मशिदीचे अंतरंग समजून घेताना...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2019 09:50 PM2019-06-23T21:50:41+5:302019-06-23T21:51:27+5:30

मशिदीच्या आत काय असते? मशिदीचे कार्य कसे चालते? अजान म्हणजे काय? नमाजपूर्वी कोणती पूर्वतयारी करावी लागते? अशा अनेक गोष्टींबाबत मुस्लिमेतर नागरिकांना उत्सुकता असते. अनेक गैरसमजही असतात.

Understanding the interior of the mosque ... | मशिदीचे अंतरंग समजून घेताना...

मशिदीचे अंतरंग समजून घेताना...

Next
ठळक मुद्देसर्वधर्मीयांसाठी माहिती : जमात-ए-इस्लामी हिंदच्या उपक्रमातून कार्याची ओळख

काशीनाथ लाहोरे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : मशिदीच्या आत काय असते? मशिदीचे कार्य कसे चालते? अजान म्हणजे काय? नमाजपूर्वी कोणती पूर्वतयारी करावी लागते? अशा अनेक गोष्टींबाबत मुस्लिमेतर नागरिकांना उत्सुकता असते. अनेक गैरसमजही असतात. हे गैरसमज दूर करून इतर धर्मीयांनाही मशिदीचे कार्य कळावे, यासाठी जमात-ए-इस्लामी हिंदने ईद मिलन आणि मशिद परिचय हा उपक्रम दोन वर्षांपूर्वी लातूर येथून सुरू केला.
जमात-ए-इस्लामी हिंदच्या यवतमाळ शाखेच्यावतीने अल फुरकानिया मशिदीत (सारस्वत ले-आऊट) निवडक पुरोगामी कार्यकर्त्यांसाठी ईद मिलन आणि मशिद परिचयाचा कार्यक्रम आयोजित केला होता. मुस्लीम लेखक तथा पत्रकार आणि शोधन मासिकाचे माजी संपादक नौशाद उस्मान यांनी प्रश्नोत्तराच्या माध्यमातून समर्पक विवेचन केले. अजान आणि नमाजचे प्रात्यक्षिक दाखविले. विशेष म्हणजे, हेमंत कांबळे यांनी अजान दिली.
मशिदीला हिरवाच रंग दिला पाहिजे, असे बंधन नाही. टोपी घालणे हे सन्मानदर्शक आहे. ती अत्यावश्यक नाही. टोपीशिवायही नमाज पढता येतो. अजान म्हणजे, पवित्र परमेश्वराकडे येण्याचे आवाहन असते. नमाजपूर्वी प्रसन्न वाटावे आणि जंतंूपासून संरक्षण व्हावे, यासाठी हात, पाय आणि चेहरा धुण्यासाठी विशिष्ट जागा असते. कोणाच्या जीवावर संकट आले तर नमाज अर्धवट सोडून त्याला वाचवता येते. महिलांना मशिदीत प्रवेश असतो. त्या नमाज अदा करून शकतात. जिथे हात-पाय धुण्याची आणि स्वच्छतागृहाची स्वतंत्र व्यवस्था आहे, तिथेच महिलांना प्रवेश असतो.
हा उपक्रम आयोजित करण्यात जमाअत-ए-इस्लामी हिंदचे शहरध्यक्ष जियाउद्दीन, रियाज सिद्दीकी, एजाज जोश, डॉ. मुजीब, शहाबुद्दीन, रहेमान साहब, अल्लाउद्दीन खिलजी, काझी निझामुद्दीन सहभागी होते. यावेळी अंकुश वाकडे, दीपक नगराळे, डॉ. दिलीप घावडे, डॉ. दिलीप महाले, प्रवीण भोयर, सुदर्शन बेले, दिलीप बेलसरे, दीपक वाघ, संतोष ढवळे, राजू देशमुख, यशवंत इंगोले, विठ्ठल नागतोडे, मनोज उम्रतकर, योगेश धानोरकर, भवरे आदी उपस्थित होते.

पूर्वापार परंपरा कायम
यानिमित्ताने अत्यंत सखोल चर्चा झाली. अकबर म्हणजे अल्ला. मराठीत महादेव. येथे अकबर राजाशी काहीही संबंध नाही. पूजा करणे इस्लामविरोधी आहे. मात्र भारतातील बहुतांश मुस्लीम हे धर्मांतरित असल्याने पूर्वापार परंपरा त्यांनी कायम ठेवल्या आहेत. परिणामी भारत, पाकिस्तान, बांग्लादेश अािण अफगाणिस्तान येथे पीर, ताज, अवलिया, मोहर्रम, दर्गाह येथे पूजा केली जाते. इस्लाम हा परिवर्तनशील धर्म असून जगात इस्लामने परिवर्तनातून अनेक पर्याय स्वीकारले आहेत. भारत मात्र याबाबत अपवाद आहे. भारतीय मुस्लीमांमध्ये भयंकर अंधश्रद्धा आहेत. अशा अनेक मुद्द्यांवर यावेळी प्रकाश टाकण्यात आला. चर्चेतून अनेक गोष्टी नव्याने कळल्या. अनेक गैरसमज दूर झाले.
मशिदीतले मेंबर
मशिदीमध्ये कोणाचाही फोटो नसतो. तर एक विचारपीठ असते. त्याला मेंबर म्हणतात. इमाम दर शुक्रवारी आणि ईदच्या दिवशी नमाजनंतर प्रासंगिक भाषण आणि उपदेश करतात. इमामांना नमाज पढण्यासाठी एक जानमाज (आसन) असून काही पुस्तके एका टेबलावर ठेवलेली असतात.

Web Title: Understanding the interior of the mosque ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.