शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

आनंदाचे डोही आनंद तरंग -  माझे चित्त तुझ्या पाया, मिठी पडली पंढरीराया

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2019 12:30 IST

भगवंताने आपल्याला बुडवण्यासाठी हा भवसागर उभा केलेला नाही, तर आपल्याला खेळण्यासाठी संसाराची निर्मिती आहे.

- डॉ.रामचंद्र देखणे- (प्रवचन व कीर्तनकार )पंढरपुरातील चंद्रभागेच्या तीरावर पांडुरंगरूपी नाव पुंडलिकाच्या द्वारात कटेवर हात ठेवून उभी आहे आणि तुम्हाला उभ्याउभ्याच बोलावत आहे. फक्त त्याच्या पायांना मिठी घाला. पैलतीरावर आपोआप जाल. संतश्रेष्ठ तुकाराममहाराजांनी पंढरीनाथाच्या पायी मिठी घातली आणि त्याचे सुंदर ते ध्यान आठवीत ते म्हणू लागले, ह्यह्यतुज पाहता सामोरी, दृष्टी न फिरे माघारी, माझे चित्त तुझे पाया, मिठी पडली पंढरीराया, पंढरीच्या श्रीविठ्ठलाला पाहिले की त्याच्या सुंदर स्वरुपाचे वर्णन करण्यासाठी संतांचे शब्द सरसावतात आणि परब्रह्मरूपातील तत्त्ववेत्त्यांचे हे दर्शन दृश्यस्वरूपात येते. भक्त किंवा संत हे तात्त्विक पातळीवर अद्वैतात जातात. पण भावानिक पातळीवर द्वैतातच. ज्याने द्वैताचे द्वैत मोडते ते हे रूप इतके मनोहर आहे, की ब्रह्मभावात गेलेले संत पुन्हा स्वरूपस्थितीला येऊन वर्णन करू लागतात.       सुंदर ते ध्यान उभे विटेवरी,         कर कटवरी ठेवोनिया.विटेवरी उभा आहे, कटावर हात आहेत, कानात मकरकुंडले आहेत, गळ्यात कौस्तुभमण्याचा हार आहे, दंडावर, मनगटावर बाजूबंद आणि मणिबंध आहेत, कमरेला तिहेरी पितांबर आहे. समचरण विटेवर ठेवून हे सुंदर ते ध्यान भक्तिसुखाची शोभा वाढवित आहे. विठ्ठलाचे हे वर्णन म्हणजे मूर्तिविज्ञान, तर त्यातील रूपक हे मूर्तिज्ञान होय. कारण संतांनी चर्मचक्षूंबरोबर ज्ञानचक्षूनेही न्याहाळून हे वर्णन केले आहे. कटेवरील हात हे तर तत्त्वदर्शी असे सुंदर रुपक आहे. शंकराचार्यांनी पांडुरंगाचे वर्णन करताना विधातुवसत्यै असा शब्दप्रयोग केला आहे. विधातु म्हणजे ब्रह्मदेव आणि वसत्यै म्हणजे वसतिस्थान. ब्रह्मदेवाचे वसतिस्थान म्हणजे सत्यलोक आणि आपण यामध्ये  फक्त दहा बोटांचा फरक आहे. ह्या भवसागराचे पाणी कमरेपर्यंतच आहे हेच कटेवर हात ठेवून ते सुचवित आहेत. संतश्रेष्ठ तुकाराममहाराज म्हणतात, भवसागर तरता, कारे करितसे चिंता,    पैल उभा दाता, कटी कर ठेवुनिया...भवसागर तरून जाण्याची चिंता का करता, पलीकडे कटीवर हात ठेवून तो उभा आहे. भगवंताने आपल्याला बुडवण्यासाठी हा भवसागर उभा केलेला नाही, तर आपल्याला खेळण्यासाठी संसाराची निर्मिती आहे. नित्यानित्यवस्तुविवेक इहफलभोगाविराग, अमुत्रफलभोगाविराग, शम, दम, उपरम, तितिक्षा, श्रद्धा, समाधान, मुमुक्षुता ही पाच बोटे आहेत. ह्या दहा बोटांनी जीवनाचा खेळ खेळला तर भवसागरही कमरेएवढाच आहे, तर सत्यालोकही फक्त दहा बोटावरच आहे. 

टॅग्स :PuneपुणेPandharpur Vitthal Rukmini Templeपंढरपूर विठ्ठल रूक्मिणी मंदीरAdhyatmikआध्यात्मिक