकांची क्रिकेटच्या तांबडय़ा-पांढ:या किंवा गुलाबी चेंडूविषयीची बोलणी असोत किंवा युवतीचं तांबडय़ा-गुलाबी-निळ्या अशा रंगाच्या लिपस्टिकबद्दलची अनुभवांची देवघेव असो. कट्टा सदैव रंगून गेलेलाच असतो.

दुसऱ्यांची उणीदुणी काढणाऱ्या, चहाडीचुगली करणा:या महिला मंडळांचा कल्लोळ असो किंवा किशोर मंडळींची एकमेकाची फिरकी घेणारी, टोमणो मारणारी खास ढंगातली बोलणी असतो, कट्टा स्वत:ची करमणूक करून घेतच असतो.

बच्चे कंपनीची खळखळाटी किलबील तर कट्टय़ाचा जीव की प्राण! तो वाटच पाहात असतो या बाळगोपाळांची. त्यांच्या खोडय़ांतही एक प्रकारची निरागसता असते.

संसारातल्या कटकटी-अडचणी सांगणारी जोडपी कधी कधी आपल्या रडक्या गा:हाण्यांनी कट्टय़ाला बोअर करतात, त्याच त्याच व्यथांच्या त्याच त्याच कथा ऐकताना कट्टय़ाची घुसमट होते. पार कंटाळून जातो तो. ‘या मंडळींना फक्त काळा ढगच दिसतो, त्याची रूपेरी कडा कधी दिसतच नाही’ याचं कट्टय़ाला फार वाईट वाटतं.

कधी कधी स्मरणरंजनात (नोस्टाल्जिया) रंगून गेलेली मंडळी त्याला खूप आवडतात. त्यांच्या त्या जुन्या गाण्यांच्या आठवणी, गेलेल्या काळाबद्दलच्या स्मृती, गतकाळातली कुटुंबं, शाळा, सर्व क्षेत्रतली नेतेमंडळी या विषयीच्या बोलण्यातले त्यांचे उसासे नि हळवी हूरहूर कट्टय़ाला अंतमरुख बनवते. तो विचार करत राहतो ‘यालाच काळाचा महिमा किंवा कालाय तस्मै नम: म्हणायचं का?’ कट्टय़ाला तसे सर्व ऋतू आवडतात. पण मुसळधार पावसातला एकाकीपणा मात्र त्याला असह्य होतो कारण त्या काळात त्याच्याकडे कुणी विशेष फिरकतही नाही. थंडीतले लोकरीचे कपडे तर गरमीतले हातातले पंखे त्याला बरे वाटतात. पण पावसातल्या छत्र्या नि रेनकोटांचं मात्र कट्टय़ाला बिलकुल आकर्षण वाटत नाही. कारण एक तर लोक येत नाहीत. आलेले उभ्या उभ्याच थोडं काही तरी बोलतात. बसत मात्र नाहीत आणि बसलं नाही तर तो कट्टा कसला!

एरवी कट्टा तसा स्थितप्रज्ञ व्यक्तीसारखा असतो. मान-अपमान, निंदा-स्तुती, यश-अपयश, लाभ-हानी अशा साऱ्या अनुभवांच्या गोष्टी ऐकताना तो स्वत: स्थिर, समतोल राहतो.

आपल्याला अशा कट्टय़ावर जायला जमत नसेल किंवा आसपास असा कट्टा नसेल तर आपल्या घरासमोरच्या अंगणात, नाही तर घरातल्या एखाद्या कोनात (कोप:यात) असा कट्टा तयार करूया यामुळे मन अगदी शांत झालं नाही तरी हलकं हलकं, मोकळं मोकळं नक्की होईल. 

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक