उमरखेडवर पाणीटंचाईचे संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2018 10:20 PM2018-01-18T22:20:38+5:302018-01-18T22:20:56+5:30

पैनगंगा नदीसह संपूर्ण तालुक्यात इसापूर धरणाच्या कालव्याचे जाळे असतानाही तालुक्याला दरवर्षी पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. यावर्षी तर अपुºया पावसाने हिवाळ्यातच पाणीटंचाई तीव्र झाली आहे.

 Water shortage crisis at Umarkhed | उमरखेडवर पाणीटंचाईचे संकट

उमरखेडवर पाणीटंचाईचे संकट

Next
ठळक मुद्दे पैनगंगा नदी आटली : इसापूर धरणाचे पाणी सोडणार कधी ?

दत्तात्रय देशमुख ।
लोकमत न्यूज नेटवर्क
उमरखेड : पैनगंगा नदीसह संपूर्ण तालुक्यात इसापूर धरणाच्या कालव्याचे जाळे असतानाही तालुक्याला दरवर्षी पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. यावर्षी तर अपुºया पावसाने हिवाळ्यातच पाणीटंचाई तीव्र झाली आहे. गावागावातील जलस्त्रोत तळाला गेले आहे. इसापूर धरणाचे पाणी नदीपात्रात सोडावे, यासाठी नागरिक आंदोलनाच्या पावित्र्यात आहे. दरवर्षी कृती आराखड्याच्या माध्यमातून कोट्यवधींचा खर्च पाणीटंचाईवर होतो. मात्र त्याचा परिणाम वर्षभरही जाणवत नाही.
उमरखेड तालुक्याच्या दक्षिण बाजूने पैनगंगा नदी वाहते. तर पुसद तालुक्यात असलेल्या इसापूर धरणाचा डावा कालवा तालुक्यातून जातो. या तालुक्यात सुपीक जमीन आहे. मात्र अथांग पात्र असलेली पैनगंगा गत काही वर्षांपासून कोरडी पडत आहे. पूर्वी पैनगंगा बाराही महिने खळखळ वाहात असायची. परंतु इसापूर धरण झाले तेव्हापासून पावसाळ्यात पुराचा तडाका आणि उन्हाळ्यात पाणीटंचाई असे समीकरण झाले आहे. पैनगंगा नदी तीरावर तालुक्यातील ४० ते ५० गावे आहेत. या गावांना पाणीपुरवठा करणाºया नळयोजनांच्या विहिरी नदीतीरावर आहे. मात्र यंदा हिवाळ्यातच पैनगंगा आटल्याने पाणीटंचाई निर्माण झाली आहे.
माणसांसोबतच जनावरांही पाण्यासाठी भटकंती करावी लागते. उमरखेड तालुका शूगर बेल्ट म्हणून ओळखला जातो. शेकडो शेतकºयांचा ऊस यंदा कारखाना बंद असल्याने शेतातच उभा आहे. या उसाला पाणी देण्याची गरज आहे. मात्र नदीपात्र कोरडे आणि विहिरी तळाला अशा अवस्थेत शेकडो हेक्टरवरील ऊस वाळत आहे. इसापूर धरणाचे पाणी नगरपालिकेसाठी आरक्षित करण्यात आले आहे. त्यामुळे नदीपात्रात पाणी सोडण्याची सुतराम शक्यता यंदा दिसत नाही. गत काही वर्षापासून बंदीभागातील नागरिक पैनगंगेच्या पाण्यासाठी दरवर्षी आंदोलन करतात. जिल्हाधिकाºयांना निवेदन देतात. त्यानंतर कुठे पाणी सोडले जाते. परंतु हे हक्काचे पाणीही मराठवाड्यातील गावे पळवून नेतात. त्यावरून मराठवाडा आणि विदर्भ असा संघर्ष निर्माण होतो.
पाणीटंचाईवर दरवर्षी उपाययोजना केल्या जातात. मात्र या उपाययोजना तकलादू स्वरूपाच्या असतात. मे महिन्यापर्यंत कृती आराखड्यातील उपाययोजनांना प्रारंभच केला जात नाही. पावसाळ्याची प्रतीक्षा केली जाते. दरवर्षी निर्माण होणाºया या पाणीटंचाईवर कायमस्वरूपी उपाय शोधण्याची गरज आहे.
लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष
तालुक्यात यंदा भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. मात्र कोणताही लोकप्रतिनिधी या प्रश्नावर आवाज उठवायला तयार नाही. गावागावातील नागरिक लोकप्रतिनिधींना पाणीटंचाईची समस्या सांगत आहेत. मात्र आढावा बैठकांमध्ये तालुक्यातील लोकप्रतिनिधी काही बोलायला तयार नाही. यामुळे नागरिकांमध्ये आता रोष निर्माण होत आहे.

Web Title:  Water shortage crisis at Umarkhed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Waterपाणी