आनंद तरंग: जबाबदारीची जाणीव होते
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2020 00:14 IST2020-05-07T00:14:27+5:302020-05-07T00:14:37+5:30
पाऊल-पाऊल चालणे तर आम्हाला स्वत:च करावे लागेल़ कोणी अन्य आम्हाला खांद्यावर उचलून मुक्त अवस्थेपर्यंत पोहोचवेल, या धोक्यापासून सर्वस्वी मुक्ती मिळाली़ हे सत्य अनुभूतीच्या स्तरावर स्पष्ट होत गेले़

आनंद तरंग: जबाबदारीची जाणीव होते
फरेदुन भुजवाला
विपश्यना विद्या अदृश्य देवी-देवतांप्रती घृणा अथवा द्वेष जागविणे शिकवत नाही़ उलट त्यांच्याप्रती मैत्रभाव ठेवणे शिकविते़ ‘आपली मुक्ती आपल्या हाती,
आपले परिश्रम आपला पुरुषार्थ’च्या भावाने अहंकार जागवत नाही़, तर आपल्या जबाबदारीत विनम्र सतर्कता जागवते़ परावलंबनाऐवजी स्वावलंबी होण्याचा बोध कल्याणकारी वाटला़ ‘स्वावलंबनाच्या एका अनुभवावर, अर्पित कुबेराचा दोष,’ एका कवीचे हे बोल स्मरण तन-मन रोमांचित होतात़ त्यामुळे जिथंपर्यंत साधनेचा प्रश्न आहे़ तिथं संशयासाठी अल्पमात्रही जागा उरत नाही़ संशय राहीलच कसा? प्रत्यक्षाला प्रमाणाची गरज कशाला? प्रत्यक्ष लाभ मिळतच राहतो, असे विपश्यनाचार्य सत्यनारायण गोएंका सांगतात़ विपश्यना साधनेचा अभ्यास करता करता जेवढे जेवढे सत्य समोर आले, तेवढे तेवढे अनुभवले़ मनोविकार दुर्बळ होत आहेत की नाहीत, त्यांचे निर्मूलन होत आहे की नाही, हे अनुभवले़ वर्तमानाच्या प्रत्यक्ष सुधाराला महत्त्व देणारी ही विद्या योग्य वाटली़ हे स्पष्टपणे समजले की, वर्तमान सुधारत आहे, तर भविष्य आपोआप सुधारेल़ लोक सुधारत आहे, तर परलोक सुधारेलच़ हेही खूप चांगले समजले की, आपल्या मनाला मलिन करण्याची शतप्रतिशत जबाबदारी स्वत: आपली आहे़ कोणीतीही बाह्य अदृश्य शक्ती याला का मलिन करेल बरे? त्यामुळे याला सुधारण्याचे दायित्वही शतप्रतिशत आपलेच आहे, असे विपश्यनाचार्य गोएंका सांगतात़ गुरूची कृपा केवळ इतकीच आहे की, त्याने मोठ्या करुणेने आम्हाला मार्ग दाखविला आहे़ पाऊल-पाऊल चालणे तर आम्हाला स्वत:च करावे लागेल़ कोणी अन्य आम्हाला खांद्यावर उचलून मुक्त अवस्थेपर्यंत पोहोचवेल, या धोक्यापासून सर्वस्वी मुक्ती मिळाली़ हे सत्य अनुभूतीच्या स्तरावर स्पष्ट होत गेले़ बुद्धिजन्य शुष्क दार्शनिक विवाद आणि आर्द्र भक्तीच्या भावावेशातून मुक्त करून या विद्येने आध्यात्मिक क्षेत्राचा यथार्थ अनुभव दिला, असे गोएंका सांगतात़