शहरं
Join us  
Trending Stories
1
दिवाळी एकत्र साजरी करू, पण अजित पवारांना पुन्हा पक्षात नो एंट्री; शरद पवारांनी परतीचे दरवाजे बंद केले...
2
महागाईवर सर्वात खळबळजनक रिपोर्ट; तीन वर्षांत कुटुंबांची घरगुती बचत ९ लाख कोटींनी घटली
3
साताऱ्याच्या बदल्यात राज्यसभा मिळाली! पार्थ पवारांना दिल्लीत पाठविण्यावर अजित पवारांचे मोठे संकेत
4
सुप्रियाने पवार-सुळे असे नाव लावले असते तर..? शरद पवारांनी सांगितला तिने घेतलेला एक निर्णय...
5
अदानी-अंबानींकडून टेम्पाेने पैसा आला का? मोदींच्या सवालावर राहुल गांधींचे चोख प्रत्तूत्तर...
6
नावात काय आहे? विचारत हायकोर्टाने फेटाळल्या नामांतराविरोधातील याचिका
7
कर्मचारी सुट्टीवर; विमाने जमिनीवर; ‘एअर इंडिया एक्स्प्रेस’ची ९० उड्डाणे रद्द
8
मी ठाण मांडून बसलो, म्हणजे करेक्ट कार्यक्रम होणार: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
9
शाळेत अ‍ॅडमिशन मिळणार का? न्यायालयात स्थगितीनंतर आरटीई ऑनलाइन अर्जाला ब्रेक, पालक अस्वस्थ 
10
हेड, अभिषेकने घातला धुमाकूळ; लखनौचा पाडला फडशा; हैदराबादचा १० गड्यांनी दणदणीत विजय
11
तीन वर्षांनंतर भारतात खेळणार नीरज; राष्ट्रीय फेडरेशन चषक स्पर्धेची उत्सुकता शिगेला
12
भारतीय अर्थव्यवस्था 8% दराने वाढणार; देशाच्या मुख्य आर्थिक सल्लागारांनी व्यक्त केला विश्वास
13
'इंडिया' आघाडी भ्रष्टाचारी; भाजपकडे नेता, नीती अन् विकासाचा कार्यक्रम तयार: अमित शाह
14
ट्रॅव्हिड हेडने कुटल्या १२ चेंडूंत ५८ धावा! अभिषेक शर्मासह ३६ चेंडूंत फलकावर चढवल्या १०७ धावा
15
महा-बीसीए, बीबीए, एमसीए, एमबीए CET प्रवेश परीक्षा २९ मे रोजी; सुधारित वेळापत्रक जाहीर
16
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
17
Air India ने 80 उड्डाणे रद्द केल्याबद्दल मागितली प्रवाशांची माफी; तिकीटाचे पैसेही परत करणार...
18
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
19
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
20
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज

संवादाने नात्याचा सेतू बांधा.. 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2019 8:10 PM

जीवन आनंदी जगण्यासाठी जीवनाच्या सर्व अंगाना महत्त्व द्या व कुठलाही अतिरेक न करता , मध्यम मार्गाचा अवलंब करा...

डॉ. दत्ता कोहिनकर- आमच्याच सोसायटीत राहणारा अमित माझा सहकारी मित्र , त्याच्या तरूण मुलाबद्दल चिंतित होता . त्याच्या मुलाला अध्यात्माची खूपच आवड लागली होती . तो घरात मिसळत नव्हता . कुठल्याही समारंभाला येत नव्हता. खाण्याची खूपच पथ्ये पाळत होता . त्याला रात्री नीट झोप येत नव्हती . स्त्रीयांशी बोलताना तो मान खाली घालायचा किंवा स्त्रीयांना टाळायचा . एकटाच शुन्यात बसून रहायचा . त्याच्या चेहऱ्यावर भयंकर ताण व औदासिन्य दिसत होते . लग्नाचा विषय काढला कि तो नाराज व्हायचा . लग्न करायच नाही म्हणायचा .सन्यास घेण्याचीभाषा करायचा . सारखाच आश्रमात जायचा . घरात लाडाने त्याला ढेबू म्हणायचे . एके दिवशी मी ढेबूला माझ्याकडे अर्जितसिंग च्या कार्यक्रमाचे पास आहेत , तू पण चल असे म्हटले . त्याक्षणी ढेबू मला म्हणाला , मी येणार नाही . कारण गुरुजीनी सांगितलेय , नाच गाण्यापासून दूर रहा . नाच व गाण्यांमुळे मन प्रक्षुब्ध होऊन वासना बळावतात व त्यातून शील भंग होऊ शकतो . त्यामुळे मी येऊ शकत नाही असे उत्तर त्याने दिले . यासारख्या समजुतींनी ढेबूने त्याच्या आयुष्यातील मनोरंजनाचा दरवाजा बंद केला होता . त्याक्षणी मला एक गोष्ट आठवली . एका राजाने स्वसंरक्षणासाठी असा राजवाडा बांधला कि साधा किटक पण आत येऊ शकणार नाही . त्याने राजवाड्याला फक्त एकच दरवाजा ठेवून तिथे सशस्त्र पहारेकरी ठेवले . शेजारील राजाने हा राजवाडा पाहून - तसाच राजवाडा स्वत : साठी बांधण्याचे ठरवले . राजवाड्यातून निघताना या दोन्ही राजांच्या गप्पा ऐकून एक फकीर जोरजोरात हसू लागला . फकिराला हसण्याचे कारण विचारले असता फकीर म्हणाला , राजा या एका उघड्या दरवाजातून पण कोणीही येऊ शकेल , तोही बंद कर ना . हे ऐकताच राजा म्हणाला , हा दरवाजा पण बंद केला तर मी आतच मरून जाईन ना . मग हे थडगच होईन . मित्रांनो, ढेबू सारखी अनेक तरूण मुलं नको त्या गुरुजींच्या नादी लागून , मुक्तीऐवजी - बंधनात अडकत आहेत . निसर्गाच्या विरोधात जात आहेत . निसर्गाच्या नियमांविरुद्ध गेल्याने शारीरिक व मानसिक धक्के खात आहेत .डिप्रेशन युक्त व अंबनॉर्मल जीवन जगत आहेत .आनंदी जीवन जगण्याचे अनेक दरवाजे बंद करून भावभावनांचे दमन केल्यामुळे नैराश्यात जात आहेत . जीवन आनंदी जगण्यासाठी जीवनाच्या सर्व अंगाना महत्त्व द्या व कुठलाही अतिरेक न करता , मध्यम मार्गाचा अवलंब करा . स्वत : च स्वत : ला तपासून पहा व आनंदी रहा .  

टॅग्स :PuneपुणेAdhyatmikआध्यात्मिक