शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
3
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
4
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
5
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
6
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
7
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
8
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
9
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
10
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
11
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
12
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
13
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
14
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
15
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
16
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
17
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
18
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
19
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
20
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी

आनंद तरंग-  भक्ती अभेदाचे दर्शन

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2018 16:34 IST

ज्ञानाची अवस्था घेतली तर प्रचंड मोठा ज्ञानी आणि साधारण ज्ञानी असा भेद होऊ शकेल; पण एखादा भक्त हा खूप मोठा आणि एखादा खूप लहान असे कधीच नसते.

ठळक मुद्देभगवत प्रेमाच्या अनुभूतीवर सर्व भक्त भगवंताला सारखेच प्रियसमत्वदर्शी भक्तीयोग सकल संतांच्या भक्तीदर्शनाचा पाया

- डॉ. रामचंद्र देखणे-  कोणत्याही धर्माच्या, देशाच्या, संस्कृतीच्या आणि अध्यात्मिक विचारांच्या प्रणालीमध्ये सर्वांनीच ‘भक्ती’ या संकल्पनेला खूप मोठे स्थान दिले आहे. भक्तीच्या अर्थाविषयी, स्वरूपाविषयी साक्षात्कारी संत, महात्मे, तत्त्ववेत्ते यांनी काही प्रमाणात विभिन्न मते मांडली असली तरी त्या सर्वांनी भक्ती ही प्रेमभावाची अत्युच्च अनुभूती आहे हे मान्य केले आहे. काहींनी भक्तीला शास्त्र म्हटले आहे. म्हणून भक्तीशास्त्र हा शब्द रूढ झाला आहे. तर भक्ती ही भावनिक पातळीवर आणि देव व भक्त यातील भावदर्शनाने जोडलेली असल्याने भावदर्शन हे शास्त्र कसे होईल? अशीही शंका व्यक्त केली आहे. भक्तीसाठी द्वैताची आवश्यकता आहे. कारण भक्त वेगळा आणि परमात्मा वेगळा आहे. ज्ञानियांचे ज्ञेय ध्यानियांचे ध्येय तपस्वियांचे तप, जपकांचे जाप्य आणि योगियांचे गौप्य हे एकमेकांपासून वेगळेच आहे ना. ज्ञानवंताला ज्ञेय हवे असेल तर भक्ताला त्याचे प्रेम हवे आहे. भक्तीच्या माध्यमातून संतांनी किंवा खूप मोठ्या समत्वतेचे दर्शन घडविले आहे. ज्ञानाची अवस्था घेतली तर प्रचंड मोठा ज्ञानी आणि साधारण ज्ञानी असा भेद होऊ शकेल; पण एखादा भक्त हा खूप मोठा आणि एखादा खूप लहान असे कधीच नसते. भक्तीच्या पातळीवर तो सम असतो आणि तो भक्तच असतो. अर्जुन हा श्रीकृष्णाचा भक्त होता. तो राजघराण्यातील होता तर सुदाम हादेखील श्रीकृष्णाचा भक्त होता आणि तो मात्र सामान्य आणि दरिद्री होता. श्रीकृष्णाने भक्त म्हणून अर्जुनाला जेवढे स्वीकारले तेवढेच सुदाम्यालाही. भक्तीने सर्वांना समान अधिकार प्राप्त होतो. तुकोबारायांनी म्हटल्याप्रमाणे, ‘सकलासी येथे आहे अधिकार’ किंवा ‘पै भक्ती एकी मी जाणे। तेच साने थोर न म्हणे। आम्ही भावाचे पाहुणे। भलतेया।।’ ज्ञानेश्वरी ही संतांची वचने पाहिल्यावर भगवत प्रेमाच्या अनुभूतीवर सर्व भक्त भगवंताला सारखेच प्रिय आहेत. भक्तीने एकीकडे विश्वव्यापी अनादि परमात्मा मिळवायचा आहे तर दुसरीकडे माणसामाणसातला देव शोधायचा आहे. भक्त प्रत्येक भूतमायात देवच पाहतो आणि साम्यभावाचे दर्शन घडवितो. अभेदाचे मानवी दर्शन म्हणजे भक्ती होय. ‘जे जे भेटे भूत। ते ते मानिजे भगवंत’ हा ज्ञानदेवांचा समत्वदर्शी भक्तीयोग आहे आणि तोच सकल संतांच्या भक्तीदर्शनाचा पाया आहे.

टॅग्स :PuneपुणेAdhyatmikआध्यात्मिकMaharashtraमहाराष्ट्र