यवतमाळात साडेसहा हजार एलईडी पथदिवे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2019 09:55 PM2019-04-25T21:55:33+5:302019-04-25T21:56:25+5:30

नगरपरिषदेच्या विद्युत विभागाने शहरातील पथदिवे बदलविण्याचे काम हाती घेतले आहे. आत्तापर्यंत शहरात सहा हजार ५४४ पथदिवे बदलवून तेथे नवीन तंत्रज्ञानाचे एलईडी लाईट लावण्यात आले. संपूर्ण शहरात २३ हजार ४५७ लाईट लावले जाणार आहे.

In the Yavatmal, sixteen thousand LED streetlights | यवतमाळात साडेसहा हजार एलईडी पथदिवे

यवतमाळात साडेसहा हजार एलईडी पथदिवे

Next
ठळक मुद्दे२३ हजारांचे उद्दिष्ट : पालिकेच्या वीज बिलात घसघशीत कपात

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : नगरपरिषदेच्या विद्युत विभागाने शहरातील पथदिवे बदलविण्याचे काम हाती घेतले आहे. आत्तापर्यंत शहरात सहा हजार ५४४ पथदिवे बदलवून तेथे नवीन तंत्रज्ञानाचे एलईडी लाईट लावण्यात आले. संपूर्ण शहरात २३ हजार ४५७ लाईट लावले जाणार आहे. या नव्या दिव्यांमुळे पालिकेच्या वीज बिलात घसघशीत बचत होईल, असा दावा केला जात आहे.
यवतमाळातील रस्त्यांवर रात्री पडणारा ट्युबलाईट, मर्क्युरी लाईट, सोडीयम बल्ब, मेटल, सीएफएल बल्बचा प्रकाश आता हद्दपार होणार आहे. या सर्व प्रकारच्या पथदिव्यांमुळे नगरपरिषदेला महिन्याकाठी २४ लाख रूपये, तर वर्षाला दोन कोटी ८८ लाख रूपये वीज बिल भरावे लागत होते. मात्र आता एलईडी लाईट लावले जात असल्याने विजेचा कमी वापर होतो, असा दावा कंत्राटदार कंपनी ईईएसएलने केला आहे. शिवाय एलईडी लाईट भरपूर प्रकाश व दीर्घकाळ टिकतात. राज्य शासनाच्या ऊर्जा बचत उपक्रमांतर्गत हे काम केले जात आहे. राज्य शासन स्तरावरूनच याचे कंत्राट देण्यात आले आहे.
एलईडी पथदिव्यांमुळे पालिकेच्या वीज देयकामध्ये ५० टक्के घट झाली आहे. महिन्याकाठी आता १२ लाख रूपये, तर वर्षाला एक कोटी ४४ लाख रूपये वीज देयकावर खर्च होणार आहे. शिवाय या पथदिव्यांचा देखभाल, दुरूस्ती खर्चही अतिशय कमी आहे. केवळ लाईट लावण्यासाठी एकदाच मोठी गुंतवणूक केली जात आहे.
भूमिगत जोडणीचा झटका, वीज खंडित
शहरात २९ ठिकाणी भूमिगत वीज जोडणीचे काम सुरू आहे. त्यासाठी वीज वितरण कंपनीकडून खोदकाम केले जात आहे. यामुळे अनेक भागातील पथदिव्यांचा वीज पुरवठा खंडित झाला. काही ठिकाणी दिवसरात्र पथदिवे सुरू राहतात. भूमिगत केबल टाकण्याचे काम पूर्ण होईपर्यंत ही तांत्रिक अडचण कायम राहणार असल्याचे नगरपरिषद विद्युत विभागाकडून सांगण्यात आले.
 

Web Title: In the Yavatmal, sixteen thousand LED streetlights

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.