यवतमाळकरांची रसिकता बावनकशी सोन्यासारखी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2019 12:15 AM2019-02-09T00:15:05+5:302019-02-09T00:15:46+5:30

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनानंतर येथील कवी-लेखकांनी कुठलाही आळस न करता अंकुर साहित्य संघाच्या अंतर्गत ‘आगमन शिशिराचे रंग कथा कवितेचे’ हा कार्यक्रम घेतला. या कार्यक्रमातील भरगच्च उपस्थिती बघता यवतमाळकरांची रसिकता व उत्साह बावनकशी सोन्यासारखा आहे, .....

Yavatmalkar's novel is like a jewel of gold | यवतमाळकरांची रसिकता बावनकशी सोन्यासारखी

यवतमाळकरांची रसिकता बावनकशी सोन्यासारखी

Next
ठळक मुद्देअरविंद भोंडे : अंकुर साहित्य संघाचा ‘रंग कथा कवितेचे’ कार्यक्रम

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनानंतर येथील कवी-लेखकांनी कुठलाही आळस न करता अंकुर साहित्य संघाच्या अंतर्गत ‘आगमन शिशिराचे रंग कथा कवितेचे’ हा कार्यक्रम घेतला. या कार्यक्रमातील भरगच्च उपस्थिती बघता यवतमाळकरांची रसिकता व उत्साह बावनकशी सोन्यासारखा आहे, असे उद्गार अंकुरचे केंद्रीय अध्यक्ष अरविंद भोंडे यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री प्रा. वसंतराव पुरके होते. अंकुरचे केंद्रीय सचिव हिंमत ढाळे, ज्येष्ठ पत्रकार पद्माकर मलकापुरे, केंद्रीय कार्याध्यक्ष तुळशिराम बोबडे, जिल्हाध्यक्ष विद्या खडसे, शाखाध्यक्ष प्रमोद देशपांडे, अभियंता मनोहर शहारे, सिकंदर शहा, यशवंत बापू पाटील, केंद्रीय उपाध्यक्ष सुरेश गांजरे आदी मंचावर उपस्थित होते.
प्रा. पुरके म्हणाले, रानावनातील रोपट्यांना शिशिरात जो नवपालवीचा बहर येतो, त्यामुळे आसमंताला चैतन्य लाभते. तेच चैतन्य या कार्यक्रमासाठी विशेष परिश्रम घेणाऱ्या विद्या खडसे कौतुकास पात्र आहेत. शिवाय सुनिल खडसे हे खºया अर्थाने सोशल इंजिनियर आहे. त्यांच्या परिश्रमाने अंकुर साहित्य चळवळ जिल्ह्यात विकसित झाली आहे. प्रास्ताविक अंकुरच्या जिल्हाध्यक्ष विद्या खडसे यांनी केले. सूत्रसंचालन नितीन धोटे तर प्रा. महेश मोकडे व समिना शेख यांनी आभार मानले. यशस्वितेसाठी सचिव महेश अडगुलवार, कोषाध्यक्ष सुरेश राऊत, समिना शेख, सुवर्णा ठाकरे, सुनिल खडसे, अलका राऊत, कल्पना मादेशवार, प्रमिला उमरेडकर, तोष्णा मोकडे यांनी परिश्रम घेतले.

मान्यवर, कलावंतांचा गौरव
या प्रसंगी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे कार्याध्यक्ष प्रा. डॉ. रमाकांत कोलते, सुमती कोलते, विद्या खडसे, सुनिल खडसे, संगीता सव्वालाखे, मनोहर शहारे, किशोर तळोकार यांचा सत्कार करण्यात आला. युवा संगीतकार व गायक अजिंक्य सोनटक्के, गोल्डन पिक्सल पुरस्कार प्राप्त व्हीएफएक्स आर्टिस्ट निखिल मलकापुरे यांना विशेष सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आले. हे सन्मान चिन्ह सविता मलकापुरे यांनी स्वीकारले. कथाकार नरेंद्र इंगळे अकोट, मुकुंद तेलीचरी पुणे यांचा प्रा. वसंतराव पुरके यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

Web Title: Yavatmalkar's novel is like a jewel of gold

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.