तूर विक्रीसाठी महिनाभराची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2018 10:31 PM2018-03-14T22:31:16+5:302018-03-14T22:31:16+5:30

Wait a month for sale | तूर विक्रीसाठी महिनाभराची प्रतीक्षा

तूर विक्रीसाठी महिनाभराची प्रतीक्षा

Next
ठळक मुद्देआॅनलाईनमध्ये अडकला शेतकरी : सीसीटीव्हीच्या निगराणीत मोजमाप

ऑनलाईन लोकमत
वणी : शासनाने शेतकऱ्यांनी शेतात पिकविलेली तूर विकण्यासाठी आॅनलाईन नोंदणी करण्याची सक्ती केल्याने शेतकरी आॅनलाईनमध्ये अडकला आहे, तर तूर विकण्यासाठी २० दिवस ते महिनाभराची प्रतीक्षा करावी लागत असल्याने तूर कोठे साठवून ठेवावी, असा प्रश्न अनेक शेतकºयांना पडला आहे.
मागील वर्षीपासून शेतकऱ्यांना तुरीचे उत्पादन समाधानकारक होत आहे. मात्र तुरीला बाजारात भाव नसल्याने शेतकऱ्यांना अत्यल्प दरात तूर विकावी लागत होती. त्यामुळे शासनाने मागील वर्षीपासून नाफेडच्या सहकार्याने हमी दराने तूर खरेदी सुरू केली. तूर विक्रीसाठी एकाचवेळी शेतकºयांची गर्दी होऊन अनर्थ घडू नये, यासाठी शेतकऱ्यांना तूर विक्रीसाठी आॅनलाईन नोंदणी करणे सक्तीचे केले. यावर्षी ५ फेब्रुवारीपासून आॅनलाईन नोंदणी व तूर खरेदीचा शुभारंभ झाला. येथील खरेदी विक्री संघामार्फत आॅनलाईन नोंदणी केली जात आहे. त्यासाठी शेतकऱ्यांचा तूर पिकाची नोंद असलेला सातबारा, आधार कार्ड व बँक पासबुकची झेरॉक्स खरेदी विक्री संघाकडे द्यावी लागते. १३ मार्चपर्यंत १८७३ शेतकऱ्यांनी तूर विक्रीसाठी आॅनलाईन नोंदणी केली आहे. एका शेतकऱ्यांकडून एकरी चार क्विंटल या प्रमाणात व एक दिवशी कमाल २५ क्विंटल तूर खरेदी केली जाते. तुरीचा हमी भाव पाच हजार ४५० रूपये आहे. बाजारात यापेक्षा कमी भाव असल्याने शेतकऱ्यांनी खरेदी विक्री संघाकडे गर्दी केली आहे. येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये केवळ ५० शेतकऱ्यांची तूर खरेदी केली जाते. यासाठी बाजार समितीने तीन काटे सुरू केले आहे. सीसीटीव्ही कॅमेराच्या निगरानीत तूरीचे मोजमाप केले जाते. त्यानंतर शासन शेतकºयांच्या बँक खात्यात तुरीचा चुकारा जमा करते. नोंदणीचा वेग पाहता शेतकऱ्याला तूर विक्रीसाठी महिनाभराची प्रतीक्षा करावी लागत आहे. १३ मार्चपर्यंत ३५८ शेतकऱ्यांकडून चार हजार ६५० क्विंटल तुरीची खरेदी नाफेडने केली.
नाफेडच्या हरभरा खरेदीचा मुहूर्त कधी?
शासनाने नाफेडमार्फत शेतकऱ्यांचा चनासुद्धा चार हजार ४०० रूपये या हमी भावात खरेदी करण्याचा निर्णय घेतला. यासाठीसुद्धा शेतकऱ्यांना आॅनलाईन नोंदणी करावी लागणार आहे. आत्तापर्यंत २६६ चना उत्पादक शेतकऱ्यांनी चना विक्रीसाठी आॅनलाईन नोंदणी केली आहे. मात्र नाफेडने अजूनही चना खरेदी सुरू केली नाही. त्यामुळे काही शेतकरी बाजारात व्यापाºयांना चना विकून आपली आर्थिक गरज भागवित आहे. यामुळे शेतकºयांचे नुकसान होत आहे.

Web Title: Wait a month for sale

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.